23 February 2025 4:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

तुमच्या EPF खात्यातील रक्कम ऑनलाईन कशी काढाल? पहा स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

Online EPF Withdrawals, Withdraw EPF Online

मुंबई: ईपीएफ (Employees’ Provident Fund) म्हणजे सामान्य नोकरदारांच्या जिव्हाळ्याचा विषय आणि तोच आता गरजेच्या वेळी काढण्यासाठी कंपनी एजन्ट किंवा कंपनी HR भरोसे राहण्याची गरज आहे. कारण. ऑनलाईन कम्प्लायन्सेस मालकाप्रमाणे नोकरदारासांठी सोपे झाले आहेत आणि सदर प्रक्रिया घरबसल्या ऑनलाईन पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे अडीअडचणीच्या वेळी स्वतःच त्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता अशी सोय करण्यात आली आहे.

घर खरेदी अथवा दुरुस्ती, मुलांचे उच्च शिक्षण, लग्नकार्ये, आजारपणे… अशा अनेक कारणांसाठी पैशांची आवश्यकता भासते. त्यासाठी पीएफ खात्यात साठलेल्या पुंजीतून आगाऊ रक्कम काढण्याची सोय उपलब्ध आहे. मात्र, त्याची प्रक्रिया अत्यंत किचकट होती. आगाऊ रक्कम काढण्यासाठी अर्ज केल्यावर आवश्यक कागदपत्रांची जंत्रीही सोबत जोडावी लागत होती. त्यानंतर हा अर्ज घेऊन नजीकच्या ‘ईपीएफओ’ कार्यालयात जावे लागत होते. अर्जाची पडताळणी झाल्यावर ‘क्लेम’ मान्य होऊन संबंधित खातेधारकाच्या खात्यात आगाऊ रक्कम जमा केली जायची. मात्र आता संपूर्ण प्रक्रियाच ऑनलाइन करण्यात आली आहे.

आपलं आधार कार्ड आणि पॅन कार्ड UANशी जोडलेलं असल्यास ऑनलाइन पीएफ काढता येतो. त्याशिवाय आपला बँक खात्याचा नंबरसुद्धा कंपनी किंवा संबंधित मालकाकडून प्रमाणित केलेला असावा. अशा प्रकारे आपण सरळ EPFOकडे पीएफची रक्कम काढण्याचा अर्ज करू शकतो. परंतु तुमचे दोन्ही (आधार कार्ड आणि पॅन कार्ड) दस्तावेज UANशी जोडलेले नसल्यास Employer (कंपनी) कडून पडताळणी करून घेणं गरजेचं असतं. तुमचा UAN नंबर सक्रिय असला पाहिजे. तसेच UAN हा मोबाइल क्रमांकाशीसुद्धा जोडलेला पाहिजे. या सर्व गोष्टींची खातरजमा केल्यानंतर Online PF Claim करण्यासाठीच्या या प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार आहेत.

 

त्यानंतर खालील प्रक्रिया स्टेप-बाय-स्टेप पूर्ण करा:

  1. https://unifiedportal-mem.epfindia.gov.in वर जा.
  2. त्यानंतर UANनंबरच्या माध्यमातून पोर्टलवर लॉगिन करा.
  3. लॉग इन झाल्यानंतर ‘Manage’ टॅबवर क्लिक करा; त्या टॅबच्या माध्यमातून केवायसीशी संबंधित(आधार, पॅन आणि बँक अकाऊंट) माहिती बरोबर आहे का ते तपासून घ्या.
  4. जर केवायसीशी संबंधित माहिती अचूक असल्यास ‘Online Services’ टॅबवर क्लिक करा आणि त्यामध्येच खाली असलेल्या संबंधित Claim (Form-३१, १९ & १०C) वर क्लिक करा.
  5. ‘Claim’ स्क्रीनवर खातेदाराचं वर्णन, केवायसी माहिती असेल. त्यानंतर बँक खात्याचे शेवटचे चार अंक टाकून खातरजमा करून घ्या.
  6. प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्यासाठी “Yes”वर क्लिक करा; आता “Proceed for Online claim”चा सिलेक्ट करा.
  7. क्लेम फॉर्ममध्ये पूर्ण रक्कम काढायची की अंशतः रक्कम काढायची आहे हे ठरवा; त्यानंतर Applicationला सबमिट करा.
  8. तुमच्या कंपनी किंवा मालकानं परवानगी दिल्यानंतर संबंधित रक्कम आपल्या बँक खात्यात जमा होणार आहे. ही रक्कम खात्यात जमा होण्यासाठी 15-20 दिवसांचा कालावधी लागतो.

 

Web Title:  How to withdraw EPF online step by step guide process.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Banks(57)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x