5 November 2024 9:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | वोडाफोन आयडिया शेअर 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला नोट करा - NSE: IDEA IRFC Share Price | IRFC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC Suzlon Share Price | मल्टिबॅगर शेअर 22% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला - NSE: SUZLON Penny Stocks | 7 रुपयाचा पेनी शेअर पैशाचा पाऊस पाडतोय, रोज 20% अप्पर सर्किट, संधी सोडू नका - BOM: 532015 Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी - NSE: TATAPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 55% पर्यंत परतावा मिळेल - NSE: HAL Bank Account Alert | पगारदारांना 'या' 5 फायनान्शियल चुका पडू शकतात महागात, कधीच पैसा-संपत्ती वाढणार नाही - Marathi News
x

Budget 2021 | प. बंगाल निवडणुकीची झलक | अर्थमंत्र्यांना रविंद्रनाथ टागोरांच्या वचनाची आठवण

India Budget 2021-22, Rabindranath Tagore, Finance minister Niramala Sitharaman

नवी दिल्ली, ०१ फेब्रुवारी: Budget 2021 LIVE : कोरोना प्रादुर्भावामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर यांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार आपल्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प सादर करणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सकाळी 11 वाजता सर्वसाधारण अर्थसंकल्प लोकसभेत सादर करण्यास सुरुवात केली आहे. कोरोना महामारी, अर्थव्यवस्थेचे रुतलेले चाक आणि बेरोजगारीचा गंभीर प्रश्न या सर्व समस्यांवर उपाय म्हणून यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

आज सकाळी पावणे नऊच्या सुमारस अर्थमंत्री सीतारामन अर्थ मंत्रलयामध्ये पोहचल्या तेव्हा त्यांनी यंदाचा अर्थसंकल्प हा पूर्णपणे पेपरलेस असेल अशी माहिती दिली. नेहमीप्रमाणे खाता बही म्हणजेच कागदपत्रं असणारी बॅग आणण्याऐवजी यावेळी सीतारामन यांच्याकडे लॅपटॉप असल्याचं पहायला मिळालं. लाल रंगाचं कव्हर असणाऱ्या या लॅपटॉपवर राजमुद्रेचे चिन्हं होतं.

कोरोनाच्या महासाथीने आपली गडद छाया अर्थव्यवस्थेवर सोडली आहे. टाळेबंदीने आक्रसलेला रोजगाराचा बाजार आर्थिक लसीच्या प्रतीक्षेत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनीची अपेक्षा आहे. आरोग्य क्षेत्रही बूस्टरच्या अपेक्षेत आहे. तर उद्योगांना सवलतींची आवश्यकता आहे. इंधनदर रोज नवे विक्रम स्थापित करत असल्याने महागाईने मेटाकुटीला आलेल्या जनतेला अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

दरम्यान, प.बंगालमध्ये विधानसभा निवडणूक असल्याने त्याचे प्रतिबिंब बजेटच्या सादरीकरणात दिसलं आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविंद्रनाथ टागोरांच्या वचनाची आठवण करून दिली… ज्यावेळी पहाट अंधारलेली असते त्यावेळी विश्वास हाच आशेचा किरण असतो असं त्या म्हणाल्या.

 

News English Summary: I borrow the words from Rabindranath Tagore, “Faith is the bird that feels the light and sings when the dawn is still dark”. In this spirit, I can’t help but recall the joy that we as a Cricket loving nation felt after Team India’s recent spectacular success in Australia said Niramala Sitharaman.

News English Title: I borrow the words from Rabindranath Tagore said union finance minister Niramala Sitharaman news updates.

हॅशटॅग्स

#Budget 2021-22(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x