15 January 2025 3:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी
x

भारतीय अर्थव्यवस्थेच्या बिकट स्थितीमुळे जागतिक मंदीचे सावट अधिकच गडद: आयएमएफ

IFM, Indian Economy, World Economy

नवी दिल्ली: भारताची अर्थव्यवस्था पार पूर्णतः बिकट झाली आहे. देशाचा २०१९-२० या आर्थिक वर्षाचा विकासदर धिम्यागतीने ४.८ टक्क्यांवर मजल मारेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) सोमवारी वर्तवला. दरम्यान भारतासारख्या देशातील मंदीमुळे वैश्विक विकासदराचा अंदाज घटवल्याचे खापरही आयएमएफने भारतावर फोडले आहे.

दावोसमध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या (डब्ल्यूईएफ) बैठकीत आयएमएफने भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली. देशाचा विकासदर २०२० पर्यंत ५.८ टक्क्यांवर तर २०२१ मध्ये ६.५ टक्क्यांवर जाऊ शकतो, असे या संस्थेने म्हटले आहे. चालू आर्थिक वर्षाचा विकासदर ६.१ टक्क्यांवर जाणार असल्याचा अंदाज आयएमएफने याआधी वर्तवला होता. त्यात सोमवारी मोठी घट केली.

इंडिया टुडेच्या न्यूज डायरेक्टर राहुल कंवल यांच्याशी बातचीत करताना आयएमएफची मुख्य अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ यांनी जागतिक वाढीच्या अंदाजात ८० टक्के घसरणीकरिता भारत जबाबदार असल्याचा ठपका ठेवला आहे. २०१९चा जागतिक विकासदर २.९ टक्के आणि २०२०साठी त्याच विकासदराचा अंदाज ३.३ टक्के नोंदवण्यात आला आहे. जो ऑक्टोबर महिन्यात ०.१ टक्क्यानं कमी आहे. भारतीय अर्थव्यवस्थेनं जगाला कशा पद्धतीनं प्रभावित केलं, याचं उदाहरणही त्यांनी दिलं आहे.

भारताच्या पहिल्या दोन तिमाहीचा अंदाज तुलनेनं कमकुवत आहे. गैर बँकिंग वित्तीय क्षेत्रात असलेली उदासीनता आणि ग्रामीण क्षेत्रात उत्पन्नात आलेल्या कमीमुळे भारताचा आर्थिक विकासदर घटवल्याचंही त्यांनी सांगितलं. २०२०पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ ५.८ टक्के आणि पुढे २०२१मध्ये ६.५ टक्के होऊ शकते. भारताला प्रगती करताना आम्ही पाहतोय. पुढच्या वित्त वर्षात भारत ठरलेलं लक्ष्य गाठू शकतो. सरकारसमोर सर्वात मोठी समस्या एनपीएची आहे, असंही गीता गोपीनाथ यांनी स्पष्ट केलं आहे.

जागतिक बाजारात खनिज तेलाच्या किंमतीमधील वाढ कायम आहे. इराक, लिबियातील अस्थिरतेने मंगळावरी खनिज तेलाच्या किमतीत ११ सेंट्सची वाढ झाली. खनिज तेलाचा भाव ६५.३१ डॉलर प्रति बॅरलवर गेला आहे. खनिज तेलाच्या वाढत्या किमती भारतासाठी परवडणाऱ्या नाहीत.

 

Web Title:  IMF worried about Indian as well as World Economy Slowdown.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x