28 December 2024 3:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | महिना खर्चाचं टेन्शन मिटेल, पोस्टाची ही योजना प्रत्येक महिन्याला 9250 रुपये देईल, फायद्या घ्या SIP Mutual Fund | पैशाचा मॅजिक फॉर्म्युला, 21 व्या वर्षापर्यंत तुमचा मुलगा देखील होईल कोटींचा मालक; फक्त हा फॉर्म्युला फॉलो करा Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 30% परतावा दिला, खरेदीला तुफान गर्दी - Penny Stocks 2024 SBI Mutual Fund | बँक FD 10 वर्षात जेवढं व्याज देईल तेवढा परतावा दर वर्षी देणाऱ्या फंडाची यादी सेव्ह करा, पैसा वाढवा Penny Stocks | 48 पैशाच्या पेनी शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले, दणादण परतावा मिळतोय - Penny Stocks 2024 Horoscope Today | 'या' राशींसाठी नवीन वर्ष अत्यंत खास असणार आहे तर, अनेकांना वैवाहिक सुख लाभणार, पहा तुमचे राशी भविष्य Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
x

शाळा दीर्घकाळासाठी बंद राहणं आणि मुलांसंबधित भविष्यातील दुष्परिणाम | रघुराम राजन यांचा 'हा' इशारा

School Reopen

मुंबई, १८ ऑगस्ट | कोरोना महामारीमुळे जवळपास गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंदच आहेत. विशेष म्हणजे गतवर्षी इयत्ता 10 वी आणि 12 वी बोर्ड परीक्षाही घेण्यात आल्या नाहीत. बोर्डाकडून शासनाच्या समितीने ठरवलेल्या नियमावलीनुसार मार्क देऊन विद्यार्थ्यांना पास करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच या परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे.

महाराष्ट्र सरकारने 17 ऑगस्टपासून राज्यातील 8 ते 12 वीच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात घोषणा केली होती. मात्र, अद्यापही यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे, अजूनही स्टडी फ्रॉम होमच सुरू आहे. राज्यातील इयत्ता 1 ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करण्याबाबत अद्यापही निश्चितता नाही. त्यामुळे, मुलांच्या सर्वांगिण विकासाचा प्रश्न उद्भवत आहे.

आगामी दशकांपर्यत देशासाठी त्रासदायक ठरू शकतो:
विशेष म्हणजे रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी शाळा बंद असल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. शाळांच्या मुद्यावरून गंभीर इशाराच त्यांनी दिला आहे. शाळा पुन्हा सुरू करण्यास आणि मुलांच्या शिक्षणात गती आणण्यात आणखी बिलंब हा आगामी दशकांपर्यत देशासाठी त्रासदायक ठरू शकतो, असे राजन यांनी म्हटले आहे. राजन यांनी क्विंट ग्रुपचे सह-संस्थापक राघव बहल यांना दिलेल्या मुलाखतीत देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्याबद्दल आणि शैक्षणिक क्षेत्राबद्दल मोठं विधान केलं आहे. “मुलांना दीड वर्षांपासून काय शिकायला मिळालं आहे, याची कल्पना करा. समस्या फक्त एवढीच नाही की ते पुढे जात नाहीत, पण ते विसरतही आहेत.

तुम्ही परत गेल्यावर कदाचित तीन वर्ष मागे असाल:
जर तुम्ही दीड वर्षापासून शाळेबाहेर असाल, तर तुम्ही परत गेल्यावर कदाचित तीन वर्ष मागे असाल.”, असे राजन यांनी या मुलाखतीत म्हटले आहे. “मला खरोखरच आशा आहे की राज्य आणि केंद्र सरकार या मुलांना शाळेत परत कसे आणता येईल, विशेषत: गरीब घटकांबद्दल खूप विचार करत आहे. अन्यथा आपल्याकडे मुलांची एक हरवलेली पिढी आहे.”, असे राजन यांनी म्हटलं.

अन्यथा आपल्याकडे मुलांची एक हरवलेली पिढी आहे:
मला खरोखरच आशा आहे की राज्य आणि केंद्र सरकार या मुलांना शाळेत परत कसे आणता येईल, विशेषत: गरीब घटकांबद्दल खूप विचार करत आहे. अन्यथा आपल्याकडे मुलांची एक हरवलेली पिढी आहे.”, असे राजन यांनी म्हटलं. मार्च २०२० मध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून भारतातील शाळा बंद आहेत. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे यंदाच्या वर्षीही शाळा सुरू करण्याबाबतचा विचारही दुसऱ्या लाटेमुळे फोल ठरला. यूनिसेफच्या मते शाळा बंद असल्याने देशभरातील जवळपास २५ कोटी मुलांवर याचा परिणाम झाला आहे. तर, डिजिटल शिक्षणप्रणाली परिणामकारक नसल्याचं सिद्ध झालंय.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Impact because of closed schools since last two years said RBI former governor Raghuram Rajan news updates.

हॅशटॅग्स

#School(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x