17 September 2024 12:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shraddha Arya | दिपीकानंतर अभिनेत्री श्रद्धा आर्यने दिली गूडन्यूज; बीचवरचा दोघांचा 'तो' व्हिडियो होतोय वायरल - Marathi News BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राइस नोट करा - Marathi News NMDC Share Price | झटपट कमाईची मोठी संधी, NMDC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, संधी सोडू नका - Marathi News Post Office Saving Scheme | 1 हजाराच्या गुंतवणुकीवर दर महिन्याला सलग 5 वर्ष मिळतील रु.20000; फायदा घ्या - Marathi News Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअरमध्ये तेजी, कंपनीबाबत अपडेट, स्टॉक रॉकेट स्पीडने देणार परतावा - Marathi News Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरची जादू, 1 वर्षात 1 लाख रुपयांचे झाले 2.3 कोटी रुपये - Marathi News EPFO Passbook | नोकरदारांनो! EPF बॅलेन्स चेक करण्यासाठी हे 4 मार्ग आहेत बेस्ट, घरबसल्या होईल काम - Marathi News
x

अ‍ॅमेझॉन करणार आता फूड डिलीव्हरी!

Zomato, Uber, Swiggy, Amazon, Food Delivery

मुंबई : मध्यंतरीच्या काळात भारतात विविध फूड डीलेव्हरी अँप्सने जोरदार प्रगती केली. स्विगी, झोमॅटो, सारख्या अँप्सने कित्येकांची मने जिंकली. ह्या फूड डीलेव्हरी अँप्सच्या स्पर्धेत आता अजून एक स्पर्धक येतो आहे तो म्हणजे अ‍ॅमेझॉन. अ‍ॅमेझॉनने त्यांच्या ह्या नवीन उद्योगाची सुरुवात ही सप्टेंबर पासून करायची असे ठरविले असून, उबरने २०१७ साली सुरु केलेल्या उबर इट्स ह्या फूड डीलेव्हरी सर्व्हिसला विकत घेण्याच्या विचारात आहे.

अ‍ॅमेझॉनने त्यांची अमेरिकेतील फूड डीलेव्हरी सेवा बंद केली असून, भारतात ऑनलाईन फूड ऑर्डरचा वाढता कल लक्षात घेता ही सेवा भारतात सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अ‍ॅमेझॉनने उद्योजक नारायण मूर्ती स्थापित कॅटरमन या कंपनीसोबत भागीदारी करणार आहे.

एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार अमेझाॅन भारतात आपली फूड डिलिव्हरी लाँच करण्यासाठी नारायण मूर्ती यांची कंपनी कॅटामारनसोबत काम करण्याची आखणी करतेय. कॅटामारननं यासाठी नव्या कर्मचाऱ्यांची भरती सुरू केलीय. याबद्दलची माहिती अजून सार्वजनिक केलेली नाही. भारतात ऑनलाइन फूड डिलिव्हरी सेवेची बाजारपेठ गेल्या दोन वर्षात जोरदार सुरू आहे. गेल्या वर्षी या क्षेत्रात दुप्पट वृद्धी पाहायला मिळाली होती. ती अजून तशीच आहे.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x