12 January 2025 1:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Mutual Fund | 4000 गुंतवणुकीतून 20 लाखांचा फंड तयार होण्यासाठी किती वर्षांचा काळ लागेल, पैशाने पैसा वाढवा Post Office Scheme | दुप्पटीने पैसे वाढवणारी पोस्टाची सुपरहिट योजना; पडेल पैशांचा पाऊस, सविस्तर कॅल्क्युलेशन पहा Credit Card Alert | 'या' व्यक्तींनी चुकूनही क्रेडिट कार्डचा वापर करू नये; कर्ज तर वाढेलच आणि सिबिल स्कोर देखील खराब होईल Home Loan Prepayment | गृहकर्ज मुदतीपूर्वी फेडताय, प्री-पेमेंट करण्यापूर्वी जाणून घ्या पेनल्टी चार्जेस किती भरावे लागतील SBI Bank Scheme | SBI बँकेच्या नव्या योजनेचा फायदा घ्या; केवळ 80 रुपयांच्या गुंतवणुकीतून बनाल लाखांचे मालक SIP Mutual Fund | 1000, 2000, 3000 आणि 5000 रुपयांची SIP किती कोटी रुपये परतावा मिळेल, जाणून घ्या रक्कम EPFO ELI Scheme | खासगी नोकरी करणाऱ्यांसाठी फायद्याची बातमी, EPFO इन्सेन्टिव्ह देणार, आजच फायदा घ्या
x

सीएनजीवर मोदी सरकारची वक्रदृष्टी! आता सीएनजी वाहन धारकांचे बुरे दिन

नवी दिल्ली : प्रदूषणाला आळा बसावा म्हणून सीएनजी वाहनांना प्रोत्साहन दिल गेलं. अनेक वाहन धारक ज्याच्या गाड्या सीएनजीवर चालतात म्हणून खुश होते. परंतु त्यांना सुद्धा पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांसारखं महागडं सीएनजी भराव लागणार आहे. मोदी सरकारने दिल्लीमध्ये सीएनजीचा दर प्रती किलो १.७० रुपयांनी वाढविला असून नोएडामध्ये १.९५ रुपयांनी दर वाढले आहेत.

आधीच पेट्रोल डिझेलच्या भावाने सामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. भारतीय रुपयाचे अवमुल्यन तसेच आंतराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाच्या वाढत्या किमती आणि परिणामी वाढत चाललेले भाव इंधनाच्या दरांवर परिणाम करत असून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. मुंबईत पेट्रोलचे दर ९०.८४ आणि डिझेल ७९.४० वर पोहोचले आहेत. तर सीएनजी ४४.२२ च्या आसपास आहे.

त्यामुळे सीएनजीची ही दरवाढ देशभरात लागू झाल्यास आज मध्यरात्रीपासून देशभरात प्रती किलोला ४६ रुपयांच्या आसपास सीएनजी विकला जाणार आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि त्यात महागाईने पिसाळ गेलेला सामान्य माणूस आता सीएनजीच्या दरवाढीमुळे पुरता कोसळणार आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x