27 December 2024 8:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

मोदींच्या नव्या भारतातील GDP'ला बांग्लादेशचा GDP सुद्धा पिछाडीवर टाकणार

India's GDP, Bangladesh GDP, Per Capita GDP, IMF

नवी दिल्ली, १४ ऑक्टोबर : भारताचा शेजारी असणारा बांग्लादेश लवकरच भारताला ‘सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या’ (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट अर्थात जीडीपी) बाबतीत पिछाडीवर टाकणार आहे. २०२० च्या आर्थिक वर्षात करोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. मात्र आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) आकडेवारीनुसार बांग्लादेशच्या जीडीपीमध्ये चार टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. सन २०२० मध्ये बांग्लादेशचा जीडीपी १.८८८ डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे करोनामुळे आर्थिक फटका बसलेल्या भारताचा जीडीपी उणे १०.५ टक्क्यांपर्यंत घसरणार असून ते १.८७७ डॉलरपर्यंत घसरणार असल्याचे सांगितले जात आहे.

मागील चार वर्षांमध्ये ही भारताची सर्वात वाईट कामगिरी असणार आहे. असं झाल्यास भारत हा दक्षिण आशियामधील तिसरा सर्वात गरीब देश ठरेल. सध्या दक्षिण आशियातील गरीब देशांच्या यादीमध्ये पाकिस्तान आणि नेपाळ भारताच्या वर असतील. बांग्लादेशबरोबरच भूतान, श्रीलंका आणि मालदीवही जीडीपीच्या बाबतीत भारतापेक्षा सरस कामगिरी करतील असं सांगितलं जात आहे.

आयएमएफच्या आकडेवारीनुसार दक्षिण आशियामध्ये करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा समावेश आहे. श्रीलंकेला सर्वाधिक फटका बसला असून त्या खालोखाल भारताचा क्रमांक लागत असल्याचे आयएमएफची आकडेवारी सांगते. नेपाळ आणि भूतानच्या अर्थव्यवस्थेमध्ये या वर्षी सकारात्मक वाढ होणे अपेक्षित असल्याचे दिसून येत आहे. आयएमएफने पाकिस्तानच्या आर्थिक विकासाची आकडेवारी मात्र उघड केलेली नाही. भारताची आर्थिक परिस्थिती आता पुढील आर्थिक वर्षात सावरेल असा अंदाज आयएमएफने व्यक्त केला आहे. त्यामुळे भारताचा जीडीपी बांग्लादेशच्या पुढे जाण्यासाठी सन २०२१ चे आर्थिक वर्षापर्यंत वाट पहावी लागणार आहे. त्यानंतरही अगदी थोड्या फरकानेच भारत बांग्लादेशच्या पुढे असेल.

विशेष म्हणजे पाच वर्षांपूर्वी भारताचा जीडीपी हा बांग्लादेशपेक्षा ४० टक्क्यांनी अधिक होता. मागील पाच वर्षांमध्ये बांग्लादेशच्या जीडीपीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दर वर्षी बांग्लादेशच्या जीडीपीमध्ये ९.१ टक्क्यांनी वाढ होत आहे. भारताच्या जीडीपीवाढीचा याच काळातील दर ३.२ टक्के इतका आहे. यामुळेच भारत आणि बांग्लादेशमधील जीडीपीमधील तफावत वेगाने कमी झाली आहे. निर्यात क्षेत्रात बांग्लादेशने मोठी मजल मारली आहे. नेमका याच विषयाला अनुसरून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारला कात्रीत पकडल्याचे पाहायला मिळत आहे.

 

News English Summary: Bangladesh is set to beat India in terms of per capita gross domestic product (GDP) this calendar year, thanks to a sharp contraction in the Indian economy due to Covid-19 and the economic lockdown. According to International Monetary Fund (IMF)-World Economic Outlook (WEO), Bangladesh’s per capita GDP in dollar terms is expected to grow 4 per cent in 2020 to $1,888. India’s per capita GDP, on the other hand, is expected to decline 10.5 per cent to $1,877 – the lowest in the last four years. The GDP figure for both countries is at current prices. This makes India the third poorest country in South Asia, with only Pakistan and Nepal reporting lower per capita GDP, while Bangladesh, Bhutan, Sri Lanka, and Maldives would be ahead of India.

News English Title: India Set To Slip Below Bangladesh In 2020 Per Capita GDP Says IMF News updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x