BREAKING | मोदींचा नवा भारत जगातील सर्वात प्रभावशाली देशांच्या यादीतून बाहेर
सिडनी, २१ ऑक्टोबर: लॉकडाउनमुळे भारताला बसलेल्या आर्थिक फटक्याच्या पार्श्वभूमीवर आणखी एक चिंता वाढविणार वृत्त समोर आलं आहे. कारण सामर्थ्यशाली देशांच्या यादीमधून भारत बाहेर फेकला गेला आहे. भारत हा आशियामधील चौथा सर्वात शक्तीशाली देश ठरला आहे. सिडनीमधील लोवी इन्स्टिट्यूटने केलेल्या अभ्यासामध्ये आशियामधील सर्वात प्रभावशाली देशांची यादी जाहीर केली आहे.
आशिया पॉवर इंडेक्स फॉर २०२० हा अहवाल सादर झाला असून आशिया पॅसिफिक प्रदेशामध्ये भारत हा अमेरिका, चीन आणि जपाननंतर चौथा सर्वात प्रभावशाली देश ठरला आहे. मात्र सर्वात सामर्थ्यशाली म्हणजेच मेजर पॉवर हा दर्जा भारताने गमावला आहे. ४० हून अधिक गुण असणाऱ्या देशांना प्रभावशाली देशांच्या यादीत स्थान दिलं जातं. मागील वर्षी भारताला ४१ गुण होते तर यंदा यामध्ये १.३ ची घट झाली असून भारताला २०२० मध्ये ३९.७ गुण मिळाले आहेत. आशिया पॅसिफिकमध्ये करोनामुळे सरासार परिस्थिती खालावत चाललेल्या १८ देशांमध्ये भारताचा समावेश आहे.
लॉकडाउनमुळे देशाच्या आरोग्य आणि आर्थिक परिस्थितीवर मोठा ताण पडला असून यामुळेच भारताचा विकास मंदावला आहे असं लोवी इन्स्टिट्यूटने आपल्या अहवालात म्हटलं आहे. चीनच्या तुलनेत भारत म्हणावा तसा विकास करत नसल्याचेही या अहवालात म्हटलं आहे. “लोकसंख्येच्या दृष्टीने चीनच्या बरोबरीने उभा राहणार भारत हा एकमेव देश असला तरी विकासाच्या बाबतीत तो पुढील काही वर्षांमध्ये चीनची बरोबर करु शकणार नाही. २०३० पर्यंत भारत हा चीनच्या ४० टक्के विकास करु शकतो असं या अहवालात म्हटलं आहे. २०१० च्या आशिया पॉवर इंडेक्समध्ये हा विकासदर ५० टक्के असेल असं नमूद करण्यात आलं होतं. मात्र आता यामध्ये घट होणार असून तो ४० पर्यंत राहण्याचा अंदाज आहे.
सामर्थ्याच्या दृष्टीने भारत हा मध्यम स्तरामधील देश असल्याचा उल्लेख या अहवालात आहे. “आशियामधील सर्वाधिक लोकसंख्येच्या यादीत दुसऱ्या स्थानी असणारी हा देश चांगली कामगिरी करणारा इंडो पॅसिफिकमधील मध्यम स्तरावरील देश आहे,” असा उल्लेख या अहवालात आहे. पुढील काही वर्षांमध्ये भारताला प्रमुख शक्तीशाली देश म्हणून मान्यता मिळण्यासाठी वाट पहावी लागण्याची शक्यता आहे असंही यात म्हटलं आहे. २०३० पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ही आधी व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा १३ टक्के कमी विकास करेल असंही अहवालात म्हटलं आहे. जागतिक स्तरावर भारताचा प्रभाव कमी झाला असला तरी आशिया खंडातील भारताचा प्रभाव वाढत असल्याचे अहवालात म्हटलं आहे. भारताचे संरक्षण क्षेत्र आणि आर्थिक समिकरणे अधिक मजबूत होत असल्याचं यामध्ये म्हटलं आहे.
तत्पूर्वी, एप्रिल ते जून या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासदराने उणे २३.९ टक्के ऐतिहासिक निचांकी पातळी गाठली. ४० वर्षांत पहिल्यांदाच जीडीपीमध्ये इतकी मोठी घसरण झाली आहे. अर्थव्यवस्थेतील प्रमुख क्षेत्रांची तुलना करायची झाल्यास बांधकाम, उत्पादन आणि खाणकाम क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला होता. मात्र त्या बातमीनंतर भारतीय अर्थव्यवस्थेच्या बाबतीत दुसरी चिंता वाढवणारी बातमी समोर आली होती.
देशातील व्यापार आणि व्यवसायिक वातावरणाच्या स्वातंत्र्यासंदर्भातील परिस्थितीमध्ये भारताची जागतिक स्तरावर घसरण झाली आहे. आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकात भारत २६ स्थानांनी घसरला आहे. वेगवेगळ्या देशांमधील व्यवसायिक वातावरण किती पोषण आणि देशातील आर्थिक परिस्थिती संबंधित मूल्यमापन करणाऱ्या कॅनडामधील फ्रेजर इन्स्टिटयूटने प्रकाशित केलेल्या ‘ग्लोबल इकनॉमिक फ्रिडम इंडेक्स’मध्ये भारत २६ क्रमांकांनी घसरुन १०५ व्या क्रमांकावर गेला आहे. या अहवालामध्ये १६२ देशांचा समावेश आहे. मागील वर्षी भारत ७९ क्रमांकावर होता. या यादीमध्ये हाँगकाँग आणि सिंगापूरसारखे लहान देश अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. अनेक छोटे देश हे या यादीमध्ये भारतापेक्षा बरेच पुढे असल्याचे दिसत होते.
Canada lags behind U.S. in economic freedom, China
threatens Hong Kong’s top rank in annual report. https://t.co/AY1Mf2bekR— The Fraser Institute (@FraserInstitute) September 10, 2020
मागील एका वर्षाच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या देशांमधील सरकारांनी व्यवसाय आणि उद्योगांचा विस्तार, कायदेशीर यंत्रणा आणि संपत्तीसंदर्भातील अधिकार, जागतिक स्तरावरील व्यापाराचे स्वातंत्र्य, आर्थिक मोबदला, मनुष्यबळ आणि व्यवसाय यासारख्या व्यवसायाशी संंदर्भात महत्वाच्या मुद्द्यांवर हा अहवाल सादर केला जातो. या सर्वच बाबतीत मागील वर्षभरामध्ये भारताची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नसल्याचे अहवालात म्हटलं होते. या अहवालासंदर्भातील वृत्त पीटीआयने दिलं होतं.
News English Summary: India stands as the fourth most powerful country in Asia but falls just short of the major power threshold in 2020, a study showed. According to the Sydney-based Lowy Institute’s Asia Power Index for 2020, although India is the fourth most powerful nation in the Asia-Pacific following the US, China and Japan, it stops short of attaining the “major power” status in the said year (2020).
News English Title: India Stops Short Of Major Power Status In Asia China Way Ahead News Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY