16 January 2025 1:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

हल्ल्यानंतर किती ठार झाले ते मोजण्याचे काम हवाई दलाचे नाही, ते सरकारचे काम

Pakistan, IAF, PAF, Pulawama Attack

नवी दिल्ली : भारतीय वायुदलाने बालकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर केलेली कारवाई कितपत परिणामकारक ठरली यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यावर वायुदल प्रमुख बीरेंद्र सिंग धनोआ यांनी ध्येयावर थेट प्रहार केल्यानंतर त्यात किती जण मारले गेले ते मोजण्याचे काम वायुदल करत नाही. ते काम सरकारचे असते त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

आम्ही केवळ ठरवलेल्या लक्ष्यावर प्रहार झाला की नाही, ते आमच्यासाठी सर्वात महत्वाचे आहे असे धनोआ यावेळी म्हणाले. भारतीय वायुदलाने जैश-ए-मोहम्मदच्या तळावर केलेला हल्ला तसेच पाकिस्तानच्या ताब्यातून विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका झाल्यानंतर आज पहिल्यांदा हवाई दल प्रमुखांनी पत्रकार परिषद घेतली.

आम्ही लक्ष्य ठरवल्यानंतर केवळ त्यावरच प्रहार करतो. पाकिस्तानातील बालकोटमध्ये आम्ही लक्ष्यावर अचूक प्रहार केला. जर आम्ही जंगलामध्ये बॉम्ब टाकले असते तर मग पाकिस्तानने त्यावर प्रतिक्रिया का दिली? असा थेट सवाल हवाई दल प्रमुख बीरेंद्र सिंग धनोआ यांनी उपस्थित केला. मिग-२१ बायसन हे पूर्णपणे सक्षम विमान आहे. ते अपग्रेड करण्यात आले आहे. चांगल्या दर्जाच्या रडारसह, हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आणि चांगल्या शस्त्रास्त्रांनी हे विमान सुसज्ज आहे असे हवाई दल प्रमुखांनी सांगितले.

एक ठरवलेले ऑपरेशन असते. ज्याचे नियोजन तुम्ही करता आणि ते प्रत्यक्षात आणतो. परंतु जेव्हा शत्रू तुमच्यावर हल्ला करतो तेव्हा उपलब्ध असलेल्या प्रत्येक फायटर विमानाकडून उत्तर दिले जाते. मग ते फायटर विमान कुठलेही असो. आपली सर्व फायटर विमाने शत्रूचा मुकाबला करण्यास सक्षम आहेत असे हवाई दल प्रमुखांनी सांगितले.

हॅशटॅग्स

#India Pakistan(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x