21 November 2024 11:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

चिंता वाढली! भारताचा GDP दोन वर्ष केवळ एक टक्क्यांनी वाढणार – IMF

Indias GDP, IMF Chief Economist Gita Gopinath

वॉशिंग्टन, २६ जून : कोरोना आपत्तीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होणार याचे संकेत अनेक जागतिक संघटनांनी दिले होते. त्याला आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडून दुजोरा मिळत असल्याचं दिसत आहे. त्यानुसार भारताचा जीडीपी दोन वर्ष फक्त एक टक्क्यांनी वाढणार असं वक्तव्य आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी केलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेला अनपेक्षित असा फटका बसला आहे. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था दोन वर्षे धीम्या गतीने प्रगती करेल तसंच भारताचा जीडीपी पुढची दोन वर्षे अवघा एक टक्क्याने वाढेल असं त्यांनी म्हटलं आहे.

सध्याच्या करोनाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात करोनाच्या चाचण्या वाढवल्या पाहिजेत असाही एक सल्ला गीता गोपीनाथ यांनी दिला आहे. एवढंच नाही तर अर्थव्यवस्थेत सुधारणा आणायच्या असतील तर लघू आणि मध्यम उद्योग करणाऱ्यांना आणखी आर्थिक उभारी द्यावी लागेल असंही त्यांनी सुचवलं आहे.

 

News English Summary: Geeta Gopinath, chief economist at the International Monetary Fund, has said that India’s GDP will grow by only one per cent in two years. He made this statement in an interview to a news channel.

News English Title: Indias GDP To Grow At Mere 1 Percent In Two Years Says IMF Chief Economist Gita Gopinath News latest Updates.

हॅशटॅग्स

#IMF(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x