20 September 2024 3:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | L&T कंपनीची ऑर्डर बुक मजबूत झाली, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC शेअर्स खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, फायद्याची अपडेट - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell? - Marathi News Smart Investment | सरकारी योजनेत अवघ्या 200 रुपयांची बचत, मिळेल 28 लाख रुपयांपर्यंत परतावा, फायदा घ्या - Marathi News EPFO Login | पगारदारांनो, दरमहा एवढी EPF गुंतवणूक करा; मिळेल 3 ते 5 कोटींचा EPF फंड, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत नवीन अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, फायदा घ्या - Marathi News BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर BUY करावा की Sell - Marathi News
x

चीन अभ्यास करून मैदानात, आता भारताविरुद्ध औषधांच्या बाजापेठेसंबंधित अस्त्राचा वापर

India's pharma, China, India, Ladakh

नवी दिल्ली, २२ जून : गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैन्यामध्ये सुरु असलेल्या संघर्षाचे पडसाद संपूर्ण देशभरात पहायला मिळत आहेत. २० भारतीय जवानांना या संघर्षात हौतात्म्य पत्करावं लागलं. यानंतर संपूर्ण देशभरात चिनी मालावर बहिष्कार घालण्याची मागणी सुरु झाली. अनेक शहरातील बाजारपेठांमध्ये दुकानदारांनी चिनी माल न विकण्याचा निर्णय घेतला.

मात्र चिनी मालावर एकदम बहिष्कार घालणं शक्य नसल्याचं मत, क्रीडा क्षेत्रात साहित्य बनवणाऱ्या उत्पादकांचं आहे. भारतीय क्रीडा क्षेत्रात जवळपास ५० टक्के माल हा चीनमधून आयात केला जातो. ज्यात टेबल टेनिसचे बॉल, शटलकॉक, बॅडमिंटन आणि टेनिस रॅकेट, कुस्तीची मॅट, भाले, जिम एक्विपमेंट अशा अनेक गोष्टी चीनमधून भारतामध्ये आयात केल्या जातात. मात्र त्याहूनही धक्कादायक माहिती समोर आली असून, भारताला थेट विरोध करण्यापूर्वी चीनने सखोल अभ्यास आणि तयारी केल्याचं पाहायला मिळत आहे.

कारण कोरोनामुळे आधीच देशातील आरोग्य व्यवस्थेचं कंबरडं मोडलं आहे. कोरोनामुळे अनेक राज्यांच्या आरोग्य व्यवस्था पूर्णपणे व्यापून गेलेल्या असताना त्यासंबंधित औषधं देखील अपुरी पडत आहेत. मात्र विषय केवळ कोरोना संबंधित औषधांचा नसून सर्वच प्रकारच्या औषधांच्या उत्पादनाचा आहे. कारण भारतातील औषधं उत्पादन कंपन्या तब्बल ७० टक्के API चीनकडून आयात करतात आणि जगाच्या तुलनेत तेच सर्वाधिक स्वस्त आहेत. मात्र भविष्यात चीन भारतातील आरोग्य व्यवस्थेला चक्रव्यूहात अडकविण्याची रणनीती आखात आहे. त्यामुळे भारतातील औषध उत्पादक आणि सामान्य नागरिकांचा खिसा खाली होऊ शकतो.

कारण भारताचे फार्मा क्षेत्र पूर्णपणे चीनवर अवलंबून आहे. भारतीय औषध कंपन्या त्यांच्या गरजेच्या ७० टक्के API चीनकडून आयात करतात. गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसाचारानंतर चीनने या उत्पादनांच्या किंमती वाढवण्यास सुरुवात केली आहे. भारत चीनवर अनेक बाबींसाठी अवलंबून आहे. त्यामुळे आता चीनकडून त्याचा गैरफायदा घेतला जात आहे. भारत दरवर्षी सुमारे ३९ अब्ज डॉलर्स किमतीचे औषध तयार करतो. औषध तयार करण्यासाठी आवश्यक स्टार्टिंग मटेरियल, API साठी भारत मुख्यत्वे चीनवर अवलंबून आहे.

भारताने आर्थिक वर्ष २०१९ मध्ये चीनकडून सुमारे १७,४०० कोटी (2.5 अब्ज डॉलर्स) API आयात केले होते. भारत जगातील तिसरा मोठा औषध उत्पादक देश आहे. डॉक्टर रेड्डी लॅब, ल्युपिन, ग्लेनमार्क फार्ममा, मायलन, झाइडस कॅडिला आणि पीफायझर सारख्या भारतातील आघाडीच्या औषध कंपन्या API साठी मुख्यतः चीनवर अवलंबून आहेत. वाणिज्य व उद्योग मंत्रालयांतर्गत फार्मास्युटिकल एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे अध्यक्ष दिनेश दुआ यांनी दिलेल्या माहितीनुसार, गलवान खोऱ्यातील घटनेसंदर्भात चीन दोन प्रकारे हल्ला करत आहे.

एकीकडे तो सीमेवर हल्ला करीत आहे आणि दुसरीकडे भारत अवलंब असल्याचा गैरफायदा घेऊ लागला आहे. API च्या किंमती वाढल्याने औषधांच्या किमती वेगाने वाढू लागल्या आहेत. Paracetamol ची किंमत २७ टक्के, ciprofloxacin ची किंमत २० टक्के, penicillin G ची किंमत २० टक्के याच्या किंमतीत वाढ झाली आहे. याशिवाय प्रत्येक प्रकारच्या फार्मा प्रोडक्टच्या किंमतीत जवळपास २० टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

 

News English Summary: India’s pharma sector is completely dependent on China. Indian pharmaceutical companies import 70 per cent of their APIs from China. China has started raising the prices of these products after the violence in the Galvan Valley. India is dependent on China for many things. So now it is being taken advantage of by China.

News English Title: Indias pharma sector is completely dependent on China News Latest Updates.

हॅशटॅग्स

#IndiaChina(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x