23 February 2025 10:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

आनंद महिंद्रांचा WhatsApp ला रामराम | सिग्नल अँप इन्स्टॉल

Industrialist Anand Mahindra, installed signal, messaging app, Whatsapp privacy policy

नवी दिल्ली, १२ जानेवारी: अलिकडे व्हॉट्सअँपने आपली प्रायव्हसी पॉलिसी अपडेट केली असून त्याबद्दल सर्व युजर्संना इन-अँप नोटीफिकेशन मिळत आहे. व्हॉट्सअँपवर आपल्या परेन्ट कंपनी फेसबुक सोबत डेटा शेअर करणार असल्याचे या अपडेटेड पॉलिसीमध्ये नमूद केले आहे. सध्या होत असलेल्या ऑनलाईन फ्रॉड्स आणि डेटा हॅकिंगमुळे बहुतांश लोकांनी व्हॉट्सअँपला पर्यायी अँप शोधण्याचे काम सुरु केले आहे. दरम्यान, टेलिग्राम आणि सिगनल अँप प्रचलित होत आहेत. या अपडेटेड पॉलिसीचा खरा अर्थ काय? फेसबुक सोबत कोणता डेटा शेअर करणार? युजरकडून कोणता डेटा घेणार? व्हॉट्सव्हॉट्सअँप अँप युजर्सचे खाजगी मेसेजेस वाचू शकतो का? असे अनेक प्रश्न सर्वांना पडले आहेत.

दुसरीकडे कंपनीने आपल्या नवीन पॉलिसीबाबत पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलं आहे. पॉलिसीमध्ये बदल झाल्याने मित्र किंवा कुटुंबियांसोबत केलेल्या तुमच्या चॅटिंगच्या गोपनियतेवर कोणताही परिणाम होत नाही, असं स्पष्टीकरण WhatsApp कडून देण्यात आलं आहे. नवीन पॉलिसी केवळ बिजनेस युजर्ससाठी आहे असा दावाही कंपनीने केलाय.

दरम्यान, महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी यासंदर्भातील माहिती ट्विटरवरून दिली आहे. ”आता मी सिग्नल अॅप डाऊनलोड केले आहे. लवकरच तेथे भेटू”, असे ट्विट आनंद महिंद्रा यांनी केले आहे. यानंतर नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया यावर आल्या असून, काही जणांनी आनंद महिंद्रा यांची फिरकी घेतली आहे, तर काही जणांनी आनंद महिंद्रा यांच्या कृतीला समर्थन दिले आहे.

 

News English Summary: Anand Mahindra, Chairman, Mahindra & Mahindra, shared the news on Twitter. “Now I have downloaded the Signals app. See you there soon, “tweeted Anand Mahindra. This has been followed by a flurry of reactions from netizens, with some taking Anand Mahindra’s spin, while others supporting Anand Mahindra’s action.

News English Title: Industrialist Anand Mahindra installed signal messaging app Whatsapp privacy policy news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Business(49)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x