17 April 2025 1:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर्समध्ये हलकी तेजी, लॉन्ग टर्ममध्ये 400% रिटर्न दिला, अपडेट जाणून घ्या - NSE: GTLINFRA Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा
x

महाराष्ट्रनामाचं वृत्त खरं ठरलं, चिनी कंपन्यांसोबतचे करार राज्य सरकारकडून रद्द नाहीच

China, MoU Agreement, Subhash Desai

मुंबई, २२ जून : चिनी कंपन्यांसोबत करण्यात आलेले करार रद्द करण्यात आलेले नाहीत अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. हे करार तूर्तास जैसे थे ठेवण्यात आले आहेत, याचा अर्थ ते रद्द केले असा नसून त्यावरील पुढील कार्यवाही प्रतीक्षाधीन आहे असं सुभाष देसाई यांनी स्पष्ट केलं आहे. हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या चीन येथील तीन कंपन्यांसोबत महाराष्ट्र शासनाने १५ जून रोजी केलेले सामंजस्य करार तूर्तास जैसे थे ठेवण्यात आले आहेत अशी माहिती सुभाष देसाई यांनी दिली आहे.

तत्पूर्वी अनेक प्रसार माध्यमांनी ठाकरे सरकारचा चीनला दणका शीर्षकाने वृत्त प्रसिद्ध करून संबंधित करार थेट रद्द करण्यात आल्याचं म्हटलं. मात्र महाराष्ट्र नामाच्या टीमला मिळालेल्या खात्रीलायक माहितीनंतर सदर वृत्त केवळ स्थगिती संबंधित असल्याची बातमी प्रसिद्ध करण्यात आली आणि त्याला राज्य सरकारकडूनच अधिकृत दुजोरा मिळाला आहे. राज्यांच्या आर्थिक स्थिती अत्यंत हलाकीच्या असल्याने असे भावनिक निर्णय परवडणारे नाहीत हे देखील वास्तव अर्थ तज्ज्ञांनी बोलून दाखवलं.

 

News English Summary: Industry Minister Subhash Desai has said that the agreements with Chinese companies have not been canceled. Subhash Desai has clarified that these agreements have been kept as they are, which does not mean that they have been canceled, but further action on them is awaited.

News English Title: Industry Minister Subhash Desai has said that the agreements with Chinese companies have not been canceled News latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SubhashDesai(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या