23 December 2024 12:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

सर्व्हे | मोदी पंतप्रधान झाल्यापासून महागाई नियंत्रणाबाहेर | ७२.१ टक्के लोकं नाराज

Inflation, Control, Modi Govt, IANS C voters survey

नवी दिल्ली, ०१ फेब्रुवारी: Budget 2021 LIVE : कोरोना प्रादुर्भावामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर यांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार आपल्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प सादर करणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सकाळी 11 वाजता सर्वसाधारण अर्थसंकल्प लोकसभेत सादर करण्यास सुरुवात केली आहे. कोरोना महामारी, अर्थव्यवस्थेचे रुतलेले चाक आणि बेरोजगारीचा गंभीर प्रश्न या सर्व समस्यांवर उपाय म्हणून यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. दुसरीकडे ज्या मुद्यांवर मोदी सरकार सत्तेत आलं त्याकडे सध्या मोदी सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचं पाहायला मिळतंय.

दुसरीकडे वाढत्या महागाईमुळे सामान्य लोकं मोदी सरकारवर प्रचंड नाराज असल्याचं पाहायला मिळतंय. मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशातील महागाई अनियंत्रित झाल्याचं मत तीन चतुर्थांश लोकांनी व्यक्त केलं आहे. आयएएनएस-सी व्होटरनं अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर एक सर्व्हे केला होता. मोदी पंतप्रधान झाल्यापासून महागाईत नियंत्रणाबाहेर गेल्याचं ७२.१ टक्के लोकांना वाटतं. २०१५ मध्ये हेच प्रमाण १७.१ टक्के होतं. मोदींच्या कार्यकाळात वस्तू आणि सेवांच्या किमती कमी झाल्याचं मत केवळ १०.८ टक्के व्यक्त केलं होतं. तर १२.८ टक्के लोकांनी काहीच बदललं नसल्याचं म्हटलं आहे. २०१४ नंतर पहिल्यांदाच आर्थिक आघाडीवर सरकारची कामगिरी इतकी खराब झाली आहे.

पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या कार्यकाळात देशाची आर्थिक आघाडीवरील कामगिरी अपेक्षेपेक्षा खराब झाल्याचं मत ४६.४ टक्के लोकांनी व्यक्त केलं. सरकारची कामगिरी अपेक्षापेक्षा चांगली असल्याचं केवळ ३१.७ टक्के जणांना वाटतं. गेल्या १० वर्षांतील ही सर्वात वाईट कामगिरी आहे. महागाई वाढल्याचा अतिशय जास्त परिणाम झाल्याचं मत ३८.२ टक्के लोकांनी व्यक्त केलं. तर ३४.३ टक्के जणांना थोडा परिणाम झाल्याचं वाटतं.

 

News English Summary: Due to rising inflation, ordinary people are very angry with the Modi government. Three-quarters of the people have expressed the view that inflation has become uncontrollable since Modi became the Prime Minister. IANS-C voters conducted a survey on the background of the budget. 72.1 per cent people think that inflation has gone out of control since Modi became the Prime Minister. In 2015, it was 17.1 per cent. Only 10.8 per cent had expressed the view that prices of goods and services had come down during Modi’s tenure. 12.8 per cent said nothing had changed. For the first time since 2014, the government’s performance on the economic front has deteriorated so much.

News English Title: Inflation has gone out of control since Modi became the Prime Minister said IANS C voters survey news updates.

हॅशटॅग्स

#Budget 2021-22(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x