15 January 2025 10:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

गुप्तचर यंत्रणांचा इशारा! जैश-ए-मोहम्मद मोठा हल्ला करण्याच्या तयारीत

Narendra Modi, Guajarat, Pulawama Attack, Bharatiya Janata party

जम्मू : पुलवामा दहशतवादी हल्ल्यात यश मिळाल्याने जैश-ए-मोहम्मदने आधीपेक्षा देखील भयानक आत्मघाती हल्ला करण्याची मोठी योजना आखल्याची खात्रीलायक माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. त्यानुसार १६ ते १७ फेब्रुवारीदरम्यान जैश-ए-मोहम्मदच्या प्रमुखांची आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांमध्ये संभाषण झालं असून त्याआधारेच गुप्तचर यंत्रणांनी सदर इशारा दिला आहे. १४ फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे तब्बल ४० जवान शहीद झाले.

गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी भारतीय सुरक्षा दलाला अजून मोठं नुकसान पोहोचवण्यासाठी आणखी एका आत्मघाती हल्ल्याची योजना आखली आहे. संभाषणावरुन जम्मू किंवा जम्मू काश्मीरच्या बाहेर हा हल्ला केला जाऊ शकतो असा अंदाज एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दर्शवला आहे.

प्रसार माध्यमांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जैश-ए-मोहम्मद पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या तयारीचा व्हिडीओ जारी करणार आहे. या व्हिडीओमध्ये प्रामुख्याने पुलवामा दहशतवादी हल्ल्याला जबाबदार अली अहमद दारवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. २० वर्षीय अली अहमद दार यानेच स्फोटकांनी भरलेली आपली व्हॅन सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यात नेऊन धडक दिली होती. ज्यामध्ये भारताचे चाळीस जवान शहीद झाले. या व्हिडीओचा आधार घेत जैश-ए-मोहम्मद काश्मीरमधील तरुणांना संघटनेत सामील करुन घेत आत्मघाती हल्ल्यांसाठी वापर करण्याची शक्यता आहे.

दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी दहशतवाद्यांमधील संभाषण हे जाणुनबुजून भारताला घाबरवण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. मात्र गुप्तचर यंत्रणांनी इशारा दिला असल्या कारणाने त्याकडे दुर्लक्ष करु शकत नाही. हाय अलर्ट जारी करण्यात आला असून सर्व काळजी घेत असल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x