5 November 2024 8:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
x

ठाकरे सरकार आर्थिक संकटात, कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कर्ज काढावं लागेल

Difficult To Pay The Salaries, Maharashtra Government, Employees

पुणे, २ जुलै : कोरोनामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. याचा थेट परिणाम महसूलावर झाला असून सरकारी तिजोरीत खडखडाट आहे. परिणामी सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार द्यायचे कसे, असा प्रश्न सरकारला पडला आहे. यामुळे खासगी कर्मचाऱ्यांप्रमाणेच सरकारी कर्मचाऱ्यांचेही पगार लटकण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती अशीच राहीली तर सरकारला कर्ज काढून पगार वाटप करावे लागेल, अशी चिंता मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.

पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना वडेट्टीवार यांनी राज्याच्या सद्यआर्थिक परिस्थितीवर भाष्य केले. यावेळी महसूलात घट झाल्याने पुढील महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांनां वेतन देण्यासाठी कर्ज काढावे लागण्याची शक्यता वर्तवली. तसेच आरोग्य, मदत व पुनवर्सन यांसह दोन विभाग वगळता इतर विभागात पगार कपात करण्याची शक्यताही यावेळी वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. तसेच डॉक्टर, नर्स व त्यांच्याशी संबंधित कोरोना योद्धांचे पगार दिले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

करोना विषाणूमुळे राज्यातील उद्योग व्यवसाय चालणे कठीण झाले आहे. यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती गंभीर झाली असताना केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजमधील एकही पैसा अद्याप राज्याला मिळालेला नाही. त्यामुळे सध्याच्या गंभीर परिस्थितीत केंद्राने राज्याला लवकरात लवकर मदत देणं अपेक्षित आहे. मात्र, असं होताना दिसत नाही असं ते म्हणाले.

 

News English Summary: Due to the decline in revenue, it has become difficult for the government to pay the salaries of government employees in the state. Therefore, it may be time to take out a loan next month to pay their salaries, said Vijay Vadettiwar, Minister for Relief and Rehabilitation.

News English Title: It Is Difficult To Pay The Salaries Of Government Employees It May Be Time To Take Out A Loan Says Vijay Wadettivar News Latest Updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x