17 November 2024 3:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News SIP Calculator | 5 आणि 10 हजाराच्या SIP ने एकूण 10 वर्षांत किती पैसे जमा होतील, जाणून घ्या संपूर्ण कॅल्क्युलेशन - Marathi News Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत सकारात्मक संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: RELIANCE IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
x

देशात जनतेच्या १७९ कोटीची ऑनलाईन लूट, महाराष्ट्र अव्वल स्थानी.

नवी दिल्ली : सरकारने डिजिटल इंडिया च्या नावाने ढोल बडवले खरे, पण त्याच मोदी सरकारने ऑनलाईन व्यवहारासाठी लागणारी सुरक्षा आणि त्यावरील उपाय यावर किती विचार केला आहे यावरच विचार करायला लावणारी आकडेवारी समोर आली आहे.

स्वतः माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनीच ही ऑनलाईन फसवणुकीची आकडेवारी प्रसारित केली आहे. २१ डिसेंबर २०१७ पर्यंत क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि इंटरनेट बँकिंग मार्फत ऑनलाईन ग्राहकांची तब्बल १७९ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.

तर दुसरीकडे रिझर्व्ह बँकेने प्रसारित केलेल्या आकडेवारीत केवळ गेल्या ३ महिन्यात ऑनलाईन फ्रॉडची तब्बल १० हजार २२० प्रकरण समोर आली आहेत. त्यात एकूण आकडा १११. ८५ कोटी इतका आहे असे रिझर्व्ह बँकेने प्रसारित केलेल्या आकडेवारीत समोर केले आहेत.

ऑनलाईन चोरट्यांच्या एकूण डल्ल्या पैकी तब्बल १२. १० कोटी रुपये महाराष्ट्रात ऑनलाईन लुटले गेल्याचे समोर आले आहे. एक लाखांपेक्षा जास्त किमतीची ऑनलाईन लूट झालेली एकूण ३८० प्रकरणं तर एकट्या महाराष्ट्रात समोर अली आहेत.

एकूण ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये महाराष्ट्रानंतर हरियाणा (२३८ प्रकरणं), कर्नाटक (२२१ प्रकरणं), तामिळनाडू (२०८ प्रकरणं) आणि दिल्ली (१५६ प्रकरणं) समोर आली आहेत.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x