जलयुक्त शिवार योजनेची जिल्हानिहाय चौकशी सुरु | 2,417 कोटीची कामं चौकशी फेऱ्यात
मुंबई, १२ डिसेंबर: फडणवीस सरकारच्या काळात अनेक योजनांमध्ये गैरव्यवहार झाल्याची शंका महाविकास आघाडी सरकारला आहे. त्यातील एक महत्वाची योजना म्हणजे जलयुक्त शिवार योजना म्हणावी लागेल आणि विशेष म्हणजे यावर कॅगच्या रिपोर्टमध्ये देखील अनेक नकारात्मक टिपण्या करण्यात आल्या आहेत.
दोन दिवसांपूर्वी सांगलीतील पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील म्हणाले होते, ‘जलयुक्त शिवार योजनेमुळे राज्यात ७० टीएमसी जादा पाणी साठल्याची फसवी घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. ७० टीएमसी पाणी म्हणजे वारणा धरणाच्या दुपटीपेक्षा जास्त पाणी. ७० टीएमसी जादा पाणी साठवता आले असते तर, दुष्काळी भागाला त्याचा फायदा झाला असता. प्रत्यक्षात मात्र असे काहीच झालेले नाही. उलट निकृष्ट कामांमुळे जलसाठ्यांमधील गळतीचे प्रमाण वाढले. यामुळे पाणी वाहून गेले. याप्रकरणी चौकशी सुरू असून, दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार आहे.’
दरम्यान, जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीस सुरुवात झाली आहे. मराठावाड्यातून ही चौकशी सुरू झाली असून त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मराठवाड्यात जलयुक्त शिवार योजनेची जिल्हानिहाय चौकशी होणार आहे. एकूण 2 हजार 417 कोटी रुपयांच्या कामांची चौकशी करण्यात येणार आहे. मराठवाड्यात 6 हजार 20 गावांमध्ये जलयुक्तची कामे झाली होती. यावेळी अनेक गुत्तेदार आणि मजूर संस्थांनी घोटाळे केल्याचा संशय असल्याने ही चौकशी करण्यात येणार आहे.
मराठवाड्यातील जलयुक्त शिवार कामाची जिल्हानिहाय चौकशी करण्यासाठी जलसंधारण आणि आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही चौकशी समिती जलयुक्तचे जिल्हानिहाय रेकॉर्ड तपासणार आहे. मराठवाड्यातील तब्बल पावणे दोन लाख कामे संशयाच्या भोवऱ्यात असल्याने ही चौकशी होत आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
News English Summary: Inquiry into Jalayukta Shivar Yojana has started. The inquiry has started from Marathwada and it is expected to increase the difficulties of the Bharatiya Janata Party. A district-wise inquiry will be held into the water-rich Shivar Yojana in Marathwada. A total of Rs 2,417 crore will be investigated. In Marathwada, water works were done in 6 thousand 20 villages. The inquiry will be held as it is suspected that several contractors and labor organizations have committed scams. A committee of officials from the Water Conservation and Commissioner’s Office has been set up to investigate the water-rich Shivar work in Marathwada district-wise. This inquiry committee will check the district wise records of Jalayukta.
News English Title: Jalyukt Shivar Yojana probe start from Aurangabad News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS