5 November 2024 9:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | वोडाफोन आयडिया शेअर 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला नोट करा - NSE: IDEA IRFC Share Price | IRFC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC Suzlon Share Price | मल्टिबॅगर शेअर 22% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला - NSE: SUZLON Penny Stocks | 7 रुपयाचा पेनी शेअर पैशाचा पाऊस पाडतोय, रोज 20% अप्पर सर्किट, संधी सोडू नका - BOM: 532015 Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी - NSE: TATAPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 55% पर्यंत परतावा मिळेल - NSE: HAL Bank Account Alert | पगारदारांना 'या' 5 फायनान्शियल चुका पडू शकतात महागात, कधीच पैसा-संपत्ती वाढणार नाही - Marathi News
x

बँकेत खातं आहे का? | संकटातील लक्ष्मी विलास बँकेवर आरबीआयचे निर्बंध

Lakshmi Vilas Bank, under moratorium, RBI Bank

मुंबई, १७ नोव्हेंबर: आणखी एक बँक आर्थिक संकटात सापडली आहे. रिझर्व बँकेने केंद्र सरकारशी केलेल्या सल्ला मसलतीनंतर लक्ष्मी विलास बँकेवर निर्बंध (laxmi vilas bank under moratorium) आणले आहेत. आता खातेदार बँकेतून 25 हजारांपेक्षा अधिक रक्कम काढू शकणार नाहीत. 30 दिवसांसाठी हे निर्बंध (moratorium)असतील. LVB चं संचालक मंडळ (Board of Directors LVB) रिझर्व बँकेने (RBI) बरखास्त केलं आहे.

लक्ष्मी विलास बँकेची आर्थिक स्थिती डबघाईला आलेली आहे, असं लक्षात आल्यानंतर रिझर्व बँकेने केंद्र सरकारशी चर्चा सुरू केली. आता सरकारने या बँकेवर 16 डिसेंबरपर्यंत निर्बंध आणले आहेत. रिझर्व बँकेच्या सल्ल्यने अर्थ मंत्रालयाने यासंबंधी बँकेला नोटीस देऊन हा निर्णय जाहीर केला आहे. बँक दिवाळखोरीत निघण्याच्या जवळ पोहोचू नये, यासाठी असे कठोर निर्णय आवश्यक असल्याचं सांगितलं जातं. सध्या कॅनरा बँकेचे माजी कार्यकारी अध्यक्ष टी. एन. मनोहरन यांंना लक्ष्मी विलास बँकेवर प्रशासक म्हणून नेमण्यात आलं आहे.

आज संध्याकाळी ६ पासून लक्ष्मी विलास बँकेवर निर्बंध लागू झाले असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे. मागील तीन वर्षे लक्ष्मी विलास बँकेला तोटा झाला आहे. बँकेच्या बुडीत कर्ज मोठी वाढ झाली आहे. बॅंकेची व्यावसायिक रणनीती सपशेल अपयशी ठरल्याने रिझर्व्ह बँकेला आज कारवाई करावी लागली आहे. येत्या १६ डिसेंबरपर्यंत खातेदारांना केवळ २५ हजार रुपये काढता येणार आहेत. रिझर्व्ह बँकेने लक्ष्मी विलास बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केलं असून त्यावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

News English Summary: Another bank has found itself in a financial crisis. The Reserve Bank of India (RBI) has imposed laxmi vilas bank under moratorium after consulting the central government. Now account holders will not be able to withdraw more than Rs 25,000 from the bank. These restrictions will be for 30 days (moratorium). The Board of Directors of LVB has been dismissed by the Reserve Bank of India (RBI).

News English Title: Lakshmi Vilas Bank under moratorium for 30 days withdrawals limit of rupees 25 thousand board of directors suspended by RBI News updates.

हॅशटॅग्स

#Reserve Bank of India(38)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x