17 January 2025 11:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL Bank Clerk Recruitment | तरुणांसाठी सुवर्ण संधी, सरकारी बँकेत PO आणि क्लार्क पदांसाठी भरती, मोठ्या पगाराची संधी सोडू नका Tata Punch on Road Price | 1 लाखांच्या डाऊन पेमेंटवर 'टाटा पंच' तुमची, महिन्याला भरावी लागणारी EMI ची किंमत पहा Bank Account Alert | कमी पगारात सुद्धा तुमच्या बँक खात्यात पैसा टिकेल आणि वाढेल सुद्धा, 'या' 5 टिप्स फॉलो करा PPF Investment Formula | PPF मध्ये फक्त पैसे गुंतवू नका, या फॉर्म्युल्याने PPF बचत करा, मिळेल करोडमध्ये परतावा SBI Mutual Fund | पगारदारांनो, SBI म्युच्युअल फंडात 500 रुपयांची गुंतवणूक सुरु करा, मिळेल 35 लाख रुपये परतावा Post Office Scheme | 100, 500, 1000 आणि 2000 रुपयांच्या पोस्ट ऑफिस RD गुंतवणुकीतून किती परतावा मिळेल, रक्कम इथे पहा
x

कोणाला काय मिळते, याची आम्ही काळजीपूर्वक तपासणी करू - पी चिदंबरम

P Chidambaram, PM Narendra Modi

नवी दिल्ली, १३ मे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबी भारत अभियानाची घोषणा केली असून २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी काल संवाद साधला. यावेळी त्यांनी या पॅकेजची घोषणा केली. नरेंद्र मोदींनी सांगितलं की, “हे पॅकेज स्वावलंबी भारत अभियानाचा महत्त्वाचा भाग आहे. आतापर्यंत जाहीर करण्यात आलेली आर्थिक मदत आणि हे पॅकेज एकत्र मिळून २० लाख कोटींचं आहे. २०२० मध्ये जाहीर करण्यात आलेलं हे २० कोटींचं पॅकेज स्वावलंबी योजनेला नवी गती देईल”. हे पॅकेज जीडीपीच्या १० टक्के असल्याचंही नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.

भारत जेव्हा स्वावलंबी होण्याची गोष्ट करतो, तेव्हा त्याची वकीली करत नाही. जी संस्कृती जगाचा विकास करू इच्छिते. जगाला घर मानते. भारताच्या कामाचा प्रभाव जगाच्या कल्याणावर पडतो. टीबी असेल, हागणदारी मुक्ती असेल जगावर त्याचा परिणाम झाला आहे. तणावातून मुक्ती देण्यासाठी भारताकडून जगाला भेट मिळाली आहे. जगाला विश्वास वाटू लागला आहे, भारत काही चांगले करू शकतो. पण प्रश्न आहे कसा? यावर उत्तर आहे १३५ कोटी लोकांनी केलेला स्वावलंबीपणाचा संकल्प यावर उत्तर आहे, असे मोदी म्हणाले.

दरम्यान, पी चिदंबरम म्हणाले की, काल पंतप्रधानांनी एक हेडलाइन आणि एक कोरा कागद दिला, जो आज अर्थमंत्री भरणार आहेत. आम्ही एक एक रुपयावर नजर ठेवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. पी चिदंबरम यांनी बुधवारी एक ट्विट करत सरकारच्या पॅकेजवर टीका केली आहे. ट्विटमध्ये ते म्हणाले की, ‘काल पंतप्रधानांनी आम्हाला एक मथळा आणि कोरा कागद दिला. साहजिकच माझी प्रतिक्रिया देखील कोरी होती. आज आम्ही अर्थमंत्र्यांकडून भरण्यात येणाऱ्या कोऱ्या कागदावर नजर ठेवून आहोत. सरकार खरंच अर्थव्यवस्थेत सुधारणा करत आहे की नाही हे याकडे आम्ही काळजीपूर्वक लक्ष्य देऊ.

माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम म्हणाले, ‘कोणाला काय मिळते, याची आम्ही काळजीपूर्वक तपासणी करू. गरीब, भुकेलेले आणि उद्ध्वस्त झालेल्या परप्रांतीय कामगारांना शेकडो किलोमीटर चालून आपल्या घरी पोहोचल्यावर काय मिळणार आहे ते आम्ही पाहणार आहोत. तसेच खालच्या वर्गातील लोकांना (१३ कोटी कुटुंबांना) खरंच काय मिळणार?, यावरही आमचं लक्ष आहे.

 

News English Summary: P Chidambaram said that yesterday the Prime Minister gave a headline and a blank paper, which the Finance Minister will fill today. “We will keep an eye on the rupee,” he said. P Chidambaram on Wednesday criticized the government’s package in a tweet. In a tweet, he said, ‘Yesterday the Prime Minister gave us a headline and a blank paper. Naturally my reaction was also blank.

News English Title: lockdown Prime Minister Narendra Modi economic relief package former finance minister P Chidambaram News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x