16 January 2025 7:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

VIDEO: हे काय? मोदींच्या हेलिकॉप्टरमधून बॉक्स उतरवून ते पटापट इनोव्हामध्ये लोड केले?

Narendra Modi, BJP

कर्नाटक : काँग्रेस पक्षाने एक व्हिडिओ सार्वजनिक करून मोदींना कोंडीत पकडून काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. कर्नाटकातील सभेसाठी मोदी एका हेलिपॅडवर उतरले आणि त्याच दरम्यान काही घडलेला घटनाक्रम कॅमेऱ्यात कैद झाल्याने खळबळ माजली आहे. त्यानुसार मोदींच हेलिकॉप्टर जमिनीवर उतरताच काही क्षणात एक मोठा बॉक्स उतरविण्यात आला आणि तो काही जणांनी धावत पळत एका जवळच उभ्या असलेल्या पांढऱ्या रंगाच्या इनोव्हामध्ये लोड करण्यात आला.

युथ काँग्रेसचे इनचार्ज श्रीवत्स यांनी एक व्हिडिओ देखील पुराव्यादाखल ट्विट केला आहे आणि काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यात असं देखील म्हटलं आहे की या ठिकाणी मोदींची सभा देखील आयोजित करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी भाजपच्या एका मुख्यमंत्रीच्या सोबत असलेल्या गाडीत देखील मोठी रोकड निवडणूक अधिकाऱ्यांच्या धाडीत जप्त करण्यात आली होती.

तसेच ‘द टेलिग्राफ’ ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार काँग्रेस कर्नाटक राज्य अध्यक्ष दिनेश गुंडू राव यांनी देखील हाच व्हिडिओ शेअर केला आहे आणि अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यात त्यांनी म्हटलं आहे, ‘चित्रदुर्ग येथे मोदींच्या हेलिकॉप्टरमधून एक बॉक्स रहस्यमयरित्या उतरविण्यात आला, त्यानंतर तो बॉक्स मोठ्या लगबगीने एका इंनोव्हमध्ये लोड करण्यात आला आणि लगेच ती गाडी तिथून पळविण्यात आली. त्यामुळे निवडणूक आयोगाने याची चौकशी करण गरजेचं आहे. त्यानुसार त्या बॉक्समध्ये काय होतं? तसेच ती गाडी कोणाची होती? तसेच तो बॉक्स पंतप्रधानांच्या सुरक्षेसंबंधित प्रोटोकॉलचा भाग होता का? तसेच तो इनोव्हा गाडी पंतप्रधानांच्या सुरक्षेसंबंधित गाड्यांच्या ताफ्याशी संबंधित होती का? तसेच ती कर नेमकी कोणाही होती? असे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x