25 December 2024 10:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS NMDC Share Price | मल्टिबॅगर NMDC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NMDC Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, 1 आठवड्यात 43% कमाई, यापूर्वी 714% परतावा दिला - Penny Stocks 2024
x

जनतेची आर्थिक स्थिती बिकट असताना LPG'च्या दरांत वाढ

LPG Gas Cylinder Price Hike, Lockdown

नवी दिल्ली, १ जून: एक जून २०२० पासून देशात अनेक मोठे बदल आणि नियम बदलणार आहेत. याचा थेट परिणाम आपल्या आयुष्यावर पडणार आहे. काही नव्या नियमांचा थेट फायदा होणार आहे तर काहींना फटका सहन करावा लागणार आहे. यातील काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास आर्थिक नुकसानही होऊ शकते. रेल्वे, गॅस सिलिंडर, पेट्रोल-डिजल यांची भाववाड.. तसेच रेशन कार्ड आणि रेल्वेच्या नियमातील बदलांचाही यात समावेश आहे.

अनलॉक प्रक्रियेच्या याच टप्प्याच्या पहिल्या दिवशी सर्वसामान्यांना चिंतेत टाकणारी बातमी समोर आली आहे. ज्याअंतर्गत बऱ्याच गॅस वितरण कंपन्यांनी घरगुती वापरातील एलपीजी सिलेंडरच्या दरांत वाढ केली आहे.

HPCL, BPCL, IOC या तेल कंपन्यांकडून विना अनुदानित एलपीजी अर्थात घरगुती वापरातील सिलेंडरच्या दरांत वाढ करण्यात आली आहे. १४.२ किलो वजनाच्या विनाअनुदानित सिलेंडरची किंमत दिल्लीमध्ये ११.५० रुपयांनी वाढली आहे. परिणामी आता हे दर प्रति सिलेंडर ५९३ रुपयांवर पोहोचला आहे.

दरम्यान कोरोना महामारीमध्ये स्थलांतरित कामगार, रोजंदारी मजूर आणि प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. एक जून २०२० पासून २० राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात ‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेला सुरूवात झाली आहे. या योजनेनुसार पात्र लाभार्थ्यांला राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार देशातील कोणत्याही रास्त भावाच्या दुकानातून त्याच्याकडे असलेल्या रेशन कार्डचा वापर करून अन्नधान्य घेता येणार आहे. या योजनेचा फायदा ६७ कोटी लोकांना फायदा होईल.

 

News English Summary: On the first day of this phase of the unlock process, the news has come to the attention of the general public. Under which many gas distribution companies have increased the rates of LPG cylinders for domestic use. Oil companies like HPCL, BPCL, IOC have increased the rates of unsubsidised LPG cylinders for domestic use.

News English Title: LPG gas cylinder prices are increased during week financial condition of the citizens News Latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x