अब की बार, लक्षच देईना मोदी सरकार | गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ
नवी दिल्ली, १५ डिसेंबर: कोरोना आपत्तीमुळे लॉकडाउनच्या संकटात सापडलेल्या सामान्य लोकांची आर्थिक स्थिती बेताची झालेली असताना इतर गोष्टी देखील महाग झाल्या आहेत. मोदी सरकारने ज्या मुद्यांवरून निवडणुका जिंकल्या त्याच मुद्यावर सरकार लक्ष द्यायला देखील तयार नसल्याने सामान्य लोकांची स्थित बिकट होतं चालली आहे. त्यात रोजच्या जीवनातील महत्वाचा असणाऱ्या गॅसचे दर देखील गगनाला भिडले आहेत.
ऑईंल कंपन्यांनी एलपीजी (New LPG Prices) सिलिंडरच्या किंमतीमध्ये घसघशीत वाढ केली आहे. 14.2 किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत एकूण 50 रुपयांनी वाढविली आहे. अशाचप्रकारे 5 किलोग्रॅम छोट्या सिलिंडरच्या किंमतीत 18 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे 1 डिसेंबरला कोणतीही वाढ केली नव्हती.
इंडियन ऑईलच्या संकेतस्थळानुसार 14.2 किलोचा सबसिडी नसलेला गॅस सिलिंडर दिल्लीमध्ये 594 रुपये होता. तर बेकरी हॉटेलसारख्या आस्थापनांमध्ये वापरण्यात येणारा कमर्शिअल गॅस सिलिंडरचा दर 55 रुपयांनी वाढविण्यात आला होता. परंतु, 15 दिवसांनी पुन्हा तेल कंपन्यांनी गॅसचे दर वाढविले आहेत. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करतानाच अन्य प्रकारातील सिलिंडरच्या किंमतीतही वाढ केली आहे. 19 किलोच्या गॅस सिलिंडरच्या दरात 36.50 रुपयांची वाढ केली आहे. दिल्लीमध्ये बिनासबसिडीवाल्या घरगुती सिलिंडरची किंमत 644 रुपये झाली आहे. कोलकातामध्ये ही किंमत 670.50 रुपये, मुंबईत 644 रुपये आणि चेन्नईमध्ये 660 रुपये झाली आहे.
तर दुसरीकडे पेट्रोलियम कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर ठेवला आहे. सलग आठव्या दिवशी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नाही. त्याआधी १५ वेळा झालेल्या दरवाढीने पेट्रोल २.५५ रुपयांनी आणि डिझेल ३.४१ रुपयांनी महागले होते. याआधी सप्टेंबर २०१८ मध्ये या स्तरावर पेट्रोल आणि डिझेलचा भाव होता.
परिणामी आज मुंबईत पेट्रोलचा भाव एक लिटरसाठी ९०.३४ रुपये आहे. डिझेलचा भाव ८०.५१ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोलने ८३ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. दिल्लीत पेट्रोलचा भाव ८३.७१ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ७३.८७ रुपये आहे. त्याशिवाय चेन्नईत देखील आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोलचा भाव ८६.५१ रुपये झाला असून डिझेल ७७.४४ रुपये झाले आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलचा भाव ८५.१९ रुपये असून डिझेल ७७.४४ रुपये आहे.
News English Summary: Oil companies have sharply increased the price of LPG (New LPG Prices) cylinders. The price of a 14.2 kg domestic cylinder has been increased by a total of Rs 50. Similarly, the price of a 5 kg small cylinder has been increased by Rs 18. Importantly, there was no increase on December 1st.
News English Title: LPG price Gas Cylinder rate increased fifty rupees oil companies news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार