25 December 2024 11:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर, अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर निगेटिव्ह परताव्यामुळे फोकसमध्ये, आता फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडियाचा पेनी शेअर अजून घसरणार, कंपनीबाबत अपडेट आली - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत महत्वाचे संकेत, तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: YESBANK Post Office Scheme | महिलांना भरघोस व्याज देणारी योजना, पहा 50,000, 100000, 150000 वर किती परतावा मिळेल Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 93 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 57 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS
x

मॅग्नेटिक महाराष्ट्र २.०, राज्यात येणार तब्बल १६ हजार कोटींची गुंतवणूक

Maharashtra Government, signs rupees 1600 crore investment pacts

मुंबई, १६ जून : एकीकडे कोरोनाशी लढत असताना महाराष्ट्राने उद्योग उभारणीत दमदार पाऊल टाकून, तब्बल १६ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार सोमवारी केले. उद्योग स्थापण्यात कोणत्याही अडचणी येऊ दिल्या जाणार नाहीत, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

उद्योग विभागातर्फे मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० (भाग दोन) चा शुभारंभ मुख्यमंत्री ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी विविध देशांचे वाणिज्यदूत, गुंतवणूकदार ऑनलाइन उपस्थित होते.अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया, सिंगापूर आदी विविध १२ देशांतील गुंतवणुकदारांशी १६ हजार ३० कोटींचे सामंजस्य करार यात झाले. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. वर्ल्ड असोसिएशन आॅफ इन्व्हेस्टमेंट प्रमोशन एजन्सीज आणि यूएस इंडिया पार्टनरशिप फोरम सह द्विपक्षीय भागीदारी करारावर स्वाक्षºया करण्यात आल्या.

दरम्यान, या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आलेल्या एका फोटोवरुन महाराष्ट्र भाजपाने राज्य सरकारवर टीका केली आहे. सीएमओच्या ट्विटर हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आलेल्या फोटोमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मागील बाजूला असलेल्या बॅनरवर महाराष्ट्राचा नकाशा उलटा (मीरर इमेज) दिसत असल्यावर भाजपाने, “याला म्हणतात महाराष्ट्रद्रोह” असा टोला लगावला आहे.

 

News English Summary: On the one hand, while fighting Corona, Maharashtra took a bold step in setting up an industry and signed an investment agreement worth Rs 16,000 crore on Monday. Chief Minister Uddhav Thackeray testified that no difficulties will be allowed in setting up the industry.

News English Title: Maharashtra Government signs rupees 1600 crore investment pacts 12 firms News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x