20 April 2025 7:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून एकदा तरी कार्यालयात हजर रहावं, अन्यथा पगार कपात

Maharashtra government staff, Lockdown, Salary Cut, Attendance

मुंबई, ५ जून: चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसचा भारतातही फटका बसला आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या २ लाखांच्या वर पोहचली आहे. यात सर्वाधिक कोरोनाग्रस्त महाराष्ट्रात आहे. कोविड १९ चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सरकारकडून लॉकडाऊन सुरु करण्यात आलं. गेल्या २ महिन्यापासून लॉकडाऊन असल्याने अनेक व्यवसाय ठप्प पडले, तसेच शासकीय कार्यालयही ओस पडले.

सरकारी कर्मचाऱ्यांनी आठवड्याभरात कामावर रुजू व्हावं अन्यथा त्यांना पगारकपातीला सामोरं जावं लागेल असं ठाकरे सरकारने म्हटलं आहे. पीटीआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून एकदा कामावर रुजू व्हावं असे आदेश ठाकरे सरकारने दिले आहेत. ८ जूनपासून सरकारी कार्यालयं सुरु होणार आहेत. अशात आठवड्याभरातून एकदा कार्यालयात कर्मचाऱ्यांनी हजर रहावं असे आदेश ठाकरे सरकारने म्हटलं आहे.

८ जूनपासून आदेशाची अंमलबजावणी होणार असून सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कार्यालयातील उपस्थितीबाबत महाराष्ट्र सरकारच्या वित्त विभागाने याबाबतचा आदेश काढला आहे. तसेच, कर्मचारी परस्पर गैरहजर राहिल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.

प्रत्येक कर्मचाऱ्याला नियोजित दिवस देण्यात येणार आहे. त्यानुसार, ठरलेल्या दिवशी कर्मचारी कामावर आला नाही तर संबंधित कर्मचाऱ्याची त्या आठवड्याची गैरहजेरी लावण्यात येणार असून ती विनावेतन रजा समजली जाणार आहे. त्यामुळे या दिवसांचा पगार कर्मचाऱ्यांना मिळणार नाही. सरकारी कर्मचाऱ्यांनी शासकीय कामाप्रति निष्ठा ठेवणे अनिवार्य असून कार्यालयातील कामाचे कर्मचारी निहाय समन्वायी वाटप होणे आवश्यक आहे. त्यासाठी हे निर्देश दिल्याचे आदेशात म्हटले आहे.

 

News English Summary: The Thackeray government has said that government employees should return to work within a week or else they will have to face pay cut. PTI has given the news in this regard. The Thackeray government has ordered government employees to return to work once a week.

News English Title: Maharashtra government staff must report to work once a week during covid19 lockdown or face pay cut says Maharashtra government News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या