24 December 2024 11:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS NMDC Share Price | मल्टिबॅगर NMDC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NMDC Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, 1 आठवड्यात 43% कमाई, यापूर्वी 714% परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO Watch | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड फक्त 52 रुपये, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP
x

महाराष्ट्र लॉकडाऊन | दुर्बल घटकांच्या मदतीसाठी ५ हजार ४७६ कोटींचे पॅकेज

Maharashtra lockdown

मुंबई, १४ एप्रिल: देशभरात कोरोना संसर्ग वेगाने वाढतोय. वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे अनेक ठिकाणी लॉकडाऊनची परिस्थिती तयार झालीय. महाराष्ट्रातही तिच परिस्थिती आहे. महाराष्ट्रात जवळपास लॉकडाऊन लागणार हे निश्चित झालंय. त्यामुळे संपूर्ण देशाचं महाराष्ट्राकडे लक्ष आहे. विशेष म्हणजे देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या आर्थिक गणितांवरही याचा मोठा परिणाम होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधीच राज्यात विकेंड लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यूचा निर्णय घेतलेला आहे. मात्र, त्याचा अपेक्षित परिणाम दिसलेला नाही. त्यामुळेच महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊनची लागण्याची शक्यता निर्माण झाली होती.

राज्यात उद्या बुधवार १४ एप्रिलपासून रात्री ८ वाजेपासून १ मे २०२१ पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील व या काळात संपूर्ण संचारबंदी राहील. केवळ आवश्यक सेवा सुविधा सुरु राहतील. यासंदर्भातील ब्रेक दि चैनचे नवे आदेश आज प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

कोरोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा करतांना या काळात आर्थिक दुर्बल घटकांना याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना दिलासा देणारे ५ हजार ४७६ कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.

राज्यात मार्च २०२१ पासून कोविड-१९ ची दुसरी लाट आली असून या लाटेमध्ये बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. रुग्णांची संख्या कमी करण्याची गरज म्हणून कडट टाळेबंदी लागू करण्यात येत आहे. पण या काळात आर्थिक दुर्बल घटकांना दिलासा देण्यासाठी अन्नधान्य आणि आर्थिक सहाय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संकटाचा मुकाबला करताना शासन गरजूंच्या पाठिशी उभे आहे. याकाळात कुणाचीही आबाळ होऊ देणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

 

News English Summary: Corona infection is on the rise across the country. The growing number of corona patients has created lockdown conditions in many places. The situation is similar in Maharashtra. It has been decided that there will be a lockdown in Maharashtra. Therefore, the entire country is paying attention to Maharashtra. In particular, it will have a big impact on the economic mathematics of the country’s financial capital Mumbai.

News English Title: Maharashtra govt made provision for poor factors in the state during lockdown news updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x