उद्यापासून EPF, बॅंक, LPG, OTT, रेशन कार्डच्या या नियमांमध्ये होणार बदल | तुमच्यावर असा होणार परिणाम

मुंबई, ३१ ऑगस्ट | सप्टेंबरच्या 1 तारखेपासून अनेक नियमांत बदल होणार आहेत. हे बदल ईपीएफ, धनादेश वटविणे, बचत खात्यावर व्याज, एलपीजी सिलिंडर, कार ड्रायव्हिंग आणि ओटीटी प्लॅटफॉर्मशी संबंधित बाबींशी आहेत.
उद्यापासून EPF, बॅंक, LPG, OTT, रेशन कार्डच्या या नियमांमध्ये होणार बदल – EPF, check clearing, interest on savings account, LPG cylinder, car driving and OTT platform related matters rules are changing from 1st September 2021 in India.
पॅन आधार लिंक:
पॅन कार्ड हे आधार कार्डला लिंक करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर मुदत आहे. त्यामुळे हे लिंक करण्याची तुमच्याकडे एक महिना मुदत असणार आहे. जर आधार-पॅन हे लिंक नसेल तर आर्थिक व्यवहारात अडचणी येण्याची शक्यता आहे. तसेच पॅन कार्ड ही निष्क्रीय होण्याची शक्यता आहे. बँकेचे व्यवहार जर 50 हजारांहून अधिक असतील तर पॅन क्रमांकाची गरज लागणार आहे. पॅन कार्ड नसेल तर तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
डीमॅट अकाउंट KYC:
सेबीच्या निर्देशानुसार शेअर बाजार ट्रेडिंग करणाऱ्या गुंतवणूकदारांना डीमॅट अकाउंट अपडेट करावे लागणार आहे. ज्यांना नवीन डीमॅट अकाउंट सुरू करायचे आहे, त्यांच्यासाठी नवीन नियम तयार करण्यात आले आहेत. आता डीमॅट अकाउंट 30 सप्टेंबरपर्यंत केवायसी करावे लागणार आहे. जर केवायसी नसेल तर अकाउंट बंद होणार आहे. त्यानंतर गुंतवणूकदारांना शेअर बाजारात ट्रेडिंग करावे लागणार नाही.
प्राप्तिकर विवरण पत्र भरण्याची तारीख:
करदात्यांना 30 सप्टेंबरपर्यंत प्राप्तिकर विवरणपत्र भरावे लागणार आहे. त्यानंतर ज्यांचे उत्पन्न वार्षिक पाच लाखांहून अधिक असेल त्यांना 5 हजापर्यंत विलंब शुल्क भरावा लागणार आहे. तर 5 लाखांहून कमी उत्पन्न असलेल्या प्राप्तिकरदात्यांना 1 हजारापर्यंत विलंब शुल्क भरावे लागणार आहे.
बँक अकाउंट अपडेट:
1 ऑक्टोबरपासून ऑटो डेबिट पेमेंट सिस्टिम लागू होणार आहे. त्यामुळे विविध बिलांपोटी स्मार्टफोनवर ऑटो डेबिट मोड असेल तर त्या तारखेला पैसे कट होणार आहेत. ही सुविधा सुरू होण्यासाठी तुमच्या बँक अकाउंटशी मोबाईल नंबर अपडेट करणे आवश्यक आहे.
EPF, check clearing, interest on savings account, LPG cylinder, car driving and OTT platform related matters rules are changing.
50 हजारांहून अधिक रक्कम असेल तर पॉझिटिव्ह पे सिस्टम:
बहुतांश बँकांनी पॉझिटिव्ह पे सिस्टिम लागू केली आहे. त्यामुळे 50 हजारांहून अधिक रकमेच्या चेकसाठी तुम्हाला अडचणी भेडसावू शकणार आहेत. बहुतांश बँकांनी 1 सप्टेंबरपासून पीपीएस लागू केली आहे.
पीएफ नियम बदलले:
भविष्य निर्वाह निधी (पीएफ) 1 सप्टेंबरपासून बदलणार आहेत. त्यासाठी तुम्हाला युनिव्हर्सल अकाउंट नंबर (युएएन) हा आधार कार्डला लिंक करणे गरजेचे आहे. तसे नसेल तर तुमची कंपनी खात्यावर पीएफ रक्कम जमा करू शकणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने ईपीएफ खातेदारांना आधार क्रमांक हा युएएन क्रमांकाशी लिंक करण्याची सूचना केली आहे.
गॅस सिलिंडरचे बदलणार दर:
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडर आणि कर्मशियल सिलिंडरच्या किमती निश्चित केल्या जातात. त्यामुळे 1 तारखेला गॅस सिलिंडरच्या दरातील बदलाने ग्राहकांना थेट आर्थिक परिणाम जाणवणार आहे.
ओटीटी प्लॅटफॉर्म सबस्क्रिप्शन महागणार:
कोरोनाच्या काळात मोबाईलवर वेबसीरीज आणि ओटीटीवर फिल्म पाहण्याची अनेकांना सवय लागली आहे. अशा प्रेक्षकांना 1 सप्टेंबरपासून डिस्ने प्लस आणि हॉटस्टार सबस्क्रिप्शनसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. या ओटीटीचे मासिक शुल्क हे 399 रुपये होते. आता, ग्राहकांना मासिक 499 रुपये द्यावे लागणार आहेत.
रेशन कार्डच्या नियमांत होणार हे बदल:
दिल्ली सरकारच्या नवीन नियमांनुसार, जे लोक वैद्यकीय कारणामुळे किंवा वयामुळे रेशन घेण्यासाठी दुकानात जाऊ शकत नाहीत, ते यासाठी दुसऱ्या व्यक्तीला नामांकित करू शकतात. यासह दुसरी व्यक्ती आपल्या रेशन दुकानातून वस्तू आणू शकते. रेशन दुकानातून माल आणण्यासाठी दुकानात बायोमेट्रिकवर बोटांचे ठसे द्यावे लागतात, त्यानंतरच माल उपलब्ध होतो. परंतु काही लोक काही कारणांमुळे रेशन दुकानात जाऊ शकत नाहीत, ज्यामुळे त्यांना रेशन मिळत नाही. अशा परिस्थितीत लोकांना या नवीन नियमाचा फायदा होणार आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Many rules are changing from 1st September 2021 in India.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE