22 December 2024 9:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, कंपनीबाबत अपडेट, मोठी कमाई होईल - Vikas Lifecare Share Price Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: TATAMOTORS
x

२०१४'मध्ये ही होर्डिंग्स पाहिली असतील पेट्रोल पंपा वरती, आव्हाडांकडून आठवण

Minister Jitendra Awhad, old poster, Petrol and diesel prices

मुंबई, २५ जून : लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून दररोज होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आज डिझेलच्या किंमती वाढवल्या असून पेट्रोलचे दर मात्र स्थिर आहेत. आज डिझेलचे दर ४० ते ५० पैशांनी महागल्याने मुंबईत डिझेल प्रतिलिटर ७८.२२ रुपये झाले आहे. तर पेट्रोलचा भाव ८६.५४ रुपयांवर स्थिर आहे. तसेच ४८ पैशांच्या दरवाढीने राजधानी दिल्लीत डिझेलचा भाव ७९.८८ रुपये झाला आहे. तर पेट्रोलचा भाव ७९.७६ रुपयांवर कायम आहे. सलग १८व्या दिवशी झालेल्या या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचे कंबरडे मोडून निघाले आहे.

दरम्यान, कोरोनाची साथ रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये इंधनाचा दैनंदिन आढावा तात्पुरता बंद होता. मात्र लॉकडाऊन शिथिल झाल्याने ७ जूनपासून पेट्रोलियम कंपन्यांनी दररोजची दर निश्चिती पुन्हा सुरु केल्याने १८ दिवसांत पेट्रोल ८.५० रुपयांनी तर डिझेल १०.४८ रुपयांनी महागले आहे.

दररोज वाढणाऱ्या पेट्रोल व डिझेलच्या किंमतींवरून जितेंद्र आव्हाड यांनी एक जुनं पोस्टर शेअर करत निशाणा साधला आहे. 2014 च्या निवडणूक प्रचाराच्या वेळी भाजपने लावलेलं एक पोस्टर आव्हाड यांनी ट्विट करून मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. बुधवारी सकाळी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून “आज पेट्रोल व डिझेल चे भाव पुन्हा वाढवले. पेट्रोल 17 पैसे ते 20 पैसे तर डिझेलच्या दरात 47 ते 55 पैसे अशी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात पेट्रोलचा दर हा 86.85 रुपये तर डिझेलचा दर 77.49 रुपये” असं ट्विट आव्हाडांनी केलं आहे.

पेट्रोल आणि डिझेलचा दर सांगतानाच जितेंद्र आव्हाड यांनी 2014 च्या निवडणूक प्रचाराच्या काळात भाजपाने पेट्रोल पंपांवर लावलेल्या एका बॅनरचा फोटोही ट्विट केलं आहे. ‘ही होर्डिंग्स पाहिली असतील पेट्रोल पंपा वरती… विसरला असाल तर लक्षात आणून द्यावं म्हटलं’ असं म्हणत त्यांनी भाजपाला टोला लगावला आहे. काही दिवसांपूर्वी आव्हाड यांनी ‘देशातील जनता सध्या कोरोनाचा सामना करण्यात गुंतली आहे. तसेच भारत-चीन सीमेवर सुरू असलेल्या संघर्षाकडेही लोकांचं लक्ष आहे. त्यामुळे इंधनाच्या दरवाढीकडे त्यांचं लक्ष जाणार नाही हे केंद्र सरकारला चांगलं माहीत आहे’ असं म्हटलं होतं.

 

News English Summary: Jitendra Awhad has taken aim by sharing an old poster on the daily rising petrol and diesel prices. Awhad tweeted a poster put up by the BJP during the 2014 election campaign and strongly criticized the Modi government.

News English Title: Minister Jitendra Awhad has taken aim by sharing an old poster on the daily rising petrol and diesel prices News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Petrol Price(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x