17 April 2025 10:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव 3 टक्क्यांनी उतरले | तरी देशात 17% वाढले

MNS Leader Anil Shidore, high fuel rates, Petrol Rates Hike

मुंबई, १० डिसेंबर: पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने लवकरच महागाईचा आगडोंब उसळण्याची (Rising petrol and diesel prices are likely to push up inflation) शक्यता आहे. सलग सहाव्या दिवशी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ केली होती. पेट्रोल २० पैशांनी तर डिझेल २६ पैशांनी महागले आहे. डिझेल दरवाढीने मालवाहतूकदारांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

नव्या दरवाढी प्रमाणे मुंबईत पेट्रोलचा भाव एक लिटरसाठी ९०.३४ रुपये (As per today’s hike, petrol price in Mumbai is Rs 90.34 per liter) आहे. डिझेलचा भाव ८०.५१ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोलने ८३ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलचा भाव ८३.७१ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ७३.८७ रुपये आहे. त्याशिवाय चेन्नईत देखील पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोलचा भाव ८६.५१ रुपये झाला असून डिझेल ७७.४४ रुपये झाले आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलचा भाव ८५.१९ रुपये असून डिझेल ७७.४४ रुपये आहे.

देशात पेट्रोल – डिझेलच्या वाढत्या किमतीवरून काँग्रेसकडून सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल केलाय. काँग्रेस पक्षाच्या एका नेत्यानं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता.

‘पेट्रोल दर : ९० रुपये
वास्तव किंमत : ३० रुपये
मोदी टॅक्स : ६० रुपये’

असं म्हणताना देशातल्या सगळ्या पेट्रोल पंपांची नाव बदलून ‘नरेंद्र मोदी वसुली केंद्र’ करण्यात यावं, असा तिखट टोला काँग्रेस नेते श्रीवत्स यांनी हाणला होता.

त्यानंतर इंधनाच्या वाढत्या किमतीवरून मनसेने देखील मोदी सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अनिल शिदोरे यांनीही पेट्रोल दरवाढीवरुन सरकारच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केला आहे. पेट्रोल, डिझेलचे सतत चढे दर ही चिंतेची गोष्ट आहे. वास्तविक मार्च ते डिसेंबर ह्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात ३% नी भाव उतरले. मात्र देशात पेट्रोल १७% तर डिझेल १५% नी वाढलं. ह्यात सरकारी करांचा वाटा पेट्रोलला ६३% तर डिझेलला ५८.६% आहे. इतका बोजा नागरिकांवर का?, असा सवाल अनिल शिदोरे यांनी विचारला आहे. अनिल शिदोरे हे सातत्याने ट्विटवरुन आपली भूमिका मांडत असतात, काही दिवसांपूर्वीच त्यांनी मोदी सरकारच्या कृषी विधेयकांचं समर्थन केलं होतं. पण, पेट्रोल दरवाढीवरुन त्यांनी सरकारच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

 

News English Summary: Anil Shidore, leader of Maharashtra Navnirman Sena in the state, has also questioned the functioning of the government over the petrol price hike. The constant rise in petrol and diesel prices is a matter of concern. In fact, between March and December, international prices fell by 3%. However, petrol in the country increased by 17% and diesel by 15%. The share of government taxes is 63% for petrol and 58.6% for diesel. Anil Shidore has asked why such a burden is on the citizens.

News English Title: MNS Leader Anil Shidore raised question over high fuel rates in India News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या