धंदा करणं हा सरकारचा धंदा नाही म्हणणारं सरकार १०० कंपन्या विकणार
नवी दिल्ली, २५ फेब्रुवारी: खासगीकरणावरील वेबिनारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. ‘धंदा करणं हा सरकारचा ‘धंदा’ नाही. सरकारनं लक्ष लोककल्याणावर केंद्रित असायला हवं. अनेक सरकारी कंपन्या तोड्यात आहेत. त्या कंपन्या करदात्यांच्या पैशांवर तग धरुन आहेत. आजारी कंपन्यांना पैसा पुरवणं हे सरकारला आता जड जात आहे’, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या टर्ममध्ये देशातील काही मोठ्या पण आर्थिक संकटात सापडलेल्या कंपन्यांचं खासगीकरण करण्याबाबत पाऊल टाकलं जात आहे.
केवळ वैभवशाली आहेत म्हणून अशा कंपन्या चालू ठेवू शकत नाही. खासगी क्षेत्र प्रभावीपणे काम करते, नोकऱ्या देते. वापरात नसलेल्या, कमी वापराच्या 100 सरकारी मालमत्ता विकून अडीच लाख कोटी रुपये उभारणार असल्याचंही यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले.
मोदी सरकारने १०० हून अधिक कंपन्यांचे परिक्षण केले असून त्यांच्या निर्गुंतवणूकीकरणामधून अडीच लाख कोटी रुपये उभे करण्याचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवलं आहे, असंही मोदी म्हणाले. म्हणजेच केंद्र सरकारने १०० कंपन्या विकून अडीच लाख कोटी रुपये उभे करण्याचे निश्चित केल्याची माहिती मोदींनी दिली. विशेष म्हणजे फेब्रुवारीच्या सुरुवातील अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये सरकार या कंपन्यांमधील निर्गुंतवणूकीच्या माध्यमातून १.७५ लाख कोटी रुपये उभारणार असल्याचे म्हटले होते. सरकार जुलै-ऑगस्टपर्यंत एअर इंडिया आणि बीपीसीएलमधील भागीदारी विकून या दोन्ही कंपन्यांमधील निर्गुंतवणूक करेल असं सांगितलं जात आहे.
News English Summary: The Modi government has inspected more than 100 companies and aims to raise Rs 2.5 lakh crore from their disinvestment, Modi said. In other words, Modi informed that the central government has decided to sell 100 companies and raise Rs 2.5 lakh crore.
News English Title: Modi government has decided to sell 100 companies news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO
- Monthly Pension Scheme | पैसे असे गुंतवा की, प्रत्येक महिन्याला 12,000 हातामध्ये येतील, 'या' खास योजनेबद्दल जाणून घ्या
- Salman Khan | बिश्नोई गॅंगच्या धमकीमुळे सलमान खान पोहोचणार दुबईला, नेमकं काय आहे सत्य पाहूया
- NTPC Share Price | एनटीपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर तेजीत धावणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NTPC