28 January 2025 12:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

मोदी सरकारचे नवे कामगार कायदे | हातात येणारा पगार कमी होणार आणि PF'वर मोठा परिणाम

New labor laws

नवी दिल्ली, ०६ जून | लवकरच काही महिन्यांमध्ये केंद्र सरकार चार कामगार कायदे लागू करण्याची शक्यता आहे. मोदी सरकार या कामगार कायद्यांवर शेवटच्या टप्य्यात असून तो लवकरात लवकर लागू करण्याची तयारी सुरु झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हाती येणारा एकूण पगार पहिल्यापेक्षा कमी होणार आहे, तर पीएफ वाढणार आहे. कंपन्यांनाही कर्मचाऱ्यांच्या पीएफ फंडमध्ये जादा पैसे टाकावे लागणार आहेत. या नव्या नियमांमुळे बेसिक सॅलरी, भत्ते आणि पीएफचे गणित पूर्णपणे बदलणार आहे.

या ४ केंद्रीय कामगार कायद्यांमध्ये वेतन, मजुरी नियम, औद्योगिक संबंधांवर नियम, कामावेळची सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या ठिकाणची परिस्थिती नियम तसेच सामाजिक आणि व्यावसायिक सुरक्षा नियमांचा समावेश आहे. कामगार मंत्रालयाने हे कायदे एप्रिल 2021 पासून लागू करण्याचे लक्ष्य ठेवले होते. परंतु, सध्याच्या परिस्थितीत ते टाळण्यात आले होते. यामुळे कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या स्ट्रक्चरचे पुनर्रचना करण्यास पुरेसा वेळ मिळाला. ( central government is expected to implement four labor laws in the next few months)

केंद्रीय कामगार मंत्रालयाने या ४ कायद्यांना अंतिम रुप दिले होते. परंतु, ते अंमलात आणण्यात आले नाहीत. कारण अनेक राज्ये हे कायदे लागू करण्याच्या मनस्थितीत नव्हती. भारतीय संविधानानुसार कामगारांशी संबंधित कायदे हे केंद्राने राज्यांना आणि राज्यांनी केंद्राला कळविल्याशिवाय किंवा संमती घेतल्याशिवाय लागू करता येत नाहीत. राज्यांची संमती घेतल्यावर हे कायदे लागू होऊ शकतात. पीटीआयला सूत्रांनी या नवीन कामगार कायद्यांच्या अंमलबजावणीची माहिती दिली आहे. पुढील दोन महिन्यांत हे कायदे लागू होतील.

नेमकी तरतूद काय?
नवीन कायद्यांनुसार सर्व भत्ते एकूण वेतनाच्या 50 टक्क्य़ांपेक्षा अधिक असू शकत नाहीत. यामुळे कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी ही एकूण वेतनाच्या 50 टक्के होणार आहे. याचबरोबर कंपनी आणि कर्मचाऱ्याचे एकूण पीएफ कॉन्ट्रीब्युशनवाढणार आहे. सोबतच ग्रॅच्युईटीची रक्कमदेखील वाढविली जाणार आहे. याचा थेट अर्थ असा की कर्मचाऱ्याची सेव्हिंग वाढणार आहे, परंतु, इन हँड सॅलरी कमी होणार आहे. यांचा दुसरा अर्थ असा आहे की केंद्र सरकार कर्मचाऱ्यांचा अधिकाधिक स्वतःकडे म्हणजे EPFO कडे ठेवण्याच्या तयारीत आहे.

 

News English Summary: The central government is expected to implement four labor laws in the next few months. The Modi government is in the final stages of implementing these labor laws and is preparing to implement them as soon as possible. Therefore, the total salary received by the employees will be less than before, while the PF will increase. Companies will also have to put extra money into employees’ PF funds. These new rules will completely change the arithmetic of basic salary, allowances and PF.

News English Title: Modi government is likely to implement the four labor codes in a couple of months news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x