20 April 2025 8:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

सर्व क्षेत्रात सरकारने असण्याची आवश्यकता नाही | सर्व सरकारी बँकांचे खासगीकरण होणार - पंतप्रधान

Modi government, Privatise, Public sector banks

नवी दिल्ली, २५ फेब्रुवारी: खासगीकरणावरील वेबिनारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. ‘धंदा करणं हा सरकारचा ‘धंदा’ नाही. सरकारनं लक्ष लोककल्याणावर केंद्रित असायला हवं. अनेक सरकारी कंपन्या तोड्यात आहेत. त्या कंपन्या करदात्यांच्या पैशांवर तग धरुन आहेत. आजारी कंपन्यांना पैसा पुरवणं हे सरकारला आता जड जात आहे’, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या टर्ममध्ये देशातील काही मोठ्या पण आर्थिक संकटात सापडलेल्या कंपन्यांचं खासगीकरण करण्याबाबत पाऊल टाकलं जात आहे.

देशातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण करण्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दिले. व्यवसाय करणे हे सरकारचे काम नसून देशातील उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्यास सरकारने प्राधान्य द्यायचे असते. असे समर्थन पंतप्रधानांनी केले.

केंद्रीय अर्थ खात्यांतर्गत येणाऱ्या गुंतवणूक व सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन (दिपम) विभागामार्फत एका दृकश्राव्य माध्यमातून झालेल्या चर्चासत्राला पंतप्रधान संबोधित करत होते. सरकारच्या १.७५ लाख कोटी रुपयांच्या निगुंतवणुकी प्रक्रिया पार पाडण्याचे काम या विभागाकडे आहे. मोदी म्हणाले की, व्यवसाय करणे हे सरकारचे प्रमुख कार्य नव्हे. तर व्यवसायाला सहकार्य करणे यावर सरकारने भर देण्याची मुख्य जबाबदारी आहे. सरकारने स्वत व्यवसाय करणे हा प्राधान्यक्रम असूच शकत नाही.

केंद्र सरकार देशातील सर्व सार्वजनिक बँकांचे खासगीकरण करण्याच्या तयारीत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. सर्व क्षेत्रात सरकारने असण्याची आवश्यकता नाही, असेही ते म्हणाले. सार्वजनिक उपक्रमांच्या अत्याधुनिकरणासाठी सरकारची धोरणे यापुढेही असतील, असेही नमूद केले.

केवळ वैभवशाली आहेत म्हणून अशा कंपन्या चालू ठेवू शकत नाही. खासगी क्षेत्र प्रभावीपणे काम करते, नोकऱ्या देते. वापरात नसलेल्या, कमी वापराच्या 100 सरकारी मालमत्ता विकून अडीच लाख कोटी रुपये उभारणार असल्याचंही यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले.

 

News English Summary: He said the central government was ready to privatise all public sector banks in the country. The government does not need to be in all areas, he added. He also mentioned that the government will continue to have policies for modernisation of public enterprises.

News English Title: Modi government was ready to privatise all public sector banks in the country news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या