18 January 2025 1:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Income Tax Notice | पगारदारांनो, 'या' 9 कारणांमुळे तुम्हाला मिळू शकते इन्कम टॅक्सची नोटीस, असा करू शकता बचाव Motilal Oswal Mutual Fund | नोकरदारांची होतेय मजबूत कमाई, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स नोट करा 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि पगारात किती वाढ होणार? संपूर्ण आकडेवारी पहा Railway Ticket Booking | 90% प्रवाशांना माहित नाही, चार्ट बनवल्यानंतरही मिळेल कन्फर्म तिकीट, तात्काळ तिकिटापेक्षाही पडेल तिकीट Post Office Scheme | पगारदारांनो, पत्नी किंवा मुलीच्या नावावर 2 लाख रुपये FD करा, मिळेल 32,000 रुपयांचे गॅरंटीड व्याज Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग Home Loan EMI | 90% कर्जदारांना माहित नाही, गृहकर्जाचा EMI थकवल्यास बँक अशी टप्प्याटप्याने कारवाई करते, लक्षात ठेवा
x

देश को बिकने नही दूंगा | BPCL कंपनीतील ५२.९८% हिस्सा मोदी सरकार विकणार

Modi govt, Sale stake, BPCL

नवी दिल्ली, ४ जानेवारी: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (बीपीसीएल) खासगीकरणाच्या माध्यमातून पैसा उभारण्याची तयारी केंद्र सरकारने सुरु केली आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनमधील सरकारच्या ५२.९८ टक्के हिस्स्याच्या विक्रीमधून ९० हजार कोटी रुपये उभे करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. सध्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनला विकत घेण्यामध्ये तीन कंपन्यांनी स्वारस्य दाखवलं आहे. (Modi govt decided to sale stake of Bharat Petroleum at Double Valuation)

हिंदुस्तान टाइम्सने बीपीसीएलच्या विक्रीशी संबंधित असणाऱ्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, कंपनीच्या खासगीकरणामधून जास्तीत जास्त पैसा उभा करण्यासाठी बीपीसीएलच्या स्टॉक्सची किंमत याच क्षेत्रातील कंपनीच्या विरोधकांच्या शेअर्स इतकी करण्याचा सरकारचा मानस आहे. तर द मिंटच्या वृत्तानुसार सरकारने जो ५२.९८ टक्के वाटा विक्रीसाठी काढला आहे त्यामधून ९० हजार कोटी रुपये उभं करण्याचं लक्ष समोर ठेवलं आहे. यामध्ये बीपीसीएलच्या इतर संपत्तीचाही समावेश आहे. (The government intends to raise BPCL’s stock to as much as the company’s opponents in the same sector to raise maximum money from the company’s privatisation)

दरम्यान, इस देश को बिकने नही दूंगा ही मोदींची भाषणं आजही समाज माध्यमांवर सहज पाहायला मिळतात. मात्र सत्तेत आल्यापासून नवरत्न कंपन्यांपासून अनेक कंपन्यांमधील हिस्सेदारी विकण्याचा मोदी सरकारने सपाटा लावला आहे. अनेक सरकारी कंपन्यांची अवस्था बिकट असून मोठ्या प्रमाणावर कर्मचारी देखील देशोधडीला लागले आहेत. त्यात आता अजून एका कंपनीची भर पडली आहे.

मोदी सरकारने आणखी एका सरकारी कंपनीतील आपली धोरणात्मक भागीदारी कमी करण्यासाठी बोली लावणार आहे. खाण क्षेत्रातील ही कंपनी बीईएमएल (BEML) असून यामध्ये सरकार व्यवस्थापनावरील नियंत्रणासह आपली 26 टक्के भागीदारी विकणार आहे. त्यामुळे बीईएमएल देखील अशा सरकारी कंपन्यांच्या यादीत सामील झाली आहे, ज्यामध्ये केंद्र सरकार आपले भागभांडवल कमी करणार आहे. बीईएमएलमध्ये भागीदारी घेऊ इच्छिणाऱ्या कंपन्यांना 1 मार्च 2021 पूर्वी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट जमा करावे लागेल.

 

News English Summary: The central government is preparing to raise money through privatization of Bharat Petroleum Corporation Limited (BPCL). The Center plans to raise Rs 90,000 crore from the sale of its 52.98 per cent stake in Bharat Petroleum Corporation. Currently, three companies are interested in acquiring Bharat Petroleum Corporation.

News English Title: Modi govt decided to sale stake of Bharat Petroleum at Double Valuation news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x