26 December 2024 6:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर, अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर निगेटिव्ह परताव्यामुळे फोकसमध्ये, आता फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडियाचा पेनी शेअर अजून घसरणार, कंपनीबाबत अपडेट आली - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत महत्वाचे संकेत, तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: YESBANK Post Office Scheme | महिलांना भरघोस व्याज देणारी योजना, पहा 50,000, 100000, 150000 वर किती परतावा मिळेल Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 93 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 57 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS
x

सामान्य गुंतवणुकदारांची चिंता वाढणार | केंद्र अल्पबचत योजनांचा व्याजदर घटवणार?

Small saving schemes

नवी दिल्ली, २८ जून | मोदी सरकारचे अनेक निर्णय यापूर्वी सामान्य लोकांसाठी आर्थिक नुकसानीचे ठरले आहेत. त्यात महिन्यांपूर्वी देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमुळे लांबवणीवर पडलेल्या अल्पबचत योजनांवरील व्याजदर कपातीच्या निर्णयाची आता मोदी सरकारकडून अंमलबजावणी होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. एप्रिल महिन्यातच केंद्रीय अर्थखात्याने याविषयी अधिकृत घोषणा केली होती. परंतु, ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर या निर्णयामुळे भारतीय जनता पक्षावर प्रचंड टीका झाली होती. परिणामी मोठं राजकीय नुकसान होण्याचा धोका लक्षात घेऊन केंद्रीय अर्थमंत्रालयाने एका रात्रीत संबधित निर्णय रद्द केला होता.

परंतु, आता मोदी सरकार 1 जुलैपासून अल्पबचत योजनांवरील व्याजदरात कपात करू शकते. मागील वर्षी केंद्र सरकारकडून बँकांमधील मुदत ठेव योजनांवरील व्याजदर कमी करण्यात आले होते. त्यानंतर आता अल्पबचत योजनांवरील व्याजदर घटल्यास सामान्य गुंतवणुकदारांच्या चिंता वाढणार आहेत.

त्यामुळे आता सामान्य गुंतणुकदारांना अधिक व्याजदर हवा असल्यास संबंधित योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. याशिवाय, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC), किसान विकास पत्र (KVP), मासिक उत्पन्न योजना (MIS) अशा योजनांमध्ये 1 ते 5 वर्षांपर्यंत गुंतवणूक करुन चांगले व्याज मिळवता येईल.

काय होता मोदी सरकारचा आदेश?
* नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी (1 एप्रिल ते 30 जून 2021) नवे व्याजदर जाहीर करण्यात आले होते. सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीवरील (पीपीएफ) व्याजदर 0.7 टक्क्याने कमी करून 6.4 टक्क्यांवर आणण्यात आला होता.
* पोस्टाच्या बचत खात्यावरील वार्षिक व्यादजर 4 टक्क्यावरुन 3.5 टक्के करण्यात आले होते. तर एक वर्षांच्या मुदतठेवींवरील व्याजदर 5.5 वरून 4.4 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनांवरील व्याज 7.4 वरून 6.5 टक्के करण्यात आले होते.
* राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील व्याजदर 6.8 वरून 5.9 टक्के तर किसान विकासपत्रांवरील व्याजदर 6.9 टक्क्यांवरून 6.2 टक्के करण्यात आले होते. सुकन्या समृद्धी योजनेचेही व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Modi govt may cut down interest rates on small saving schemes from 1 July 2021 news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x