22 November 2024 12:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON
x

रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणानंतर रेल्वे स्थानकांचा लिलाव करण्याची मोदी सरकारची योजना

Modi Govt, Planning, Auction Modernized Railway Stations, Piyush Goyal

नवी दिल्ली, २१ जुलै: देशातल्या १५१ रेल्वे गाड्यांचं खासगीकरणाचा निर्णय घेतल्यानंतर आता मोदी सरकार आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. लवकरच रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण करण्यात येणार असून त्यानंतर या स्थानकांचा लिलाव करण्याची सरकारची योजना आहे. मर्चंट्स चेंबर ऑफ कॉमर्स एँड इंडस्ट्रीकडून (एमसीसीआय) आयोजित करण्यात आलेल्या वेबिनारमध्ये रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी याबद्दलची माहिती दिली.

रेल्वे गाड्यांच्या खासगीकरणासाठीच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं गोयल यांनी वेबिनारला संबोधित करताना म्हटलं. मोदी सरकारचा रेल्वेसाठीचा पुढील प्लानदेखील त्यांनी यावेळी सांगितला. रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण करण्याची सरकारची योजना आहे. त्यानंतर त्यांचा लिलाव करून ती खासगी हातांमध्ये सोपवण्यात येतील, अशी माहिती गोयल यांनी दिली.

दुसरीकडे सरकारकडून सरकारी कंपन्यांबरोबरच सरकारी इन्शूरन्स कंपन्या आणि बँकांच्या खाजगीकरणाची तयारी करण्यात आली आहे. सीएनबीसी आवाजला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार, ‘LIC आणि एक नॉन लाइफ इन्शूरन्स कंपनी सोडून सर्व इन्शूरन्स कंपन्यामधील संपूर्ण भागीदारी हप्त्या-हप्त्याने सरकार विकू शकते. तर दुसरीकडे बँकांच्या खाजगीकरणची देखील योजना आहे. यावर पीएमओ, अर्थ मंत्रालय आमि नीती आयोगाचे एकमत झाले आहे. त्याचप्रमाणे कॅबिनेट ड्राफ्ट नोट देखील तयार करण्यात आली आहे.

या प्रस्तावानुसार, LIC आणि एक नॉन लाइफ इ्न्शूरन्स कंपनी सरकार आपल्याजवळ ठेवेल. आतापर्यंत एकूण 8 सरकारी इन्शूरन्स कंपन्या आहेत. एलआयसी व्यतिरिक्त 6 जनरल इन्शूरन्स आणि एक National Reinsurer कंपनी आहे. मनी कंट्रोलने दिलेल्या बातमीनुसार 6 सरकारी बँका सोडल्यास इतर सर्व बँकांचे खाजगीकरण होऊ शकते. पहिल्या टप्प्यात सरकार बँक ऑफ महाराष्ट्र आणि इंडियन ओव्हरसिज बँकेमधील आपली भागीदारी विकू शकते.

 

News English Summary: After taking the decision to privatize 151 trains in the country, now the Modi government is ready to take another big decision. The railway stations will be modernized soon, after which the government plans to auction them.

News English Title: Modi Govt Planning To Auction Modernized Railway Stations To Private Players says Piyush Goyal News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#PiyushGoyal(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x