17 April 2025 4:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

GDP स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात खराब स्थितीत असेल | मोदी है तो मुमकीन है - राहुल गांधी

Modi hai to mumkin hai, Rahul Gandhi, Declining GDP

नवी दिल्ली, १२ ऑगस्ट : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आर्थिक धोरणांवरून मोदी सरकारवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. इन्फोसिसचे प्रमुख एन. आर. नारायण मूर्ती यांनी हल्लीच केलेल्या एका विधानाचा आधार घेऊन राहुल गांधींनी मोदी सरकारला टोला लगावला आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशाचा आर्थिक विकासाचा दर यावर्षी स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात खराब स्थितीत असेल, असे विधान नारायण मूर्ती यांनी केले होते. त्यावरून मोदी है तो मुमकीन है, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.

कोरोना विषाणू आणि कोरोनाच्या संसर्गात पायबंद घालण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या काही महिन्यांपासून देशातील अनेक उद्योगधंद्यावर परिणाम झाला आहे. उत्पादन घटले असून, व्यवसाय विक्रीवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे देशाच्या विकासदरात मोठी घट झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर नारायण मूर्ती यांनी देशातील सध्याच्या आर्थिक स्थितीबाबत मोठे विधान केले होते.

दरम्यान, गेल्या नऊ महिन्यांपासून संपूर्ण जगाला त्रस्त करणाऱ्या करोनावरील पहिली लस विकसित केल्याचा दावा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मंगळवारी केला. मात्र, या दाव्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञांनी साशंकता व्यक्त केली आहे. ‘स्पुटनिक व्ही’ नावाच्या या लसीची सध्या जोरदार चर्चा सुरु असतानाच याच घटनेच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. मध्य प्रदेश काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन रशियाने शोधलेल्या या लसीवरुन मोदींच्या सध्याच्या लूक्सवरुन खोचक शब्दांमध्ये ट्विट करण्यात आलं आहे.

 

News English Summary: The country’s economic growth rate will be at its worst since independence this year due to the corona virus infection, Narayan Murthy had said. From that, Modi is possible, Rahul Gandhi has said.

News English Title: Modi hai to mumkin hai Rahul Gandhi lashes out at Central Government over declining GDP News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या