23 February 2025 10:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

पंतप्रधान मोदी अदाणींना श्रीमंत तर भारतीयांना गरीब बनवण्यासाठीच ७ वर्ष प्रतिदिन १८ तास काम करत होते - काँग्रेस

Congress leader Srivatsa

बंगळुरू, २४ मे | अदानी ग्रुपचे मालक गौतम अदानी हे आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. त्यांची एकूण मालमत्ता 66.5 अब्ज डॉलर्स आहे. यावर्षी त्यांची संपत्ती 33 अब्ज डॉलर्सने वाढली आहे. म्हणजेच जवळपास 100% वाढ झाली. आशियात पहिल्या क्रमांकावर रिलायन्सचे मुकेश अंबानी आहेत, ज्यांची एकूण संपत्ती 76.5 अब्ज डॉलर आहे. ब्लूमबर्गच्या बिलिनेयर इंडेक्स रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

ज्या प्रकारे गौतम अदाणी सलग पुढे जात आहेत, अशा वेळी ते मुकेश अंबानी यांना पछाडत पुढेही जाऊ शकतात. या दोघांमधील मालमत्तेत केवळ 10 अब्ज डॉलर्सचा फरक आहे. इंफ्रास्ट्रक्चरपासून रिन्यूएबल एनर्जीमध्येही काम करत असलेल्या गौतम अदाणींनी चीनच्या बेवरेजेस येथून फार्मामध्ये काम करत असलेल्या कंपनीचे मालक झौंग शानशान यांना मागे टाकले आहे. शानशान यांची संपत्ती 63.6 अब्ज डॉलर आहे. जागतिक स्तराचा विचार केल्यास अंबानी यावेळी 13 वे श्रीमंत उद्योगपती आहेत तर अदाणी हे 14 व्या क्रमांकावर आहेत.

एका बाजूला लॉकडाऊन’मध्ये सामान्य माणूस आर्थिकदृष्ट्या खचला असताना दुसऱ्या बाजूला देशातील श्रीमंत अतिश्रीमंत होतं असल्याचा विरोधाभास पाहायला मिळतोय. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून विरोधकांनी सातत्याने हे सरकार अदानी-अंबानींचे असल्याचा आरोप करत आलं आहे. याच विषयाला अनुसरून काँग्रेस नेते श्रीवत्सा यांनी मोदी सरकारला टोला लगावला आहे. यासंदर्भात ट्विट करताना त्यांनी, “पंतप्रधान मोदी अदाणींना श्रीमंत तर भारतीयांना गरीब बनवण्यासाठीच ७ वर्ष प्रतिदिन १८ तास काम करत होते”, असा खोचक टोला लगावला आहे.

 

News English Summary: Adani has added $35 Billion to his wealth in 2021 during the pandemic The next 19 Indian billionaires in total added $24 Billion This is the advantage of having your PA as India’s PM Modi has been working 18 hrs a day for the past 7 years to make Adani richer and Indians poorer.

News English Title: Modi has been working 18 hrs a day for the past 7 years to make Adani richer and Indians poorer said congress leader Srivatsa news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#GautamAdani(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x