RBI कडून घेतलेले पैसे केंद्र सरकार कोणत्या योजनांसाठी वापरणार याचं उत्तर मोदींकडे नाही
नवी दिल्ली: माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी देशाच्या जीडीपी दरात झालेल्या घसरणीबद्दल मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मानव निर्मित संकटामुळे भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. या सर्व परिस्थितीला मोदी सरकार जबाबदार आहे, अशी टीका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केली. भारतातल्या आर्थिक क्षेत्रात आलेल्या मरगळीसाठी त्यांनी मोदी सरकारला जबाबदार ठरवले आहे. ही आर्थिक मंदी मानवनिर्मित असून ढिसाळ व्यवस्थापनामुळे निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले.
मोदी सरकारच्या नोटाबंदी आणि जीएसटीच्या धोरणामुळे भारतीय अर्थव्यवस्था मंदीच्या दरीत ढकलली गेली असल्याचा आरोपही यावेळी सिंह यांनी केला. तसेच नोटाबंदी आणि जीएसटीच्या नियमांमुळे देशात मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, मागील तिमाहीचा विचार केला तर विकासदर ५ टक्क्यांवर येवून पोहचला होता जो भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत चिंतेचे वातावरण असल्याचेही सिंह यांनी म्हटले. तसेच उत्पादक क्षेत्राचा विकास हा केवळ ०.६ एवढाच राहिला आहे. तसेच घरगुती वस्तुंच्या मागणीमध्ये निराशा असून विक्रीतील वृद्धी ही मागच्या १८ महिन्यांतील सर्वांत खालच्या स्तरावर गेली असल्याचीही माहिती सिंह यांनी यावेळी दिली. तसेच अर्थव्यवस्थेची ही परिस्थिती पाहुण गुंतवणूकदारांमध्ये निराशा निर्माण झाली आहे आणि हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगले संकेत नसल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.
भारतीय अर्थव्यवस्थेच्या उंबरठ्यावर आर्थिक मंदी येऊन ठेपलेली असताना देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. देशाची अर्थव्यवस्था चिंताजनक स्थितीत आहे. मागील तिमाहीतील विकासदर (जीडीपी) 5 टक्क्यांवर आला आहे. हे आपण मंदीकडे जात असल्याचे निदर्शक आहेत. विकास करण्याची प्रचंड क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत असताना मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे हे आर्थिक आरिष्ट ओढवले आहे, असे मत सिंग यांनी व्यक्त केले.
लोकांचे रोजगार जाण्याचं प्रमाण वाढत असल्याचं सांगत वाहन क्षेत्रात ३ लाख ५० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्याचसोबत असंघटित क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात रोजगार जाण्याचे प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे असा आरोप डॉ. मनमोहन सिंग यांनी केला आहे. तसेच ग्रामीण भागातील भारताची स्थिती विदारक आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे योग्य दर मिळत नाही. उत्पन्नात वारंवार घट होत असल्याचं पाहायला मिळालं आहे असं मनमोहन सिंग यांनी सांगितले.
दरम्यान आरबीआयकडून घेतलेले १ लाख ७६ हजार कोटी रुपये केंद्र सरकार कोणत्या योजनांसाठी वापर करणार आहे, याचं उत्तर नरेंद्र मोदींकडे नाही. निर्यातीचा दर घटल्याने जागतिक बाजारात उपलब्ध झालेल्या संधीचा देशाच्या आर्थिक व्यवस्थेसाठी फायदा करुन घेता आला नाही. सरकारची विश्वासार्हता कमी होत चालली असल्याचा दावा डॉ. मनमोहन सिंग यांनी केला आहे.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील