Lockdown झटका | मुंबईतलं पंचतारांकित 'हयात रिजन्सी' हॉटेल बंद | कर्मचाऱ्यांच्या पगारसाठी पैसाच नाही
मुंबई, ०८ जून | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना महाराष्ट्रात दोन महिन्यांसाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आलं होतं. ७ जून पासून राज्यात अनलॉकची घोषणा करण्यात आली. ज्यात मुंबईतील हॉटेल आणि रेस्टॉरंट्सला परवानगी देण्यात आली आहे. एकीकडे मुंबईतील दुकानदार आणि हॉटेल व्यवसायिकांमध्ये आनंदाचं वातावरण असताना दुसरीकडे हयात रिजन्सी या फाईव्ह स्टार हॉटेलने आपलं कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
सोमवारी रात्री उशीरा हयात हॉटेलच्या व्यवस्थापनाने याविषयी पत्रक जाहीर करत माहिती दिली. कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी कंपनीकडे पैसा नाही, त्याचसोबत दररोजचा कारभार चालवणंही आता शक्य होत नसल्यामुळे हॉटेलचं कामकाज बंद ठेवण्यात येत आहे. हयात हॉटेलचे व्यवस्थापक हरदीप मारवा यांनी कर्मचाऱ्यांना ई-मेल द्वारे याची माहिती दिली. हयात या हॉटेलची मालकी एशियन हॉटेल (वेस्ट) या कंपनीकडे आहे. सध्या कंपनी आर्थिक अडचणीत असल्यामुळे हॉटेल सुरु ठेवणं शक्य नसल्यामुळे हयात हॉटेलचं कामकाज बंद ठेवण्यात आण्याचा निर्णय घेतलाय.
Lockdown चा फटका, मुंबईतलं 5 Star ‘हयात रिजन्सी’ हॉटेल बंद pic.twitter.com/WznrIc5GUU
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) June 8, 2021
सध्या हयात हॉटेलमध्ये थांबलेल्या ग्राहकांची सोय कशी करता येईल याबद्दल व्यवस्थापन विचार करत आहे. एशियन हॉटेल वेस्ट ही कंपनी सध्या आर्थिक डबघाईला आली आहे. २०१९-२० या काळात कंपनीला २१८ कोटींचा तोटा झाल्याचं सांगण्यात येतंय. दरम्यान हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची बाजू मांडण्यासाठी शिवसेनाप्रणित कामगार सेनेने पुढाकार घेतला असून…कंपनीने कर्मचाऱ्यांशी संवाद साधून दोन महिन्यांपासून थकीत पगाराची भरपाई करावी असं आवाहन केलं आहे.
दरम्यान हयात हॉटेलला आपलं कामकाज थांबवावं लागत असल्याबद्दल हॉटेल क्षेत्रातील मंडळींनी चिंता व्यक्त केली आहे. “गेल्या वर्षभरापासून लॉकडाउनमुळे हॉटेल व्यवसाय बंद आहे. आंतरराष्ट्रीय प्रवास, देशांतर्गत प्रवास, कॉर्पोरेट बैठका सध्या होत नसल्यामुळे उत्पन्नाचा स्त्रोत घटत चालला आहे. हॉटेल जेवढं मोठं तेवढा त्याचा खर्च आणि इतर बाबी या जास्त असतात. गेल्या मार्च महिन्यापासून बहुतांश हॉटेल व्यवसायिकांना तोटाच सहन करावा लागतो आहे. केंद्र आणि राज्य सरकारने राज्यांना हॉटेल क्षेत्राला मदत करणं गरजेचं आहे”, असं मत हॉटेल असोसिएशनच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केलं.
News English Summary: Maharashtra was declared locked down for two months while facing the second wave of corona. Unlock was announced in the state from June 7. In which hotels and restaurants in Mumbai are allowed. While there is an atmosphere of happiness among shopkeepers and hoteliers in Mumbai, on the other hand, the five-star hotel Hyatt Regency has decided to close down.
News English Title: Mumbai based 5 star hotel Hyatt Regency suspended operations due to lack of fund news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार