5 November 2024 12:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News Smart Investment | म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून 1 करोड रक्कम तयार करायची आहे, तर वापरा 8-4-3 हा फॉर्मुला - Marathi News Mutual Fund SIP | SIP मध्ये गुंतवा केवळ 5000 रुपये, मिळेल 1.03 कोटी रुपये परतावा, पैशाने पैसा वाढवा - Marathi News
x

सत्ता गेली घोटाळे उघड | नगर बँक अपहारप्रकरणी भाजपच्या माजी खासदारावर गुन्हा दाखल

Nagar Urban Co Operative bank, fraud case registered, Former BJP MP Dilip Gandhi

नगर, २२ डिसेंबर: नगर अर्बन बँकेत तीन कोटीचा अपहार केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे नेते माजी खासदार दिलीप गांधी, घनश्याम अच्युत बल्लाळ, आशुतोष सतिष लांडगे यांच्यासह बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाच्या सदस्यांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा पैशांचा अपहार ७ ऑक्टोबर २०१७ ते १० नोव्हेंबर २०१७ यादरम्यान झाला आहे. याप्रकरणी आज बँकेचे अधिकारी मारुती औटी यांनी तक्रार दिली असून त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दिलीप गांधी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे नगरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Nagar Urban Co Operative bank fraud case registered against former BJP MP Dilip Gandhi)

मागील काही वर्षांपासून नगर अर्बन बॅंकेचा एनपीए सातत्याने वाढत आहे. २०१८ मध्ये तो 30.53 टक्‍क्‍यांवर पोहोचला होता. त्या वेळी झालेल्या लेखापरीक्षणाच्या अहवालात बॅंकेला एनपीए कमी करण्याची सक्त ताकीद रिझर्व्ह बॅंकेने दिली होती. तथापि, या वर्षी तो पुन्हा वाढल्याचे अहवालात स्पष्ट झाले होते. २०१९ मध्ये एनपीए जवळपास 40 टक्‍क्‍यांवर पोचल्याचे लेखापरीक्षण अहवालात म्हटले होते. हाच एनपीए बॅंकेच्या अहवालानुसार 33 टक्‍क्‍यांपर्यंत असल्याचा दावा केला गेल्याचे समजते. कर्जवितरणातील या प्रमुख मुद्द्यासह अन्य काही गंभीर मुद्द्यांवरही रिझर्व्ह बॅंकेतर्फे आक्षेप नोंदविण्यात आले होते. त्याचे समाधानकारक खुलासे होत नसल्याने ऑगस्ट २०१९ मध्ये बॅंकेच्या संचालक मंडळाचे अधिकारच गोठविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. (Nagar Urban Bank’s NPA has been steadily rising for the last few years. In 2018, it had reached 30.53 per cent)

दरम्यान, आरोपींनी अपहार केलेली रक्कम तब्बल तीन कोटी एवढी आहे. आरोपींनी स्वतःच्या अधिकारांचा गैरवापर करून अवास्तव व १३ खोटी कर्ज प्रकरणे मंजूर केलेली आहेत. या कर्ज प्रकरणाच्या आधारेच आरोपींनी बँकेच्या रकमेची चोरी, अफरातफर व फसवणूक केलेली आहे. या फिर्यादीवरून माजी खासदार दिलीप गांधी यांच्यासह घनशाम अच्युत बल्लाळ व आशुतोष सतिष लांडगे तसेच तत्कालीन संचालक मंडळाच्या सदस्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

 

News English Summary: BJP leader and former MP Dilip Gandhi, Ghanshyam Achyut Ballal, Ashutosh Satish Landage and other members of the bank’s board of directors have been booked at the Kotwali police station for embezzling Rs 3 crore from the Nagar Urban Bank. The embezzlement took place between October 7, 2017 and November 10, 2017. A complaint has been lodged in this regard by Maruti Auti, a bank official, today. Meanwhile, the filing of a case against Dilip Gandhi has caused a stir in the political circles of the city.

News English Title: Nagar Urban Co Operative bank fraud case registered against former BJP MP Dilip Gandhi news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x