मोदीजी, लौटा दो हमारे बुरे दिन | महिला महागाईला कंटाळल्या
सांगली, २९ डिसेंबर: मागील दोन महिन्यांपासून वारंवार सुरू असलेल्या गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची महिला आघाडी आक्रमक झाली आहे. दरवाढीच्या निषेधार्थ सांगली येथे महिला आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. (NCP women wing protests against LPG cylinder rate hike in Sangli)
राष्ट्रवादीच्या महिला आघाडीने मंगळवारी सांगलीत रस्त्यावरच चूल पेटवून केंद्र सरकारच्या निषेधार्थ आंदोलन केले. चूलमुक्त भारताची घोषणा करणाऱ्या केंद्र सरकारने पुन्हा महिलांवर चूल पेटवण्याची वेळ आणली, असा आरोप महिला आघाडीने केला आहे. केंद्र सरकारने तातडीने गॅस सिलिंडरची दरवाढ रद्द करावी, अन्यथा सर्व पेट्रोल पंपांवर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फलक काढून टाकू, असा इशारा राष्ट्रवादीच्या महिला आघाडीने दिला आहे. यावेळी ‘मोदीजी, नही चाहिए अच्छे दिन, लौटा दो हमारे बुरे दिन’, ‘भाजप सरकार होश में आओ, जनता से तुम ना टकराओ’, अशा घोषणांचे फलक घेऊन महिला कार्यकर्त्या आंदोलनात उतरल्या होत्या.
दरम्यान, कोरोना आपत्तीमुळे लॉकडाउनच्या संकटात सापडलेल्या सामान्य लोकांची आर्थिक स्थिती बेताची झालेली असताना इतर गोष्टी देखील महाग झाल्या आहेत. मोदी सरकारने ज्या मुद्यांवरून निवडणुका जिंकल्या त्याच मुद्यावर सरकार लक्ष द्यायला देखील तयार नसल्याने सामान्य लोकांची स्थित बिकट होतं चालली आहे. त्यात रोजच्या जीवनातील महत्वाचा असणाऱ्या गॅसचे दर देखील गगनाला भिडले आहेत.
ऑईंल कंपन्यांनी एलपीजी (New LPG Prices) सिलिंडरच्या किंमतीमध्ये घसघशीत वाढ केली होती. 14.2 किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत एकूण 50 रुपयांनी वाढविली होती. अशाचप्रकारे 5 किलोग्रॅम छोट्या सिलिंडरच्या किंमतीत 18 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे 1 डिसेंबरला कोणतीही वाढ केली नव्हती. इंडियन ऑईलच्या संकेतस्थळानुसार 14.2 किलोचा सबसिडी नसलेला गॅस सिलिंडर दिल्लीमध्ये 594 रुपये होता.
News English Summary: The women’s front of the Nationalist Congress Party has been aggressive against the gas price hike that has been going on for the last two months. An agitation was organised outside the NCP office on behalf of the Women’s Front in Sangli to protest against the hike. The Nationalist Women’s Front (NWF) on Tuesday staged a protest on the streets of Sangli against the central government.
News English Title: NCP women wing protests against LPG cylinder rate hike in Sangli news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार