Alert | पुढील महिन्यापासून TDS नियम बदलणार | ५० पटींनी दंड | वाचा कोणाला लागू
मुंबई, १९ जून | नवीन फायनान्स ऍक्ट २०२१ लागू होणार आहे. यानंतर टीडीएसमध्ये काही बदल होणार आहेत. हे बदल येत्या १ जुलैपासून लागू होतील. हे बदल नवीन साहित्या खरेदी आणि आयटीआर फाईलन करणाऱ्यांसंबंधी आहे. यामध्ये जबर दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
नुकताच सेक्शन 194Q जोडण्यात आले आहे. हे सेक्शन सामान खरेदी करण्याच्या आधीच ठरलेल्या किंमतीवर लागणाऱ्या टीडीएसशी संबंधित आहे. यानुसार ५० लाख रुपयांपेक्षा अधिकच्या व्यावसायिक खरेदीवर ०.१० टक्के टीडीएस लावला जाणार आहे. मागील वर्षी एखाद्या व्यावसायिकाचा टर्नओव्हर १० कोटी रुपयांहून अधिक झाला असेल तर आणि जर तो यंदा ५० लाखांहून अधिक माल खरेदी करलत असेल तर त्याला ५० लाखांच्यावर जेवढी विक्री होईल त्यावर हा टीडीएस द्यावा लागणार आहे.
१ जुलैपासून 206एबी सेक्शन देखील लागू होणार आहे. यानुसार विक्रेत्याने जर दोन वर्षांपासून आयकर भरला नसेल तर त्याला हा टीडीएस ५ टक्के भरावा लागणार आहे. म्हणजेच जो टीडीएस ०.१० टक्के होता तो ५० पटींनी वाढणार आहे. जर गेल्य़ा वर्षी टीसीएस (टॅक्स कलेक्टेड एट सोर्स) 50 हजार रुपयांहून जास्त असेल तरी देखील टीडीएस कपात ५ टक्क्यांची केली जाणार आहे.
जर तुम्ही आधार-पॅन लिंक करायला विसरला असाल तर ही शेवटची संधी आहे. ३० जूनला शेवटची तारीख देण्यात आली आहे. यानंतर १ जुलैपासून मोठा दंड केला जाणार आहे. आधार व पॅन ही दोन्ही कार्डे आता प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचे घटक ठरू लागले आहेत. अनेकदा आर्थिक व्यवहारांसाठी या दोन्हीपैकी एका कार्डाची अनिवार्यता असते. प्राप्तिकराचे विवरणपत्र भरण्यासाठी तर पॅन क्रमांक असणे सक्तीचे करण्यात आले आहे.
आधार कार्डवर जसे नाव असेल त्याच क्रमाने ‘लिंक आधार’वर नाव नमूद करा. जन्मतारीख, पत्ता इत्यादी आवश्यक सर्व रकाने काळजीपूर्वक भरा. सगळ्यात शेवटी कॅपचा कोड एन्टर करा, असे लिहिले असेल. हा कॅपचा कोडही नीट पाहून नमूद करा. आधार आणि पॅन कार्ड संलग्न करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. दोन्ही कार्ड संलग्न न केल्यास १ हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. www.incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. त्यानंतर त्यावर तुमचा पॅन कार्डाचा आणि आधार कार्डाचा क्रमांक त्यावर नमूद करा
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.
News Title: New TDS rules will change in next month 50 times fine on delay know news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL