22 December 2024 10:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

अदानी ग्रुपमधील ४३५०० कोटींची गुंतवणूक रडारवर | 'NSDL'ने ३ परदेशी गुंतवणूकदारांची खाती गोठवली

Gautam Adani

नवी दिल्ली, १४ जून | मालकी हक्क आणि लाभार्थ्यांबाबत माहिती दडवल्याचा ठपका ठेवत नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) तीन बड्या संस्थात्मक गुंतवणूकदारांची खाती गोठवली आहेत. अब्दुला इन्व्हेस्टमेंट फंड, क्रेस्टा फंड आणि एपीएमएस इन्व्हेस्टमेंट फंड या तीन परदेशी फंडांची खाती गोठवण्यात आली आहेत. या तिन्ही कंपन्यांनी अदानी समूहात तब्बल ४३५०० कोटीची गुंतवणूक केली आहे. ‘एनएसडीएल’ने केलेल्या या कारवाईने या कंपन्यांना तूर्त अदानी समूहाच्या शेअरची खरेदी किंवा विक्री करता येणार नाही.

नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) आपल्या वेबसाईटवर याबाबत माहिती दिली आहे. ज्यात ३१ मे २०२१ पूर्वी अब्दुला इन्व्हेस्टमेंट फंड, क्रेस्टा फंड आणि एपीएमएस इन्व्हेस्टमेंट फंड या तीन परदेशी फंडांची खाती गोठवण्यात आली आहेत. मालकी हक्क आणि लाभार्थीं यांच्या बाबत अपुरी माहिती दिल्याचे ‘एनएसडीएल’च्या निदर्शनात आले आहे. मनी लॉंडरिंग कायदाअंतर्गत डिपॉझिटरीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. अदानी समूहातील बड्या गुंतवणूकादांची झालेली कोंडी अदानी समूहाचा झटका मानला जात आहे.

सुचेता दलाल यांच्या ट्विटने शेअर बाजारात भूकंप:
दुसरीकडे, शेअर बाजारात आणखी एक घोटाळा होत असल्याचं सूचक ट्विट हर्षद मेहताचा घोटाळा उघडकीस आणणाऱ्या पत्रकार सुचेता दलाल यांनी शनिवारी केलं. त्याचा परिणाम आता बाजारात दिसून येत आहे. मुंबई शेअर बाजार कोसळला आहे. अनेक शेअर्सच्या किमतीत घसरण झाली आहे. सुचेता दलाल यांनी त्यांच्या ट्विटमध्ये एक समूह असा उल्लेख केला होता. परंतु, त्यांनी ट्विटमध्ये समूहाचं नाव स्पष्ट केलं नव्हतं.

सेबीकडे असलेल्या ट्रॅकिंग यंत्रणेकडे उपलब्ध असलेल्या माहितीच्या बाहेर असलेला आणि उघडकीस येण्यास अवघड असलेला आणखी एक घोटाळा. एका समूहाच्या मूल्यात सातत्यानं हेराफेरी सुरू आहे. परदेशातील संस्थांच्या मदतीनं हा सगळा प्रकार सुरू आहे. तेच त्यांचं वैशिष्ट्य. काहीच बदललेलं नाही,’ असं ट्विट सुचेता दलाल यांनी शनिवारी केलं. त्याचे पडसाद आज शेअर बाजारात उमटले.

सुचेता दलाल यांच्या ट्विटचा परिणाम शेअर बाजार सुरू होताच लगेच दिसून आला. बाजाराचं कामकाज सुरू झाल्यानंतर अर्ध्या टक्क्याची घसरण दिसून आली. सेन्सेक्स ३५० अंकांनी खाली आला. विशेष म्हणजे अदानी समूहाच्या ६ पैकी ५ कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत ५ ते २० टक्क्यांची घसरण झाली. अदानी ग्रीन, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी गॅसच्या शेअर्सच्या मूल्यात लक्षणीय घट झाली.

 

News Title: NSDL frozen three FPI accounts which was hold 43500 crore in Adani group stocks news updates.

हॅशटॅग्स

#GautamAdani(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x