11 January 2025 2:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Benefits | 90 टक्के लोकांना माहित नाही, घर खरेदीसाठी पैसे असूनही लोक गृहकर्ज का घेतात, हे आहे फायद्याचे गणित Post Office Schemes | पोस्ट ऑफिसच्या '6' दमदार योजना, लाखोंच्या घरात परतावा मिळेल, सरकारी योजनांचा फायदा घ्या Bajaj Pulsar | नवीन बजाज 'पल्सर RS 200' लॉन्च ; ॲडव्हान्स फीचर्स आहेत कमालीचे, किंमत पाहून लगेच खरेदी कराल IREDA Share Price | इरेडा शेअर 6 महिन्यात 28 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA IPO GMP | स्वस्त IPO आला रे, GMP रॉकेट तेजीत, फक्त 14,124 रुपयांची गुंतवणूक मालामाल करणार - IPO Watch Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या; आर्थिक चणचण जाणवत असेल तर घरच्या घरी तुफान चालणारे व्यवसाय सुरू करा Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
x

आणखी एक १३९४.४३ कोटींचा मोठा घोटाळा

मुंबई : सर्वात आधी पीएनबी १३ हजार कोटी आणि अनेक बँकेचे घोटाळे गाजत असताना आता पुन्हा युनियन बॅंकेसहित आठ बँकांमध्ये १३९४.४३ कोटींचा घोटाळा उघडकीस आला आहे. टोटेम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीविरुद्ध युनियन बँकेच्या तक्रारीनंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.

टोटेम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे मालक टोटेमपुदी कविता आणि टोटेमपुदी सलालिथ या दोघांविरुध्द सीबीआयने गुन्हा दाखल केला असून युनियन बँकेने सीबीआयकडे तशी रीतसर तक्रार दाखल केली होती.

टोटेमपुदी कविता आणि टोटेमपुदी सलालिथ यांच्या टोटेम इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने युनियन बँक ऑफ इंडिया सहित तब्बल ८ बँकांकडून कर्ज घेतलं होत, त्यांच्या इंडस्ट्रियल फायनान्स ब्रांचने टोटेम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला ३१३ कोटींचं कर्ज दिले होते. बँकेच्या तक्रारी नंतर सीबीआयने कंपनीच्या संचालकांची चौकशी सुरु केल्याचे वृत्त ए.एन.आय ह्या वृत्त वाहिनेने दिले आहे.

संपूर्ण देशभरात बँकेतील या महाघोटाळ्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून, सर्वसामान्य लोकांकडून खूप तिखट प्रतिक्रिया येत आहेत. या आधीच्या सर्व घोटाळ्यातील आरोपींनी आधीच परदेशी पलायन केले आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#Nirav Modi(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x