23 February 2025 10:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

'ओपेक'चा निर्णय त्यात मोदी सरकारच्या चुप्पी'मुळे पेट्रोल-डिझेल आणि महागाईचा भडका उडणार

नवी दिल्ली : संपूर्ण भारतात पेट्रोल डिझेलच्या किमतींनी उच्चांक गाठला असताना आणि पर्यायाने वाढणाऱ्या महागाईमुळे सामान्य माणूस आधीच होरपळला असताना, त्यात ‘ओपेक’च्या निर्णयामुळे इंधनदराचा भडका उडण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे भविष्यात प्रवास खर्च वाढून महागाईत प्रचंड वाढ होऊ शकते.

ओपेक (OPEC) ही तेल उत्पादक देशांची संघटना असून त्यांनी कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवण्यास पूर्णपणे नकार दिला आहे. ओपेकच्या या विसंगत निर्णयामुळे कच्च्या तेलाची किंमत तब्बल ८० डॉलर प्रति बॅरलपेक्षा अधिक झाली आहे. त्यात अमेरिकेने घातलेल्या बंदीनंतर इराणकडून होणारा तेल पुरवठा आधीच कमी झाला आहे. दरम्यान, या निर्णयामुळे कच्च्या तेलाची किंमत १०० डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

केवळ इराणकडून कमी पुरवठा करण्यात आल्याने इतर देश तेल उत्पादन वाढवणार नाहीत, असा महत्वाचा निर्णय रशियाच्या नेतृत्वाखालील तेल उत्पादक आणि निर्यात करणाऱ्या देशांनी एकत्रित घेतला आहे. रशियाच्या या निर्णयामुळे कच्च्या तेलाची किंमत २ डॉलर प्रति बॅरलने वाढून ती ८१ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली आहे.

दरम्यान, सर्व गरजू देशांना त्यांच्या गरजेपुरते कच्चे तेल मिळत आहे, असे सौदी अरेबियाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे तेलाच्या पुरवठ्यासंबंधी सध्या कोणतीही समस्या नसल्याने उत्पादनात अतिरिक्त नफा कमावण्याची सुद्धा गरज नाही असं सौदी अरेबिया म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेलाच्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी एकूण उत्पादन वाढवण्याची मागणी ओपेक’कडे केली होती, जी ओपेक’ने अप्रत्यक्ष धुडकावली आहे. येत्या ख्रिसमसपर्यंत कच्चा तेलाच्या किंमती ९० डॉलर प्रति बॅरल आणि २०१९ च्या जानेवारीच्या महिन्यात त्या १०० डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचतील अशी शक्यता आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x