20 September 2024 12:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Monthly Pension Money | 1000 रुपयांची गुंतवणूक प्रत्येक महिन्याला बनवेल लखपती, सरकारी पेन्शनचा फायदा घ्या - Marathi News NTPC Share Price | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, मजबूत तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत अपडेट, रॉकेट स्पीडने कमाई होणार, यापूर्वी 1171% परतावा दिला - Marathi News Yes Bank Share Price | येस बँक शेअरची तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News Senior Citizen Saving Scheme | एशो-आरामात जाईल रिटायरमेंटनंतरचं आयुष्य, SBI बँकेची खास स्कीम देईल मोठा परतावा Aditi Rao Hydari | अदिती आणि सिद्धार्थच्या लग्नात 'तो' फोटो घेण्यासाठी करावे लागले होते चांगलेच कष्ट, शेअर केला अनुभव Kangana Ranaut | पाकिस्तानमध्ये देखील बॉलीवूड स्टार 'कंगना रनौतची' हवा, महिलेने काढलाय हुबेहूब कंगनासारखा आवाज
x

ठाकरे सरकारचे सल्लागार कोण समजत नाही | राज्य बुडवायला निघालेत - फडणवीस

Devendra Fadnavis, Thackeray govt, Metro 3 Car shed land

मुंबई, १८ डिसेंबर: कांजूरमार्गमध्ये मेट्रो कारशेड उभारण्यास केंद्राच्या याचिकेमुळे उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील जागेत कारशेड उभारण्याच्या पर्यायावर राज्य सरकारने चाचपणी सुरू केली आहे. दरम्यान यावरुन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे. सल्लागार राज्य बुडवायला निघाले आहेत अशी टीका त्यांनी केली आहे. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.

राज्य सरकारचे सल्लागार कोण आहेत, हे समजत नाही, जे या राज्यालाही बुडवायला निघाले आहे आणि या सरकारलाही, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Opposition leader Devendra Fadnavis) यांनी केली. कांजुरमार्गमधील मेट्रो कारशेडची (Mumbai Metro 3 Car shed) जागा वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सला (BKC) हलवण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस नागपुरात बोलत होते.

बुलेट ट्रेन स्टेशनची जागा सरकार मेट्रो कारशेडसाठी घेण्याचा निर्णय हास्यास्पद आहे. त्याची अधिकृत घोषणा झाली का, माहिती नाही, परंतु हा पोरखेळ चालवला आहे. बीकेसीची जागा ही प्राईज लँड आहे. 1800 कोटी रुपये प्रतिहेक्टर खर्च आला. त्यामुळे 25 हेक्टर जागेसाठी 25 ते 30 हजार कोटी रुपयांचा खर्च येईल. बुलेट ट्रेनच्या स्टेशनची रचना जमिनीच्या तीन लेव्हल खाली करण्यात आली आहे. तर जमिनीवर केवळ पाचशे मीटर जागा व्यापली जाईल. आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्राच्या इमारती जमिनीवर असतील. मात्र बुलेट स्टेशन जर आता खाली नेलं तर सध्याचा पाचशे कोटींचा खर्च पाच ते सहा हजार कोटींवर जाईल, अशी शक्यता देवेंद्र फडणवीस यांनी वर्तवली.

 

News English Summary: Opposition leader Devendra Fadnavis has said that he does not know who are the advisors to the state government, which is going to drown this state and this government as well. Fadnavis was speaking in Nagpur on the backdrop of the decision to shift the Mumbai Metro 3 Car shed at Kanjurmarg to the Bandra Kurla Complex (BKC).

News English Title: Opposition leader Devendra Fadnavis slams Thackeray govt over Mumbai Metro 3 Car shed land news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x