महत्वाच्या बातम्या
-
जमीन खरेदीत गैरव्यवहार | हा गुन्हा घडताना ते भाजपमध्ये होते | ED कोर्टाचं निरीक्षण
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. प्राथमिकदृष्ट्या पाहता एकनाथ खडसेंनी पुणे जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचं स्पष्ट दिसतंय, असं स्पष्ट निरीक्षण ईडी कोर्टाने नोंदवलं आहे. त्यामुळे खडसेंचा पाय आणखी खोलात जाण्याची चिन्हं आहेत.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेना आ. प्रताप सरनाईकांशी संबंधित NSEL प्रकरणी ईडीला हायकोर्टाचा दणका
शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांशी संबंधित एनएसईएल प्रकरणी ईडीला मुंबई उच्च न्यायालयानं दणका दिला आहे. या प्रकरणातील आरोपी योगेश देशमुख यांचा जामीन रद्द करण्यासाठी तपासयंत्रणेनं दाखल केलेली याचिका हायकोर्टानं फेटाळून लावली आहे. विकासक योगेश देशमुख हे शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांचे निकटवर्तीय समजले जातात. योगेश देशमुख यांना ईडीनं मनी लाँड्रींग प्रकरणी अटक केली होती.
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा धसका | केंद्राने मसूरच्या हमीभावात 400 आणि गहू प्रति क्विंटल 40 रुपयांनी वाढवला
कोरोना संकटामुळे त्रस्त असलेल्या कापड क्षेत्राला सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी वस्त्रोद्योगासाठी PLI योजनेला मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची ही बैठक झाली.
4 वर्षांपूर्वी -
Income Tax Return file | 'या' तारखेनंतर भरल्यास आकारला जाणार ५ हजार रुपयांचा दंड
इनकम टॅक्स रिटर्न फाइल (Income tax return file) करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. करदात्यांना दिलासा देत केंद्र सरकारने नुकतीच त्याची मुदत वाढवली आहे. आता जर तुम्ही 30 सप्टेंबर नंतर रिटर्न भरले तर तुम्हाला 5,000 रुपये दंड भरावा लागेल. हे नियम इनकम टॅक्स डिपार्टमेंटने बनवले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
सर्वसामान्य नागरिक कधीही कर्ज बुडवत नाही | मोठी माणसेच नेहमी कर्ज बुडवतात - शरद पवार
देशात गुजरात आणि महाराष्ट्राचं योगदान हे सहकार क्षेत्रात खूप मोठं आहे. आज सहकार हा विषय देशपातळीवर बघणारे नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे दोघेही गुजरातचे आहेत. अमित शाह तर स्वतः हा अहमदाबाद सहकारी संस्थेचे संचालक होते. ज्या लोकांच्या आयुष्यातील काही कालखंड हे सहकारात गेलं, ते सहकाराला उद्ध्वस्त करू शकत नाहीत, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं.
4 वर्षांपूर्वी -
Bitcoin | बिटकॉईन म्हणजे काय? | ब्लॉकचेन म्हणजे काय? - नक्की वाचा
बिटकॉईन नेमकं काय आहे? आणि क्रिप्टोकरन्सी म्हणजे नेमकं काय? जुलै 2020 मध्येही बिटकॉईन चर्चेत आलं होतं. तेव्हा बिल गेट्स, जेफ बेझोस, इलॉन मस्क यांच्यासारख्या अब्जाधीशांसोबतच अमेरिकेतल्या अनेक दिग्गजांचे ट्विटर अकाऊंट्स एका सायबर हल्ल्याद्वारे हॅक करण्यात आले होते. या हल्ल्याला बिटकॉईन स्कॅम म्हटलं गेलं होतं. याद्वारे बराक ओबामा, जो बायडन, कान्ये वेस्ट यांच्या ऑफिशल अकाऊंट्सकडेही क्रिप्टोकरन्सीमध्ये देणगी मागण्यात आली होती.
4 वर्षांपूर्वी -
गैव्यवहारांविरोधात देशात कमिशन आहेत | ईडीच्या कारवायांचा मुद्दा संसदेत मांडणार - शरद पवार
मागील दोन-तीन वर्षांत देशात नवीन यंत्रणा लोकांना माहिती झाली आहे. त्या यंत्रणेचं नाव आहे ईडी. ही ईडी कुणाच्या मागे कशी लागेल काही सांगता येत नाही. कालच अकोल्यातून भावना गवळी नावाच्या शिवसेनेच्या खासदार आल्या होत्या. त्यांच्या ३-४ संस्था आहेत. ३ शिक्षणसंस्था आणि एक दुसरी छोटी संस्था आहे. त्याचा व्यवहारही २०-२५ कोटींच्या आत आहे.
4 वर्षांपूर्वी -
EPFO सदस्यांचे नॉमिनी बदलण्याची प्रक्रिया जाणून घ्या
ईपीएफओने पीएफ ग्राहकांना नॉमिनी (EPFO Nominee) बलण्याचा अधिकार दिला आहे. पीएफ सदस्यांना यासाठी नियोक्त्याची एनओसी घेण्याची गरज नाही. हे सदस्य स्वत:त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा तपशील त्यांच्या PF खात्यावर फोटोसह अपलोड करू शकतील. या अधिकारामुळे पीएफ सदस्यांच्या अकाली मृत्यूमुळे नॉमिनी असलेल्या व्यक्तीला चिंता करायची गरज नाही. सदस्यांचे मृत्यू प्रमाणपत्र जोडल्यास अंतिम थकबाकीची प्रक्रिया सुरू होईल.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी बांधवांनो | रब्बी बियाणे अनुदान योजना ऑनलाईन अर्ज करा, तुमच्या मोबाईलवरून - वाचा प्रक्रिया
शेतकरी बंधुंनो रब्बी बियाणे अनुदान योजना संदर्भातील ऑनलाईन अर्ज आता मोबाईलवरून देखील भरता येणार आहे या संदर्भातील माहिती जाणून घेवूयात. शेतकरी बांधव आता रब्बी बियाण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि शासकीय अनुदानाचा लाभ घेऊ शकतात. प्रमाणित बियाणांची वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारित कृषी अवजारे, सिंचन सुविधा यासाठी ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे दिनांक 30 ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०२१ पर्यंत महाडीबीटी या पोर्टलवर अर्ज करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
Kisan Mahapanchayat | कृषी कायद्यांविरोधात आणि विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा या तारखेला भारत बंद
कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकरी आंदोलनाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी उत्तर प्रदेशमध्ये महापंचायतीच्या माध्यमातून कृषी कायदे तसेच शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांना घेऊन केंद्र सरकारवर टीका केली. तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी 27 सप्टेंबर रोजी भारत बंदची घोषणा केली. टिकैत यांच्या या घोषणेनंतर आता केंद्र सरकारच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | बँक ऑफ महाराष्ट्र 190 पदांची भरती | पगार ६४ हजार
बँक ऑफ महाराष्ट्र भर्ती 2021. बँक ऑफ महाराष्ट्र 190 विशेषज्ञ अधिकारी पदासाठी अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 19 सप्टेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी बीओएम भरती 2021 साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
आरएसएस संबंधित मासिकाचा इन्फोसिसवर निशाणा | थेट अँटीनॅशनल ताकदींशी संबंधित कंपनी म्हटले
राष्ट्रीय स्वयंसेवक संघा (RSS) शी संबंधित मासिक पाञ्चजन्यने आपल्या नवीन आवृत्तीत देशातील मोठी आयटी कंपनी इन्फोसिसवर गंभीर आरोप केले आहेत. मासिकाने म्हटले आहे की इन्फोसिस देशविरोधी शक्तींशी संबंधित आहे आणि नक्षलवादी, डावे आणि तुकडे तुकडे गँगचा सहयोगी आहे. मासिकाने असेही म्हटले आहे की, इन्फोसिस जाणूनबुजून भारतीय अर्थव्यवस्था अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे.
4 वर्षांपूर्वी -
पालघरच्या मच्छीमारची घोळ माशामुळे लॉटरी | एका दिवसात एवढ्या कोटींचा लिलाव
महाराष्ट्रातील पालघरमध्ये एक मच्छीमार एका झटक्यात करोडपती झाला आहे. पालघरमध्ये फिशिंग टेकल म्हणून काम करणारे चंद्रकांत तरे आपल्या 7 साथीदारांसह नेहमीप्रमाणे समुद्रात मासेमारीला गेले. मात्र, यावेळी जाळ्यात अडकलेल्या माशांची किंमत कोट्यवधी होती आणि नशिबच पालटलं. यावेळी ‘सी गोल्ड’ नावाचे दुर्मिळ मासे (Sea Gold fish) त्यांच्या जाळ्यात अडकले. आणि लॉटरीच लागली.
4 वर्षांपूर्वी -
SBI च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी अलर्ट | बँकेच्या 'या' 7 सेवांपासून राहवं लागणार वंचित
एसबीआयने (SBI) आपल्या करोडो ग्राहकांसाठी अलर्ट जाहीर केला आहे. आता भारतीय स्टेट बॅंकेच्या 4 ते 5 सप्टेंबर काही तासांसाठी इंटरनेट बॅंकिंगसह (Internet Banking) 7 प्रकारच्या सेवा बंद करण्यात येणार आहेत. बॅंकेकडून या सेवा तात्पुरत्या काळासाठी विस्कळीत होतील असे सांगण्यात आले होते. बॅंकेने दिलेल्या माहितीनुसार, 4 ते 5 सप्टेंबरच्या रात्री देखभाल उपक्रमांसाठी या सेवा तीन तासांसाठी बंद राहणार आहेत. त्यामुळे या काळात एसबीआय ग्राहक बॅंकिंग सेवा वापरता येणार नाहीत.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर आता महाराष्ट्रातील व्यापारी मार्गावरही अदानी समूहाचा ताबा
मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळापाठोपाठ आता राज्यातील व्यापारी मार्गावरही अदानी समूहाच्या ताब्यात गेला आहे. महाराष्ट्राच्या सहा राज्यांशी लागून असलेल्या सीमेवरील तपासणी नाक्यांच्या प्रकल्पांचा कारभार आता अदानी समूहकाडे असेल.
4 वर्षांपूर्वी -
सामान्यांचे जगणे महाग | घरगुती एलपीजी सिलिंडर 25 रुपयांनी महागला
सरकारी तेल कंपन्यांनी आज म्हणजेच 1 सप्टेंबर रोजी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमती वाढवल्या आहेत. दिल्लीत विनाअनुदानित 14.2 किलो गॅस सिलिंडरच्या किमतीत 25 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आता दिल्लीत 14.2 किलो एलपीजी सिलिंडर 884.50 रुपये झाले आहे. त्याचबरोबर 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीतही 75 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
उद्यापासून EPF, बॅंक, LPG, OTT, रेशन कार्डच्या या नियमांमध्ये होणार बदल | तुमच्यावर असा होणार परिणाम
सप्टेंबरच्या 1 तारखेपासून अनेक नियमांत बदल होणार आहेत. हे बदल ईपीएफ, धनादेश वटविणे, बचत खात्यावर व्याज, एलपीजी सिलिंडर, कार ड्रायव्हिंग आणि ओटीटी प्लॅटफॉर्मशी संबंधित बाबींशी आहेत.
4 वर्षांपूर्वी -
भाजपचे उत्पन्न 50 टक्क्यांनी म्हणजे 3,623.28 कोटीने वाढले, पण तुमचे? | राहुल गांधींचा सामान्यांना प्रश्न
भाजपच्या वाढलेल्या संपत्तीवरून काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी भाजपवर शनिवारी जोरदार टीका केली आहे. भाजपची संपत्ती 50 टक्क्यांनी वाढली आहे, तुमची किती? असे ट्विट करत राहुल यांनी भाजपवर निशाणा साधला. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या आकडेवारीनुसार 2019-20 मध्ये भाजपच्या संपत्तीत 3,623.28 कोटी रुपयांनी वाढली आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांनो | तुमच्याकडे स्वदेशी गाई आहेत? | तर मिळू शकतील ५ लाख | वाचा, असा ऑनलाईन अर्ज करा
शेतकरी बंधुंनो राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार म्हणजेच राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार 2021 साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा, कोणत्या वेबसाईटवर करावा या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत. अनेक शेतकरी बांधव दुग्धव्यवसाय करतात. दुग्धव्यवसाय करतांना बरेच शेतकरी स्वदेशी गाईंचा पाळतात आणि जर तुमच्याकडे दुग्धव्यवसाय करण्यासाठी स्वदेशी गाई असतील तर तुम्हाला राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार मिळण्याची संधी उपलब्ध झालेली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोकणी लोकांच्या जिव्हाळ्याच्या विषयाला धक्का | मोदी सरकारकडून कोंकण रेल्वेचे खाजगीकरण ?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी परवाच 6 लाख कोटी रुपयांच्या राष्ट्रीय पायाभूत सुविधा उपक्रमाची घोषणा केली आहे या योजनेंतर्गत रेल्वे, ऊर्जा ते रस्त्यापर्यंत अनेक मूलभूत सेवा-सुविधांच्या क्षेत्रातील सरकारी संपत्तीचे मॉनेटायझेशन केले जाणार असल्याचे देखील अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे. केंद्र सरकारने पायाभूत सुविधा क्षेत्रातील सरकारी संपत्ती खासगी क्षेत्राकडे सोपवण्याचा निर्णय घेतला असून नॅशनल मॉनेटायझेशन पाईपलाइन असे या उपक्रमाला नाव देण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON
-
IRFC Share Price | सरकारी कंपनीच्या मल्टिबॅगर शेअरबाबत फायद्याची अपडेट, मोठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरबद्दल महत्वाची अपडेट, ग्लोबल फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL