महत्वाच्या बातम्या
-
सत्ता गेली घोटाळे उघड | नगर बँक अपहारप्रकरणी भाजपच्या माजी खासदारावर गुन्हा दाखल
नगर अर्बन बँकेत तीन कोटीचा अपहार केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे नेते माजी खासदार दिलीप गांधी, घनश्याम अच्युत बल्लाळ, आशुतोष सतिष लांडगे यांच्यासह बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाच्या सदस्यांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा पैशांचा अपहार ७ ऑक्टोबर २०१७ ते १० नोव्हेंबर २०१७ यादरम्यान झाला आहे. याप्रकरणी आज बँकेचे अधिकारी मारुती औटी यांनी तक्रार दिली असून त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दिलीप गांधी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे नगरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | स्टेट बँक ऑफ इंडियात 489 पदांची भरती
SBI Recruitment 2021: स्टेट बँक ऑफ इंडियाने स्पेशलिस्ट केडर ऑफिसर, डेप्युटी मॅनेजर, स्पेशलिस्ट केडर ऑफिसर, अभियंता फायर, स्पेशलिस्ट केडर ऑफिसर, स्पेशलिस्ट केडर ऑफिस सिक्युरिटी अर्ज करण्याची प्रक्रिया आज म्हणजेच 22 डिसेंबरपासून सुरू केली आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार sbi.co.in/careers. वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. याशिवाय उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती | अमेरिकेत बेरोजगारांना दरमहा तब्बल ८८ हजारांचा भत्ता मंजूर
आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेने नावाप्रमाणे कोरोना निर्मूलन आणि अर्थव्यवस्था सावरण्यासाठी ९०० अब्ज डॉलर्सचे (६६३ लाख कोटी) महाकाय आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. उद्योग धंदे, बेरोजगार आणि गरजू नागरिकांना या पॅकेजमधून आर्थिक मदत केली जाणार आहे. ज्यात बेरोजगारांना दर आठवड्याला ३०० डॉलर्सचा भत्ता दिला जाणार आहे. या पॅकेजमुळे दर महिन्याला बेरोजगारांना जवळपास १२०० डॉलर्स (८८००० रुपये) मिळणार आहे. यामुळे ग्राहकांची क्रयशक्ती वाढून बाजारपेठेला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
4 वर्षांपूर्वी -
बच्चू कडूंच्या नेतृत्वात मुंबईतील रिलायन्सच्या कार्यालयावर मोर्चा | पण त्याआधीच...
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आज मुंबईत रिलायन्स कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. पण बच्चू कडू यांना पोलिसांनी नागपुरातच रोखून धरलं आहे. महत्वाची बाब म्हणजे बच्चू कडू यांना वरिष्ठांच्या आदेशानुसारच अडवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र हा आदेश देणारे वरिष्ठ कोण? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.
4 वर्षांपूर्वी -
UK | नव्या कोरोना व्हायरसने चिंता | सेन्सेक्स कोसळला | ५ लाख कोटींचे नुकसान
ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा आणि आधीच्या तुलनेत अधिक धोकादायक स्ट्रेन आढळून आल्यानं केंद्र सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनहून भारतात येणारी हवाई वाहतूक रोखण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी २२ डिसेंबरला रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनी सुरू होईल. हा निर्णय ३१ डिसेंबरपर्यंत लागू असेल.
4 वर्षांपूर्वी -
सत्ता काळात पुरग्रस्तांसाठी वर्गणी जमवणारे भाजप नेते राम मंदिराच्या वर्गणीवरून का चिडले? - सविस्तर वृत्त
आयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी सरकारकडून संक्रांतीपासून वर्गणीचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. याच मुद्यावरुन शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधील अग्रलेखातून शिवसेनेनी भाजपवर टीका केली. याच मुद्यावरुन ‘ब्रिगेडी हिंदुत्ववाद्यांनी राममंदिर वर्गणीला टार्गेट करणं स्वाभाविकच असल्याचं म्हणत भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनवर जोरदार निशाणा साधला आहे.
4 वर्षांपूर्वी -
ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या विमानांवर बंदी | ब्रिटनमध्ये परिस्थिती हाताबाहेर
ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा आणि आधीच्या तुलनेत अधिक धोकादायक स्ट्रेन आढळून आल्यानं केंद्र सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनहून भारतात येणारी हवाई वाहतूक रोखण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी २२ डिसेंबरला रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनी सुरू होईल. हा निर्णय ३१ डिसेंबरपर्यंत लागू असेल.
4 वर्षांपूर्वी -
प. बंगाल | मणी लॉन्ड्रींग प्रकरणातील १३ पैकी ७ जण भाजपात | घोटाळ्याचे व्हिडिओ गायब
पुढील वर्षी म्हणजे एप्रिल-मे 2021 मध्ये पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका होत आहेत. त्याआधीच आतापासूनच फोडाफोडीला सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगालमधील एकूण 294 पैकी तब्बल 200 जागा जिंकण्याचा निर्धार अमित शाहांनी केला आहे. एकीकडे बिहारमध्ये विजय मिळवल्यानंतर, त्याचवेळी भारतीय जनता पक्षाने शेजारील पश्चिम बंगाल जिंकण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली. बंगालमध्ये सध्या ममता बॅनर्जींची तृणमूल काँग्रेस 219 जागांसह सत्तेत आहे. बंगालमध्ये बहुमताचा आकडा 148 इतका आहे. 2021 मध्ये इथे निवडणुका होत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारच्या कायद्याचा वापर | पर्मनन्ट कामगारांना कान्ट्रॅक्टवर आणण्याचा कंपन्यांचा सपाटा
मोदी सरकारनं महत्त्वाच्या कामगार कायद्यात दुरुस्त्या करण्यासंदर्भात संसदेत विधेयक मांडलं होतं. हे विधेयक सप्टेंबर महिन्यात मंजूर करण्यात आलं असून, तब्बल १७ वर्षांनी कामगार कायद्यांमध्ये व्यापक बदल करण्यात आणि ४० हून अधिक कामगार कायद्यांना या चार संहितांमध्ये सामावून घेण्यात आले होते.
4 वर्षांपूर्वी -
मेट्रो ३ कारशेड | शरद पवार मध्यस्थी करणार | चर्चेतून मार्ग काढणार
‘कांजूरमार्गची जमीन ही केंद्राची असेल नसेल हा वाद आपण सोडवू शकतो. केंद्रानं आणि राज्यानं मिळून चर्चेदरम्यान हा वाद सोडवला पाहिजे,’ असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केलं आहे. याचवेळी मेट्रो कारशेडवरून सरकारला वेळोवेळी लक्ष्य करणाऱ्या विरोधकांनाही मुख्यमंत्र्यांनी एक आवाहन केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी आंदोलन लोकशाहीसाठी सुद्धा | अमेरिकेतील १९'च्या शतकातील क्रांतीची आठवण
दिल्लीतील सीमेवर थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. परंतु जशी थंडी वाढते आहे तशी आंदोलक शेतकऱ्यांची लढण्याची उर्मीही वाढत असल्याचे चित्र तेथे दिसून येत आहे. दिल्लीच्या चारही बाजूने शेतकरी तेथे गेले तीन आठवडे ठिय्या देऊन बसले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मोदीच देशाला महासत्ता करतील सांगणारे भारतीय अब्जाधीश संकटात | 73 रुपयांना विकली कंपनी
युएईमधील भारतीय वंशाचे अब्जाधीश बी.आर शेट्टी हे आपला फिनाब्लर पीएलसी (Finablr Plc) चा व्यवसाय इस्त्रायली-युएई मधील कंपनीला फक्त 1 डॉलर (73.52 रुपये) मध्ये विकत आहेत. बीआर शेट्टी मागील वर्षापासून आर्थिक संकटात आले होते. त्यांच्यावर मोठं कर्ज आहे. तसेच त्यांच्या विरोधात फसवणुकीची चौकशी देखील सुरु आहे. आज त्यांच्या बिझनेसची मार्केट वॅल्यू फक्त 1.5 बिलियन पाउंड ($2 बिलियन) राहिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई मेट्रो ३ BKC | भाजपचा तिळपापड | हे आहे भाजपचं गुजरात आर्थिक कनेक्शन
राज्यात भारतीय जनता पक्षाला सत्तेबाहेर ठेवून महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं आहे. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नैत्रुत्वात सरकार स्थापन करण्यात आल्यावर भारतीय जनता पक्षाची पडद्यामागील अनेक गुपितं समोर येण्यास सुरुवात झाली आहे. प्रथम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारने आरेमधील मेट्रो कारशेडच्या आंदोलनातील आणि नाणार संबंधित प्रकल्पांना लोकशाही मार्गाने विरोध करणाऱ्यांवर जे गुन्हे लादले होते ते मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारने राज्यात सुरु केलेल्या विकास कामांचा आढावा घेण्यास सुरुवात केली होती.
4 वर्षांपूर्वी -
ठाकरे सरकारचे सल्लागार कोण समजत नाही | राज्य बुडवायला निघालेत - फडणवीस
कांजूरमार्गमध्ये मेट्रो कारशेड उभारण्यास केंद्राच्या याचिकेमुळे उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील जागेत कारशेड उभारण्याच्या पर्यायावर राज्य सरकारने चाचपणी सुरू केली आहे. दरम्यान यावरुन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे. सल्लागार राज्य बुडवायला निघाले आहेत अशी टीका त्यांनी केली आहे. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
बुरे दिन आने वाले है | पेट्रोलची किंमत 100 रुपये पर्यंत पोहोचण्याची शक्यता
पेट्रोलियम कंपन्यांनी आज गुरुवारी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नाही. सलग दहाव्या दिवशी इंधन दर स्थिर आहेत. थंडीची लाट आल्याने तापमान सामान्य ठेवण्यासाठी काही देशांमध्ये सेंट्रलाइज हिटिंग सिस्टम सुरु करण्यात आली आहे. या प्रणालीसाठी इंधनाची गरज लागते.त्यामुळे मागील दोन दिवसांपासून कच्च्या तेलाची मागणी वाढली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुकेश अंबानींची भूक वाढली आहे | त्यासाठी शेतकऱ्यांवर विधेयके लादली
मोदी सरकारचे कृषी कायदे हे अंबानी यांच्यासारख्या उद्योगपतींच्या भल्यासाठी आहेत. मुकेश अंबानी यांची भूक वाढली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांवर नको असलेली विधेयके लादली जात असल्याचा आरोप खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी आंदोलन | Jio चा इतर टेलिकॉम कंपन्यांसोबत वाद पेटला
रिलायन्स जिओ इंफोकॉमने (Reliance Jio Infocom-RJio) एयरटेल (Airtel) आणि वोडाफोन-आयडियावर (VI) खोट्या बातम्या पसरवण्याचे आरोप केले आहेत. कंपनीने टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाकडे (TRAI) कडक कारवाईची मागणी केली आहे. जिओचा असा आरोप आहे की, एयरटेल आणि वोडाफोन-आयडियाने शेतकरी आंदोलनादरम्यान अनैतिकरित्या अशा अफवा पसरवल्या की, नव्या कृषी कायद्यामुळे जिओला फायदा होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
४०% मालवाहतुक प्रभावित | ५ हजार कोटींचा व्यापार प्रभावित | ट्रेडर्सचा केंद्रावर संताप
राजधानी दिल्ली आणि दिल्लीच्या सीमेवर कृषी विधेयकाविरोधात शेतकरी ठाण मांडून बसलाय. शेतकरी आंदोलनाचा आज २१ वा दिवस… परंतु, या शेतकऱ्यांच्या अडचणीत दिल्लीतील थंडी आणखीनच वाढ करणार असं दिसतंय. दिल्लीमध्ये पारा ४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरलेला दिसतोय. यामुळे, करोना संक्रमण काळात आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांना आणखीनच अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
4 वर्षांपूर्वी -
अदानी, अंबानींच्या तुकड्यांवर जगणारे शेतकऱ्यांना तुकडे-तुकडे गँग म्हणत आहेत - प्रशांत भूषण
काल शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला. भारतीय जनता पक्ष देशातील खरी तुकडे-तुकडे गँग असून शेतकरी आंदोलनादरम्यान देश तोडल्याचा आरोप सुखबीर सिंग बादल यांनी केला होता. भारतीय जनता पार्टीने राष्ट्रीय एकताचे तुकडे केले आहेत, निर्लज्जपणे मुस्लिमांविरूद्ध हिंदूंना भडकावले आहे. आता ते आपल्या शीख बांधवांच्या विरोधात असे करत आहेत. देशप्रेमी पंजाबला भाजपा जातीय आगीत ढकलत आहे, असा शब्दात सुखबीर सिंग बादल यांनी भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला होता.
4 वर्षांपूर्वी -
Facebook Fuel for India 2020 | मार्क झुकरबर्ग भारतीय तरुणांसाठी रोल मॉडेल - मुकेश अंबानी
रिलायन्स इंडस्ट्रीजचे सीएमडी मुकेश अंबानी Facebook Fuel for India 2020 मध्ये म्हणाले, ‘भारतात अनेक कंपन्या आणि संघटना डिजीटल इनक्ल्यूजन (समावेश) च्या दिशेने जलद गतीने काम करत आहेत. भारतातल्या तरुणांची डिजीटल परिवर्तनामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना भारताचे तरुण रोल मॉडेल म्हणून बघतात.’
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON