महत्वाच्या बातम्या
-
बीएसएनएल'च्या बिकट आर्थिक स्थितीमुळे कर्मचाऱ्यांची व्हीएसआर'ला मोठी पसंती: सविस्तर वृत्त
ठरल्याप्रमाणे दूरसंचार क्षेत्रातील बीएसएनएल आणि एमटीएनएल या सरकारी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केली. त्याद्वारे ८० हजार कर्मचारी कमी होतील, असा अंदाज आहे. या कंपन्यांच्या विलीनीकरणाचा निर्णय सरकारने आधीच घेतला आहे.
6 वर्षांपूर्वी -
पीएमसी बँकेच्या खातेदारांची हायकोर्टाच्याबाहेर 'RBI चोर है' घोषणाबाजी
PMC बँक प्रकरणी सुनावणी पुढे ढकल्याने खातेदारांनी कोर्टाबाहेर घोषणाबाजी केली. पीएमसी बँकेच्या खातेदारांनी आरबीआय चोर है च्या घोषणाही दिल्या. मुंबई हायकोर्टाबाहेर पीएमसीचे खातेदार जमले होते. हमारा पैसा वापस कर दो आरबीआय अशाही घोषणा देण्यात आल्या. पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होती. या सुनावणीत काय होणार याकडे खातेदारांचं लक्ष लागलं होतं. अशात ही सुनावणी ४ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे आरबीआय विरोधात खातेदारांनी घोषणाबाजी केली.
6 वर्षांपूर्वी -
अखेर मोदी सरकाकडून एअर इंडिया आणि भारत पेट्रोलिअम कंपन्या विक्रीला
कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या एअर इंडिया (Air India) आणि भारत पेट्रोलिअम कॉर्पोरेशन (Bharat Petroleum Corporation) या दोन सरकारी कंपन्या पुढील वर्षी मार्चपर्यंत विकण्यात येणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी याबाबत माहिती दिली आहे. देशाची आर्थिक स्थिती सध्या मंदावलेली असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही माहिती दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
लंडन: आर कॉमसंबंधित कर्जामुळे अनिल अंबानींवर चीनच्या ३ बँकांकडून खटले दाखल
एडीएजी समुहाचे मालक एडीएजी समूहाचे अनिल अंबानी अडचणींमध्ये वाढ झाली आहे. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या अंबानींवर चीनच्या तीन बँकांनी ४८.५३ अब्ज रुपयांचा दावा ठोकला आहे. या बँकांनी सांगितले की अंबानींची बंद झालेली कंपनी रिलायन्स कम्युनिकेशनला २०१२ मध्ये ६६.०३ अब्ज म्हणजचे ९२.५२ कोटी डॉलरचे कर्ज दिले होते. या कर्जाची परतफेड न केल्याने २०१७ पासून बुडीत खात्यामध्ये आहे.
6 वर्षांपूर्वी -
नोटबंदीला ३ वर्ष पूर्ण; अर्थव्यवस्थेच्या संकटावरून प्रियांका गांधींचा मोदींवर निशाणा
नोटाबंदी ही देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणारी एक ‘आपत्ती’ असल्याचे सिद्ध करत काँग्रेस नेते प्रियंका गांधी वड्रा यांनी शुक्रवारी मोदी सरकारवर निशाणा साधला. नोव्हेंबर २०१९ मध्ये नोटाबंदीला ३ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्रियंकाने मोदी सरकारवर हल्ला केला.
6 वर्षांपूर्वी -
पुणे: प्राप्तिकर विभागाच्या धाडीत तब्बल ९.५५ कोटीची रोकड जप्त
करचुकवेगिरी प्रकरणात प्राप्तिकर विभागाने पुणे परिसरातील एका व्यावसायिकावर धाड टाकली असून, त्यात तब्बल ९.५५ कोटीची रोकड जप्त केल्याचे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) गुरुवारी सांगितले. प्राप्तिकरांच्या छाप्यात आतापर्यंतचा सर्वात मोठी रोकड असल्याची देखील माहिती दिली आहे. सदर कारवाई ४ नोव्हेंबर रोजी करण्यात आल्याचे सीबीडीटीने सांगितले. परंतु अधिकाऱ्यांनी या व्यावसायिकाचे नाव उघड केले नाही.
6 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार होते; पण चुकून जय शहांचं १५०० टक्क्यांनी वाढलं: सविस्तर
केंद्रात सत्ता आल्यानंतर भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलाची संपत्ती तब्बल १६ हजार पटींनी वाढल्याचा गौप्यस्फोट एका संकेतस्थळाने केला आणि देशात जणू भूकंपच झाला होता. ज्या मुलाबाबत ही बातमी होती तो म्हणजे जय शहा. केंद्रीय गृहमंत्री अन् भाजपच्या सर्व सत्ताधीशांमधील क्रमांक दोनचे नेते अमित शहा यांचे चिरंजीव. जयच्या माध्यमातून तेव्हा काँग्रेसने मोदी-शहा जोडगोळीवर प्रचंड रान उठविले. पुढे अर्थातच हे प्रकरण शीतपेटीत गेले. तेव्हा प्रकाशात आलेले जय शहा हे नंतर येनकेन प्रकारे माध्यमांत झळकत राहिले. आता तर ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव झाल्याने पेज थ्रीसह विविध बातम्यांध्ये सतत झळकत राहणार यात शंका नाही. हे महाराज बीसीसीआयमध्ये अचानक कसे टपकले, असा प्रश्न अनेकांना पडू शकतो.
6 वर्षांपूर्वी -
धक्का! इन्फोसिसमधील १२ हजार कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार
आयटी क्षेत्रातील बडी कंपनी असलेल्या कॉग्निझंटने कर्मचारी कपातीचा निर्णय घेतल्यानंतर आता इन्फोसिसनेही त्याच दिशेने पाऊल टाकले आहे. इन्फोसिस मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. कॉग्निझंटने कर्मचारी कपातीसाठी जो मार्ग अवलंबला आहे तशाच प्रकारे इन्फोसिसही कपात करणार आहे. वरिष्ठ आणि मधल्या पदावर असलेल्या कर्मचाऱ्यांना कंपनी कामावरून काढणार आहे. यानुसार इन्फोसिस १० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
तोट्यातील एअर इंडिया खरेदीचे टाटा समूहाचे संकेत
सत्त्याऐंशी वर्षांपूर्वी ‘एअर इंडिया’चे रोपटे लावणारा टाटा समूह आता पुन्हा कंपनी ताब्यात घेण्याची शक्यता आहे. ‘एअर इंडिया’च्या खरेदीप्रक्रियेत भाग घेण्याचे सूतोवाच टाटा समूहाने सोमवारी केले. ‘मी आमच्या टीमला आढावा घेण्यास सांगेन,’ असे टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
6 वर्षांपूर्वी -
पीएमसी बँक प्रकरणी अजून एका ग्राहकाचा मृत्यू
पीएमसी बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी आणखी एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ७४ वर्षीय अँड्रयू लोबो यांचं गुरूवारी ठाण्याजवळील काशेली येथील राहत्या घरी निधन झाल्याची माहिती त्यांचा नातू क्रिस यानं दिली. काही दिवसांपूर्वीच बँकेतील घोटाळ्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर निर्बंध घातले होते. त्यानंतर २३ सप्टेंबर रोजी एका खातेधारकानं आत्महत्या केली होती. त्यानंतर घडलेली ही आठवी घटना आहे. अँड्रयू लोबो यांच्या खात्यात २६ लाखांची रक्कम जमा होती. त्यावरून मिळणाऱ्या व्याजावर त्यांचं घर चालत होतं. काही दिवसांपूर्वी त्यांना फुफ्फुसाचा आजार झाला होता. त्यासाठी त्यांना नियमित औषधं आणि डॉक्टरांकडे तपासणीसाठी जावं लागत होतं. परंतु त्यांच्याकडे असलेला पैसा बँकेत अडकल्यानं आवश्यक ती रक्कम त्यांना काढता येत नव्हती. त्यामुळे त्यांच्या उपचारात अडथळा निर्माण झाला,” असं क्रिस यांनी सांगितलं.
6 वर्षांपूर्वी -
विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडर आणखी महाग
सिलिडरच्या दरात सलग तिसऱ्या महिन्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तेल विपणन कंपन्यांनी सलग तिसऱ्या महिन्यात एलपीजीच्या किंमतीत वाढ केली आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशननुसार विना अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ७७ रूपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता दिल्लीत १४.२ किलोग्रॅमच्या विना अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरसाठी आता ६८१.५० रूपये मोजावे लागणार आहेत. तर मुंबईत १४.२ किलोच्या सिलिंडरसाठी ६५१ रूपये मोजावे लागणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
PMC बँकेच्या आणखी एका महिला खातेदाराचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
पीएमसी बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी आणखी एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीएमसी बँकेत अडकलेले पैसे मिळतील की नाही या चिंतेत असलेल्या आणखी एका खातेदार महिलेचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना खारघरमध्ये घडली. कुलदिपकौर विग (६४) असे या महिलेचे नाव असून त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे पीएमसी बँकेमध्ये सुमारे १७ लाख रुपये अडकले होते. कुलदिपकौर या बुधवारी रात्री पीएमसी बँकेसंदर्भातील बातम्या पाहून झोपी गेल्यानंतर दोन तासांतच त्यांचा हृदयविकराने मृत्यू झाला.
6 वर्षांपूर्वी -
प्रचंड तोट्यातील व्होडाफोन कंपनी भारतातून गाशा गुंडाळण्याची शक्यता
भारतातील आघाडीच्या खासगी दूरसंचार कंपन्यांपैकी एक असलेल्या व्होडाफोनने भारतातून गाशा गुंडाळण्याची तयारी सुरू केल्याचे वृत्त आहे. व्होडाफोन कंपनीला भारतात मोठा तोटा सहन करावा लागत असून त्यामुळेच ही कंपनी भारतातील सेवा बंद करण्याची शक्यता असल्याचे वृत्त आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिले आहे. दरम्यान, कंपनीकडून यावर अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
6 वर्षांपूर्वी -
कर्मचारी कपातीची कुऱ्हाड आता आयटी क्षेत्रावर; कॉग्निझंट करणार सुरुवात
मंदीची झळ आता आयटी क्षेत्रावर देखील पडली आहे. कॉस्ट कटिंगची कारणं पुढे रेटून आता आयटी कंपन्यांनी देखील कर्मचारी कपातीचा मार्ग अवलंबला आहे. विशेष म्हणजे भारतात मोठा रोजगार हा आयटी क्षेत्रातील असून यामध्ये उच्च शिक्षित तरुणांचा मोठा वाटा असून केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरात स्थायिक झालेले भारतीय लोकं आयटी क्षेत्रात नोकरीला आहे.
6 वर्षांपूर्वी -
शेअर बाजारात तेजी; गुंतवणूकदारांना २.७३ लाख कोटींचा नफा
शेअर बाजार व राष्ट्रीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी मंगळवारी अक्षरश: दिवाळी साजरी केली. सोमवारच्या सुटीनंतर मंगळवारी उघडलेल्या बाजारात गुंतवणूकदारांनी सुरुवातीपासून समभागखरेदीचा सपाटा लावल्याने सेन्सेक्स उसळत गेला. दिवसभरात ५८१ अंकांनी वधारलेल्या सेन्सेक्सने दिवसअखेरीस ३९८३१चा स्तर गाठला. तर, १५९ अंकांची वाढ साधलेला निफ्टी ११७८६वर स्थिरावला. सेन्सेक्सच्या या दमदार कामगिरीमुळे गुंतवणूकदारांच्या बाजार भांडवलात तब्बल २.७३ लाख कोटी रुपयांची वाढ झाली.
6 वर्षांपूर्वी -
गुडविन ज्वेलर्सचा मालक फरार; ग्राहकांना करोडोचा गंडा
ऐन दिवाळीत गुडविन ज्वेलर्स दुकानाला टाळे लागल्याने ग्राहकांचे धाबे दणाणले असून आत्तापर्यंत या ज्वेलर्स विरोधातील तक्रारींचा आकडा वाढत ५० च्या पुढे गेला आहे. फसवणुकीची रक्कम जवळपास तीन कोटी रुपयांच्या आसपास असून यामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
अडचणीत असलेल्या BSNL, MTNLचे विलिनिकरण होणार: केंद्राचा निर्णय
गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या बीएसएनएल आणि एमटीएनएलचं विलिनीकरण होणार आहे. आज झालेल्या केंद्राच्या कॅबिनेट बैठकीत या दोन्ही कंपन्यांच्या विलिनीकरणाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे या दोन्ही कंपन्या सरकार बंद करणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
6 वर्षांपूर्वी -
दिल्ली नागरिक सहकारी बँकही PMC बँकेच्या मार्गावर? SBI पेक्षा १३ पट एनपीए
देशात पीएमसी बँकेवरून वातावरण तापलेलं असताना अजून एक बँक प्रचंड वाढत्या एनपीए’मुळे प्रकाशझोतात आली आहे आणि त्यामुळे ग्राहकांची धाकधूक वाढली आहे. दिल्ली राज्य सरकारच्या सहकारी संस्थांच्या रजिस्ट्रारने (आरसीएस) सदर खटला दिल्ली नागरिक सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीविरूद्ध चालवण्यास अधिकृत परवानगी दिली आहे. आरसीएस’च्या बँक ऑडिट टीम त्यांना अनेक कारणांसाठी दोषी ठरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच बँकेच्या नॉन परफॉर्मिंग अस्सेट्स’मध्ये (एनपीए) प्रचंड वाढ झाल्याने, मोठं आर्थिक आर्थिक नुकसान झालं आहे.
6 वर्षांपूर्वी -
मागील ५ वर्षांपासून एनपीए समस्येमुळे बँकिंग क्षेत्रावरील संकट चिंताजनक: अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी
देशातील बँकिंग क्षेत्रावरील संकट चिंताजनक आहे. या स्थितीचा सामना करण्यासाठी धडाडीने निर्णय घ्यायला हवेत, असे मत नोबेलविजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी मंगळवारी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
6 वर्षांपूर्वी -
इन्फोसिसच्या मॅनेजमेंटवर गंभीर आरोप लागताच काही मिनिटांत ४५ हजार कोटी बुडाले
देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसच्या मॅनेजमेंटवर गंभीर आरोप लावल्यानंतर आज सकाळी शेअर्स १५ टक्क्यांनी घसरले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांचं काही मिनिटांत ४५ हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं. तज्ज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांना घाबरण्याची गरज नाही. जर कोणाकडे आधीपासूनच विकत घेतलेले शेअर्स असल्यास त्यांनी ते विकू नयेत. तसेच या काळात कोणतीही नवी गुंतवणूक करू नका. रिपोर्टनुसार, इन्फोसिसने नफा आणि व्यवसाय वाढवण्यासाठी अनैतिक पावलं उचलली आहेत. या प्रकरणी एका ग्रुपनं इन्फोसिस बोर्डाला पत्र लिहून माहिती दिली आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON
-
IRFC Share Price | सरकारी कंपनीच्या मल्टिबॅगर शेअरबाबत फायद्याची अपडेट, मोठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरबद्दल महत्वाची अपडेट, ग्लोबल फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL