महत्वाच्या बातम्या
-
सावधान! जगभरात ९ महिन्यांत मंदी दाखल होणार; नोटबंदीच्या निर्णयाने भारत अजूनच कोलमडणार?
अमेरिकेची आंतरराष्ट्रीय गुंतवणूक बँकिंग कंपनी मॉर्गन स्टेनलीने पुन्हा एकदा जगभरात आर्थिक मंदी येण्याचे मोठे संकेत दिले आहेत. मार्गन स्टेनली या बँकेच्या मते, जगभरातल्या अर्थव्यवस्था मंदीच्या मोठ्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे लवकरच जागतिक मंदी येण्याची चिन्हे आहेत. पुढच्या ९ महिन्यात ही मंदी येणार असल्याचीही शक्यताही मॉर्गन स्टेनली या बँकेनं वर्तवली आहे. भारतात आधीच नोटबंदीचे दुष्परिणाम झेलणारी अर्थव्यवस्था अजूनच हलाकीची होण्याची शक्यता आहे. त्याचा सर्वाधिक परिणाम हा बेरोजगारी वाढण्यावर होणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
अच्छे दिन! नाणार रिफायनरी संबंधित सौदी कंपनी अरॅमकोची रिलायंसमध्ये मोठी परकीय गुंतवणूक
नवी दिल्ली: रिलायन्स उद्योग समूहात आतापर्यंतची सर्वात मोठी परकीय गुंतवणूक होणार असल्याची घोषणा अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी केली. रिलासन्स उद्योग २०१८-१९ आर्थिक वर्षात सर्वाधिक नफा कमावणारी समूह असल्याचंदेखील त्यांनी सांगितलं. सौदी अराम्को रिलायन्समधील 20 टक्के शेअर्स खरेदी करणार असल्याची माहिती अंबानी यांनी दिली. आज रिलायन्सच्या वार्षिक बैठकीत अंबानी यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या.
6 वर्षांपूर्वी -
जिओ फायबर लाँच; आता घर बसल्या पाहा फर्स्ट डे फर्स्ट शो: रिलायन्सची घोषणा
मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) कंपनीची मुंबईत सोमवारी ४२वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यात बहुप्रतिक्षित जिओ फायबर, जिओ फोन ३, जिओ सेटऑफ बॉक्स आणि जिओ गिगा टीव्ही या सेवांबाबत इतर सेवांची घोषणा केली. पाच सप्टेंबर जिओच्या तिसऱ्या वाढदिवशी जिओ फायबर कमर्शिअल लाँच करण्यात येणार आहे. याचे ७०० रुपयांपासून प्लॅन सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
6 वर्षांपूर्वी -
'सावळाहरी' गोष्ट एका गोड उद्योगाची..
हडपसरचे साधना विद्यालय. कर्मवीर भाऊराव पातळ्यांच्या संस्कार असलेली हि शाळा. या शाळेत १९९६ दहावी पास होऊन बाहेर पडलेले मित्र. आई वडिल्यांच्या स्वप्नाप्रमाणे स्वतःच्या क्षेत्रात काहीतरी करून दाखवलं. लग्न झाली. मूल सुद्धा झाली. आता मूल शाळेत जाऊ लागली. पुण्यासारख्या शहरात स्वतःची घरे झाली. सगळं कसा चांगला होऊ लागला. मग एक दिवस व्हॉट्सअँप आला आणि जुन्या वर्गमित्रांचा ग्रुप बनला. ग्रुपचं नाव होत VIRTUAL कट्टा या ग्रुपवर १९९६ साली पास होऊन बाहेर पडलेले वीस-बावीस मित्र एकत्र आले.
6 वर्षांपूर्वी -
व्यापारी संबंध तोडल्यानंतर पाकिस्तानने हवाई मार्गही केला बंद
जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यावरून पाकिस्तानने भारताबरोबरच्या संबंधांवर बुधवारी घाव घातला. पाकिस्तानने भारतीय राजदूतांना मायदेशी परतण्यास सांगितले असून आपल्या राजनैतिक अधिकाऱ्याला माघारी बोलावले आहे. तसेच भारताशी होणारा व्यापार पाकिस्तानने रोखला आहे.
6 वर्षांपूर्वी -
या गोष्टींचा उल्लेख इन्कम टॅक्स रिटर्न'मध्ये केला नाही तर दंड भरावा लागणार.
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी ३१ ऑगस्ट हि शेवटची तारीख आहे. या महिन्यात तो काहीही करून तो भरावाच लागेल. पण त्या घाईत जर काही गोष्टींचा उल्लेख करणे राहून गेले तर तुम्ही गोत्यात येऊ शकता. हल्ली अनेक जण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असतात. एका म्युच्युअल फंडातून दुसरीकडे जाताना म्युच्युअल फंडातून जे पैसे मिळतात ते दाखवणं राहून जात याचा उल्लेख कर्ण आवश्यक आहे. अन्यथा आयकर विभागाकडून तुम्हाला दंड आकारला जाऊ शकतो.
6 वर्षांपूर्वी -
आता एटीएम कार्डशिवाय सुद्धा पैसे काढता येणार.
एटीएम कार्ड क्लोनिंग करून एटीएम मशिनमधून पैसे काढण्याच्या घटनेत वाढ होत आहे. यावर खबरीचा उपाय म्हणून आता एटीएम कार्ड न वापरता एटीएम मशिनमधून पैसे काढता येणार आहेत. अनेक बँक धारकांसाठी हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या योनो या अँपने अलीकडेच हि सेवा सुरु केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
हे काय? जम्मू-काश्मीरमध्ये ३७० हटवताच जमीन-खरेदी विक्रीची जाहिरातबाजी सुरु
कलम ३५- ए आणि ३७० वरून गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमधील वातावरण तापत चाललं आहे. अमरनाथ यात्रा रद्द केल्यानंतर आता काश्मीरमध्ये वेगानं घडामोडी घडत आहेत. काश्मीरमधील सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटविण्याची शिफारस केली. या शिफारशीला राष्ट्रपतींनीही मान्यता दिली आहे. देशाच्या इतिहासात सर्वात मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.
6 वर्षांपूर्वी -
भारतीय अर्थव्यवस्था सातव्या क्रमांकावर घसरली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे कि भारतीय अर्थव्यवस्थेचे आकारमान पाच ट्रिलियन डॉलर इतके व्हावे. परंतु याच आठवड्यात जागतिक बँकेच्या २०१८ च्या क्रमवारीत भारतीय अर्थव्यवस्था सहाव्या वरून सातव्या क्रमांकावर घसरली आहे. २०१७ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचे आकारमान २. ट्रिलियन डॉलर होते. २०१८ मध्ये वाढ होऊन हा आकडा २.७३ इतका झाला.
6 वर्षांपूर्वी -
२०११ मधील जगात ३ऱ्या क्रमांकावरील भारतीय अर्थव्यवस्था थेट ७व्या स्थानावर घसरली: वर्ल्ड बँक रिपोर्ट
भारताकडून जगातली सर्वात मोठी 5वी अर्थव्यवस्था होण्याचा मान काढून घेण्यात आला आहे. अर्थव्यवस्थेचा दृष्टीनं भारताची सातव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेनं वर्षं 2018मध्ये सुस्त राहिल्यानं त्याचा मोठा भुर्दंड देशाला बसला आहे. जागतिक बँकेच्या आकड्यांनुसार वर्ष 2018मध्ये ब्रिटन आणि फ्रान्सची अर्थव्यवस्था भारताच्या तुलनेत प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर आहे. त्यामुळेच या दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांनी भारतीय अर्थव्यवस्थेला पछाडत पुढे जाण्याचा मान मिळवला आहे. ब्रिटनची अर्थव्यवस्था 5व्या क्रमांकावर पोहोचली आहे. तर सहाव्या क्रमांकावर फ्रान्स कब्जा मिळवला आहे. जिथे भारतीय अर्थव्यवस्था पाचव्या स्थानावरून घसरून सातव्या क्रमांकावर गेली असून, अमेरिका या यादीत नंबर वनवर कायम आहे.
6 वर्षांपूर्वी -
होंडाने मोटारसायकलींचे बनावट पार्टस बाजारातून जप्त केले
होंडा अँक्टिवा हि भारतातील सर्वात जास्त प्रमाणात विकली जाणारी मोटारसायकल आहे. दरमहा या मोटारसायकलीच्या २ लाख युनिट्सची विक्री होते. बाजारात या मोटारसायकलीचे बनावट पार्ट्स अगदी सहज आणि किमतीत मिळून जातात. या साठी कंपनीने बनवलेले अस्सल पार्टस कणी विकत घेतच नाही हे कंपनीच्या लक्षात आले. होंडाने बाजारात विकले जाणारे बनावट पार्टस जप्त करण्यास सुरुवात केली. आता हि मोहीम सफल होण्याच्या मार्गावर आहे. होंडाच्या बनावट पार्टसचे व्यवहार करणारे व्यापारी आणि उत्पादक यांच्याविरुद्ध होंडाने अंमलबाजवणीचे छापे टाकले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
एमटीएनएल आणि बीएसएनएल या कंपन्या एकत्र होण्याची शक्यता.
भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) आणि महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) या कंपन्यांचं होणाऱ्या तोट्यामुळे एकत्रीकरण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाढत्या तंत्रन्यानाच्या युगात आता प्रत्येकजण मोबाईल वापरात आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या कमी होणाऱ्या वापरामुळे त्यांच्यावरील कर्जाचा आकडा वाढत चालेल आहे.व्यवसाय हिस्सा गमावून बसलेल्या या कंपन्यांना आर्थिक उभारी मिळावी यासाठी यासाठी एक्रातिकारणाचा प्रस्ताव सरकारने मांडला आहे.
6 वर्षांपूर्वी -
पत्रात ते म्हणाले! मी एक व्यावसायिक म्हणून अपयशी ठरलो आहे, मला माफ करा!
गेले दोन दिवस बेपत्ता असलेले ‘सीसीडी’चे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा धक्कादायक मृत्यू झाला आहे. सिद्धार्थ यांनी मंगळुरु येथील नेत्रावती नदीत आत्महत्या केली असल्याचं सांगितलं आहे. आज नदीत त्यांचा मृतदेह सापडला आहे. यावरून आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच सिद्धार्थ यांनी एक पत्र देखील लिहिले होते.
6 वर्षांपूर्वी -
अॅमेझॉन करणार आता फूड डिलीव्हरी!
मध्यंतरीच्या काळात भारतात विविध फूड डीलेव्हरी अँप्सने जोरदार प्रगती केली. स्विगी, झोमॅटो, सारख्या अँप्सने कित्येकांची मने जिंकली. ह्या फूड डीलेव्हरी अँप्सच्या स्पर्धेत आता अजून एक स्पर्धक येतो आहे तो म्हणजे अॅमेझॉन. अॅमेझॉनने त्यांच्या ह्या नवीन उद्योगाची सुरुवात ही सप्टेंबर पासून करायची असे ठरविले असून, उबरने २०१७ साली सुरु केलेल्या उबर इट्स ह्या फूड डीलेव्हरी सर्व्हिसला विकत घेण्याच्या विचारात आहे.
6 वर्षांपूर्वी -
ऑनलाईन बँकिंग विश्वात आता 'व्हॉट्सअँप पे' सुद्धा येणार.
सध्याच्या काळात प्रत्येकाला सर्वच गोष्टी अगदी बसल्या जागी करायच्या असतात. त्यातच आता बँकिंग सेवा सुद्धा मागे राहिलेली नाही. ऑनलाईन बँकिंगमूळे हल्ली पैशाचा व्यवहार अगदी सहज सोपा झाला आहे. एखाद्या व्यक्तीला पैसे पोहोचवण्यासाठी त्या व्यक्तीला भेटायला हवेच असे नाही. हे पैसे पोहोचवण्यासाठी आपल्या मोबाईल वर विविध अँप उपलब्ध आहेत. या अँपद्वारे आपण हव्या त्या वेळी हव्या त्या व्यक्तीशी व्यवहार करू शकतो.
6 वर्षांपूर्वी -
‘कॅफे कॉफी डे’ चे मालक व्ही. जी. सिद्धार्थ अचानक बेपत्ता
देशातील सर्वात मोठे कॉफी रेस्टॉरंट ‘कॅफे कॉफी डे’ अर्थात, ‘सीसीडी’चे संस्थापक व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांचे जावई व्ही. जी. सिद्धार्थ हे अचानक बेपत्ता झाले आहेत. सिद्धार्थ यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मंगळुरू पोलिसांनी तातडीनं त्यांचा शोध सुरू केला असून सर्व शक्यता तपासून पाहिल्या जात आहेत.
6 वर्षांपूर्वी -
चांद्रयान २: भारतीय शास्त्रज्ञांना श्रेष्ठ म्हणत त्यांचे पगार मोदी सरकारने कापले
दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आज(दि.२८) आकाशवाणीवरील कार्यक्रम ‘मन की बात’द्वारे देशवासियांशीही दुसऱ्यांदा संवाद साधला. यावेळी त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो ISRO) शास्त्रज्ञांचं आणि चांद्रयान-२ मोहिमेचं कौतुक केलं. याशिवाय त्यांनी अन्य अनेक विषयांवरही भाष्य केलं.
6 वर्षांपूर्वी -
विवो'चा नवीन बजेट स्मार्टफोन : विवो Y90
ह्या महागाईच्या जगात जिथे मोठमोठ्या कंपन्या महागडे असे स्मार्टफोन मार्केट मध्ये आणत आहेत तिथेच विवो’ने आणला आहे, आपल्या खिशाला परवडणारा असा स्मार्टफोन विवो Y90. हा स्मार्टफोन तब्बल ६,६९० रुपयांना भारतीय मार्केट मध्ये उपलब्ध होणार आहे. विवो Y90 हा विवो च्या Y सिरीज मधील सर्वात स्वस्त मोबाईल असून ह्या स्मार्टफोन फेस-अनलॉक फिचर सुद्धा आहे.
6 वर्षांपूर्वी -
पीक विमा कंपन्यांनी राज्यात २,२५५ कोटी नफा कमावला; ९८% शेतकरी मदतीविना: सीएसई रिपोर्ट
पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होऊन देखील, विमा कंपनीने फसवणूक केल्याची तक्रार घेऊन नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील चांदोरे येथील शेतकरी बाबूराव सुर्वे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दार ठोठावले. पंतप्रधान कार्यालयाने तत्काळ दखल घेऊन ही तक्रार केंद्रीय कृषी खात्याकडे ती वर्ग केली. केंद्रीय कृषी खात्यानेही ती कंपनीकडे पाठवण्याचे कागदी घोडे नाचवले. परंतु, या तक्रारीला ८ महिने उलटून गेल्यावरही विमा कंपनीने त्यावर काहीही कार्यवाही केलेली नाही. दरम्यान, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा कंपन्यांनी महाराष्ट्रातून सर्वाधिक प्रीमियम गोळा केल्याचे सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट या संस्थेने केलेल्या अभ्यासात पुढे आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
आंध्रप्रदेश: भूमिपुत्रांना खाजगी नोकरीत ७५% आरक्षण; महाराष्ट्रात ५ वर्ष केवळ निर्धाराच्या मुठी आवळल्या
देशात रोजगाराच्या बाबतीत प्रथमच ऐतिहासिक गोष्ट घडली आहे. कारण आंध्र प्रदेशच्या अधिनियमातील महत्वाची तरतूद अशी आहे की, सरकारने एखाद्या उद्योगाला आर्थिक किंवा जमीन वगैरे अन्य सहाय्य दिलं असो की नसो, त्यांना या स्थानिक भूमिपुत्रांसाठी ७५ टक्के आरक्षणाचं धोरण राबवावंच लागणार आहे आणि सर्वांना काटेकोरपणे अमलात आणावं लागणार आहे. आंध्र प्रदेश सरकारने तसा आदेशच प्रसिद्ध केला आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON
-
IRFC Share Price | सरकारी कंपनीच्या मल्टिबॅगर शेअरबाबत फायद्याची अपडेट, मोठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरबद्दल महत्वाची अपडेट, ग्लोबल फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL